Posts

Showing posts from April, 2023

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा: प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा जिल्हाधिकारी यांचे आवाहन

यवतमाळ,दि. २८ एप्रिल (जिमाका):- स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीस सण राज्यभर साजरे करण्यात येतात. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 1 मे रोजी साजरा होणाऱ्या महाराष्ट्र दिनी प्लॅस्टिक ध्वजाचा वापर करु नये,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्रदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यावर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रिडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये.राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी,सुजाण व जागरुक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशा प्रकारे प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वज

मीनाबाजार ,क्राप्ट बाजार, सर्कस याकरीता आझाद मैदान जाहीर लीलावाने देणार

यवतमाळ दि. २७ एप्रिल (जिमाका) :- मीनाबाजार, प्रदर्शनी ,क्राप्ट बाजार, सर्कस इत्यादी प्रयोजनाकरीता आझाद मैदान भाडयाने देण्यांच्या कार्यपध्दतीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता राखण्यासाठी तसेच प्रकियेमध्ये सहभागी होण्याची पुरेशी संधी संबधीतांना मिळावी व शासनास तसेच मैदानांच्या देखभालीसाठी योग्य प्रमाणात महसूल प्राप्त व्हावा याअनुषंगाने जाहीर लिलाव पध्दतीने प्रकिया राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेली आहे. आझाद मैदान सदरचे प्रयोजनाकरीता भाडयाने घेण्यास लिलावात भाग घेण्याकरीता अर्ज फी २००० रुपये सह www.sdoyavatmal.in या संकेतस्थळावर आधारकार्ड, फोटो, चारित्र्य प्रमाणपत्रासह ऑनलाईन अर्ज २८ एप्रिल ते ७ मे २०२३ या कालावधीत करता येईल. इतर सर्व विस्तृत माहिती व अटी व शर्ती बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ, तहसिलदार कार्यालय यवतमाळ, मुख्याधिकारी न.प. यवतमाळ, यांचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

शासकीय योजनांची जत्रा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सव्वा लाख लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे नियोजन करावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ दि २७ एप्रिल जिमाका:- शासकीय योजनांची जत्रा या मुख्यमंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या योजनांची लाभार्थी यादी तयार ठेवावी. लाभार्थ्यांना अनावश्यक कागदपत्रे मागू नये. तसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया राबवावी. आपल्या जिल्ह्यात किमान सव्वा लाख लाभार्थ्यांना आपण एका छताखाली लाभ मिळवून देऊ शकलो पाहिजे अशा पद्धतिने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केल्यात. "शासकीय योजनांची जत्रा- सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा" हा उपक्रम १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ देण्यात येणार आहे. याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कैलास देवरे हे खास मुंबईवरून यवतमाळ येथे आढावा घेण्यासाठी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांचे दुसरे विशेष कार्य अधिकारी अमोल शिंदे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह द

सामाजिक न्यायपर्व अंतर्गत उसतोड कामगारांची कार्यशाळा

यवतमाळ दि. २५ एप्रिल (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे "सामाजिक न्याय पर्व" व "शासकीय योजनांची जत्रा" या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परीषद सभागृह येथे उसतोड कामगारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ऊसतोड कामगारांना तात्काळ ओळखपत्र देणे बाबत तसेच त्यांचे पुनरागमन झाल्यावर विना विलंब आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करून त्यांची आरोग्य तपासणी करणे तसेच त्यांचे मुलांचे जातीचे दाखले देणे याबाबत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांनी मार्गदर्शन केले. अमित कापसे यांनी प्रास्ताविक करताना योजनेचे महत्त्व व योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालिंदर आभाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अध्यक्षिय भाषणामध्ये या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.

