Posts

Showing posts from November, 2018

वनहक्क पट्टयांपासून एकही आदिवासी वंचित राहणार नाही

Image
v बिरसा पर्वामध्ये पालकमंत्र्यांचे प्रतिपादन यवतमाळ, दि. 18 : जल, जंगल, जमीनचे खरे रक्षणकर्ते हे आदिवासी बांधव आहे. आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना वनहक्क पट्टे देण्यात येईल. एकही आदिवासी यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. पोस्टल ग्राऊंडवर आयोजित ‘बिरसा पर्व’ च्या दुस-या दिवशी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, माजी अध्यक्षा आरती फोफाटे, अनिल आडे, मिलिंद धुर्वे, विकास कुळसंगे, राजेंद्र मरसकोल्हे, पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बिरसा पर्व आयोजन समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, पवन आत्राम आदी उपस्थित होते. बिरसा मुंडा यांची जयंती शासनस्तरावर साजरी व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, 29 डिसेंबर 2017 रोजी शासनाने परिपत्रक काढून संत सेवालाल, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, बिरसा मुंडा आणि स्वातंत्र्यवीर सावर

जेसीबी, पोकलँड मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Image
v नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून खरेदी यवतमाळ, दि. 18 : शेतक-यांच्या उत्पन्नात होण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, पांदण रस्ते आदी योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. आगामी काळात या योजना अधिक गतीमान पध्दतीने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नाविण्यपूर्ण योजनेतून जेसीबी मशीन, पोकलँड आदींची खरेदी केली आहे. या मशीनचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार शैलेश काळे, जलसंपदा यांत्रिकीकरण विभागाचे अधिक्षक अभियंता आर.एस. चव्हाण आदी उपस्थित होते. नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने तीन जेसीबी, चार पोकलँड मशीन, आठ टिप्पर, एक पिकअप व्हॅन आणि एक कन्व्हेंशन ट्रक

प्रलंबित कृषीपंप जोडणी 2019 पर्यंत पूर्ण करणार - पालकमंत्री मदन येरावार

Image
v रुई-वाई येथे 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण यवतमाळ, दि. 17 : आजच्या काळात वीज ही अत्यंत आवश्यक मूलभूत गरज झाली आहे. देशातील एकही गाव विजेवीना राहणार नाही, हे पंतप्रधानांचे ध्येय आहे. गत चार वर्षांत मोठ्या प्रमाणात शेतक-यांना सिंचनाकरीता कृषीपंप वीज जोडणी देण्यात आली आहे. तरीसुध्दा काही प्रमाणात देणे बाकी आहे. मार्च 2018 पर्यंत प्रलंबित असलेले सर्व कृषीपंप वीज जोडणी 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. रुई-वाई येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत नवीन 33/11 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण करतांना उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या रेणू शिंदे होत्या. यावेळी मंचावर रुई-वाईच्या सरपंचा रुपाली राऊत, विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य प्रशांत दर्यापूरकर, मनोज मॅडमवार, अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता अंगाईतकर, संजय चितळे, बाळासाहेब शिंदे, संजय शिंदे आदी उपस्थित होते. संपूर्ण राज्यात जवळपास सव्वादोन लाख कृषीपंपाचे कनेक्शन प्रलंबित आहे, असे सांगून पालकमंत्री मदन ये

तभाचे अनिरुध्द पांडे व एबीपीचे कपील श्यामकुंवर यांचा सत्कार

Image
v जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन यवतमाळ, दि. 16 : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दै. तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी अनिरुध्द पांडे व एबीपी माझाचे प्रतिनिधी कपील श्यामकुंवर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी   तर प्रमुख अतिथी म्हणून दै. हितवादचे प्रतिनधी दिनेश गंधे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन भागवते, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. यावेळी ‘डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान’ या विषयावर बोलतांना न.मा.जोशी म्हणाले, पत्रकारांसाठी आचारनिती असावी कि नसावी याची चर्चा 1966 पासून सुरू आहे. तसेच पत्रकारितेसमोरील आव्हानेसुध्दा कमी झाली नाहीत. बदलत्या काळानुरुप ती बदलत गेली. इंडियन प्रेस काऊंसिल स्थापन झाल्यानंतर त्याच्या कामाची अंमलबजावणी 16 नोव्हेंबरपासून करण्यात आली, त्यामुळे हा राष्ट्रीय प्रेस दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. डिजीटल युगामुळे सर्वच

गोवर-रुबेला लसीकरण जनजागृतीकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम

Image
v पाच आठवडे चालणार मोहीम v 9 महिने ते 15 वर्षांपर्यंत वयोगटातील सर्वांनी लसीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 16 : गोवर या रोगाचे निर्मुलन होण्याकरीता व रुबेला या रोगावर नियंत्रण मिळण्याकरीता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहीम पाच आठवडे चालणार असून या मोहिमेच्या जनजागृतीकरीता जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात रांगोळी स्पर्धा, हातावर मेहंदी काढून जनजागृती तसेच प्रभातफेरीच्या माध्यमातून संपूर्ण गावात लसीकरणाचा संदेश देणे आदींचा समावेश आहे. या मोहिमेत महागाव तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा येथे जनजागृतीबाबत नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावच्या सरपंचा छाया व-हाडे, उपसरपंच मोतीराम राठोड, शाळा समिती अध्यक्ष राजेश हरकरे, शाळेतील शिक्षक मुक्ता धर्माळे, दिलीप व्यवहारे, शंकर आडे, केंद्रप्रमुख ए.जे. देशमुख आदी उपस्थित होते. तसेच कायर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, महागाव येथील जिल्हा परिषद उच्च   प्राथमिक शाळा आणि दिग्रस येथील राष्