बाभुळगाव पोलिस ठाण्यात जमा बेवारस वाहनांचा 26 एप्रिलला लिलाव

यवतमाळ दि. 25 एप्रिल (जिमाका) :- पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे 60 वाहने बेवारस स्थितीत पडुन असल्याने सदर वाहनाचे मुळ मालकाचा शोध घेतला असता वाहनाच्या मुळ मालकाचा पत्ता मिळुन न आल्याने सदर वाहनाचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ यांचे कडुन मुल्यांकन करण्यात आले आहे. बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव पोलीस स्टेशन, बाभुळगावचे शासकीय प्रांगणात उद्या 26 एप्रिल रोजी सकाठी 10 वाजुन 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. परवाना धारकांना लिलाव सुरु होण्याआधी अग्रीम निधी 1 लाख रुपये नगदी स्वरुपात जमा करावे लागतील याची नोंद घ्यावी. तसेच लिलावामध्ये मिळुन आलेली रोख रक्कम ही शासन जमा करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, बाभुळगांव यांनी कळविले आहे.

जिल्हा कारागृहात कैद्यांच्या अधिकारावर शिबिर

यवतमाळ,दि.२५ एप्रिल (जिमाका) राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा कारागृह यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने कैद्यांच्या अधिकाराविषयी 'प्ली बारगेनिंग' या विषयावर जिल्हा कारागृह,यवतमाळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कुणाल नहार,उपमुख्य विधीसहाय संरक्षण सल्लागार हर्षवर्धन देशमुख,सहाय्यक विधी सहाय संरक्षण सल्लागार पुष्पा जैन तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी अधीक्षक जिल्हा कारागृह एस.पी.काळे,अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश रेणुका मोरे, दिवाणी न्यायाधीश अजय दाणी तसेच सहाय्यक विधी सहाय्य संरक्षण सल्लागार अश्विन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कुणाल नहार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची व कार्याची माहिती उपस्थित कैद्यांना दिली.यामध्ये आरोपी करिता मोफत वकिलाची नेमणूक करण्यात येते.आरोपीस पॅनल वकिलांना कोणतीही फी.द्यावी लागत नाही.जिल्हा कारागृहांमध्ये मोफत सल्ला व मार्गदर्शन करिता पॅनल वकील तसे

सामाजिक न्यायपर्व अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा

यबतमाळ, दि 25 एप्रिल :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागव्दारे "सामाजिक न्यायपर्व" व "शासकीय योजनांची जत्रा” या उपक्रमाअंतर्गत सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यालयीन कर्मचारी, शासकीय निवासी शाळेतील कर्मचारी, गृहपाल व सर्व कर्मचारी, सर्व मागासवर्गीय महामंडळातील अधिकारी /कर्मचारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक तुषार नांदुरकर यांनी केले. भाऊराव चव्हाण, यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना अभ्यांगतासोबत कसे बोलावे व बोलताना नम्रपणे मार्गदर्शन कसे करावे, पत्रव्यवहार शासकीय नियमानुसारच करावा, सर्व कर्मचा-यांनी राजशिष्टाचाराचे पालन करावे, टिपणी कशी लिहावी, अभिलेख अदयावती करण व जतन, शासकीय रजांबाबत मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन अमित कापसे यांनी केले.

ताप अंगावर काढु नका -जिल्हा हिवताप अधिकारी यांचे आवाहन

जागतिक हिवताप दिन यवतमाळ, दि २५:- वातावरणातील बदलामुळे सद्यस्थितीत ताप येण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन महिण्यापासून पारेषण (पावसाळा) काळ सुरु होतो. या कालावधीत हिवताप, डेंग्यू व इतर किटकजन्य आजारात वाढ होत असते. त्यामुळे कोणताही ताप हा हिवताप, डेंग्यु, किंवा मेंदुज्वर असु शकतो. नागरिकांनी ताप आल्यास अंगावर न काढता त्वरीत डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी टी ए. शेख यांनी केले आहे. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत एप्रील महिन्यात २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच १ एप्रिल ते ३० एप्रिल संपूर्ण महिना हिवताप आजारा विषयी शहरी व ग्राम पातळीवर जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येते. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन दर दिवशी आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमाव्दारे नागरीकांपर्यत माहीती पोहचविण्याचा प्रयत्न करणे हा 'जागतिक हिवताप दिन" महिना साजरा करण्यामागचा मुख्य उददेश आहे. या वर्षाचे घोषवाक्य ''शुन्य मलेरीया वितरीत करण्याची वेळ : गुंतवणुक करा, नवीन करा, अंमलबजावणी करा." असे आ

रोजगार हमी योजना व शासकिय इमारतीचे बांधकाम करणा-या मजुरांची नोंदणी करावी जिल्हाधिकारी अमोल येडगे

सर्व उद्योगातील कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी यवतमाळ, दि २५ एप्रील जिमाका :- महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत १०० दिवस काम करणारे मजुर तसेच जल जीवन मिशन आणि शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू असणाऱ्या सर्व कार्यस्थळी काम करणाऱ्या बांधकाम मजुरांची नोंदणी ई- श्रम पोर्टलवर करण्यात यावी. यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद व नगरपंचायतने १०० दिवस काम केलेल्या मजुरांना प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावे. तसेच कंत्राटदाराने मजुरांची नोंदणी केल्याशिवाय त्यांचे देयके अदा करु नयेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कामगार अधिकारी व इतर अधिका-यांना दिल्यात. कामगार विभागाच्या सर्व योजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला, यावेळी त्यांनी सदर सुचना दिल्यात. या बैठकिला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, व इतर अधिकारी उपस्थित होते. इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मंडळाने जुलै 2020 पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व वि

कौशल्य विकास विभागातर्फे ४२३ जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

यवतमाळ दि. २४ एप्रिल ,(जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेमार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा २४ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान होणार आहे. स्थानिक पातळीवर तसेच बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी या कार्यालयाकडे नोंदविण्यात आलेली आहे. सदर मागणीच्या अनुसरुन जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणच्या कंपनीशी संपर्क साधून वैभव एन्टरप्रायजेस नागपूर, भुमी विकास इंडस्ट्रिज प्रा.लि.पुसद, पिपल ट्रि व्हेन्चर प्रा.लि.औरंगाबाद, टॅलेनसेतू प्रा.लि. पूणे या कंपनी मार्फत एकूण ४२३ रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान १२ वी.उत्तीर्ण झालेले इंजिनियरींग पदवी, पदविका, नर्सिंग पदवी, पदविका धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्याकडील सेवा योजना कार्डचा (एम्प्लॉयमेंट कार्ड) युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सदर मेळाव्य

राष्ट्रीय लोकअदालत ३० एप्रिलला

यवतमाळ,दि. २४ एप्रिल (जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यवतमाळ व जिल्हा वकील संघ,यांचे संयुक्त विद्यमाने ३० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता जिल्हा न्यायालय,यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुलीप्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येतात. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजीक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तरी सर्व पक्षकारांनी ३० एप्रिल रोजी आयोज

वातावरणातील बदलाबाबत वैद्यकिय अधिका-यांची कार्यशाळा

यवतमाळ, दि ५ एप्रिल :- वातावरणातील बदलाबाबत (climate change) जागृती निर्माण करणे. आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिका-यांसाठी कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह, यवतमाळ येथे करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालयचे सहयोगी प्राध्यपक डॉ सचिन दिवेकर व डॉ विजय डोंपले यांनी पॉवर पॉईंटद्वारे सदारीकरण केले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी. एस. चव्हाण व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आर. डी. राठोड यांनी मार्गदर्शन केले. वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर तसेच विविध आजारांच्या प्रमाणावर होतो, हे आता सर्वज्ञात झाले आहे. या विषयाचे महत्व लक्षात घेऊनच २०२०-२०२१ पासून राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानांमध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. वातावरणातील बदलाला संवेदनशील असणा-या आजारांना समर्थपणे तोंड देता यावे यासाठी सर्व नागरिकांसाठी आणि विशेषतः लहानमुले,