ई-पॉस मशीनमुळे 40 हजार क्विंटल धान्याची बचत

Image
v धान्य वितरणात आली   पारदर्शकता यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यात राशन कार्ड संगणकीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. जवळपास 90 टक्के शिधापत्रिका ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या संगणकीकरणामुळे धान्य वितरणात पारदर्शकता आली असून योग्य लाभार्थ्याला धान्य मिळत आहे. ई-पॉस मशीनच्या वापरामुळे तर लाभार्थ्यांना धान्य उचल करणे सोयीचे झाले असून आतापर्यंत 40 हजार क्विंटल धान्याची बचत झाली आहे. जिल्ह्यात एकूण 6 लक्ष 69 हजार 542 शिधापत्रिकाधारक तर   28 लक्ष 50 हजार 609 सदस्य संख्या आहे. यात अंत्योदय योजनेतील कार्डधारकांची संख्या 1 लक्ष 30 हजार 451, प्राधान्य योजनेतील 2 लक्ष 90 हजार 381, एपीएल शेतकरी कार्डधारकांची संख्या 93 हजार 994, केशरी कार्डधारक 1 लक्ष 33 हजार 932 आणि शुभ्र कार्डधारकांची संख्या 20 हजार 784 आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 52 स्वस्त धान्याची दुकाने आहेत. योग्य लाभार्थ्याला धान्य मिळावे, याकरीता जिल्ह्यातील संपूर्ण स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीन लावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 2052 ई- पॉस मशिनद्वारे लाभार्थ्याना धान्य वितरण करण्यात येत आहे. ऑनलाईन धान्य वाटपाची ही टक्

जलयुक्त शिवार, शेततळे, रिचार्ज शाफ्टचा सकारात्मक परिणाम जिल्ह्याच्या भुजल पातळीत सरासरी अडीच मीटरने वाढ

Image
यवतमाळ, दि. 13 : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे या महत्वाकांक्षी   योजनांसोबतच पाणी फाऊंडेशन आणि रिचार्ज शाफ्टमुळे जमिनीत पाणी मुरविण्यास यश आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी 22 टक्के पर्जन्यमान कमी होऊनसुध्दा जिल्ह्याच्या भुजल पातळीत सरासरी अडीच मीटरने वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्हा हा समुद्र सपाटीपासून साधारणत: 450 मीटर उंचावर आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 911.34 मी.मी. आहे. उंचावर असल्यामुळे पावसाचे पडलेले पाणी खालच्या भागात वाहून जात होते. मात्र यावर्षी जिल्ह्यात जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. पडलेला पाऊस जमिनीत मुरविण्यासाठी भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून रिचार्ज शाफ्ट करण्यात आले. तसेच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गावांनी सहभाग नोंदवून श्रमदानाची कामे केली. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन जिल्ह्याची भुजल पातळी वाढण्यास मदत झाली. गतवर्षी जिल्ह्यात   562.93 मी.मी (61.77 टक्के) पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्याची भुजल पातळी सरासरीपेक्षा अंदाजे तीन फूट खालावली होती. ऑक्टोबर 2017 म

दुष्काळग्रस्त माळरानावर जलयुक्तमधून मत्स्यशेती

Image
v गणेशवाडीमध्ये पाण्याच्या समृध्दीसोबतच शाश्वत उपजिविकेचे साधन यवतमाळ, दि. 2 : पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावर असलेल्या व काही प्रमाणात काळ्या बेसॉल्ट खडकाने आच्छादलेल्या गणेशवाडीला (ता.कळंब) नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागत होता. नागरिकांना पिण्याचे पाणी व जनावरांना चारापाण्याची सोय नसलेल्या गणेशवाडीमध्ये यावर्षी मात्र जलयुक्तच्या कामांमुळे पाण्याची समृध्दी आली आहे. गावक-यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असून माळरानावर असलेल्या या गावात गावकरी गटाने मत्स्यशेती करीत आहेत. गणेशवाडी हे गाव समुद्र सपाटीपासून 429 मीटर उंचीवर आहे. पिण्याच्या पाण्याच्या चार विहिरी, एक पॉवर पंप आणि सात हातपंप एवढे पाण्याचे स्त्रोत गावात उपलब्ध आहेत. मात्र माळरानावर असल्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी खालच्या भागात वाहून जात होते. त्यामुळे दरवर्षी गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. गतवर्षी जिल्ह्यात सर्वात पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर नोव्हेंबरमध्ये गणेशवाडीतच लागला. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गणेशवाडीमध्ये जलयुक्त शिवारची कामे हाती घेण्यात आली

कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन - पालकमंत्री

Image
बांधकाम कामगारांना निधी वाटप यवतमाळ, दि. 1 : शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात सर्वाधिक नोंदणी यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात 26 हजार कामगारांनी नोंदणी केली. ही मोहीम नियमितपणे सुरू आहे. कामगारांचा नोंदणी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामगारांच्या सर्व योजनांची माहिती घरपोच मिळण्यासाठी आता ही नोंदणी ऑनलाईन करण्याचे नियोजन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. पोस्टल ग्राऊंड येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी ‘गौरव श्रमाचा’ या कार्यक्रमांतर्गत निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. मंचावर जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, न.प.बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, संजय शिंदे, अमर दिनकर, विलास बावणे, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते. पृथ्वी ही कामगारांच्या हातावर उभी आहे, असे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते, असे सांगून पाल