Posts

Showing posts from September, 2018

सिमेवरील सैनिकांमुळेच देशातील नागरिकांचे रक्षण - अतिरिक्त जिल्हाधिकारी जाजू

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन       यवतमाळ, दि. 29 : भारतीय संस्कृती ही मूळातच शांतताप्रिय आहे. याचा अनुभव जगानेसुध्दा घेतला आहे. मात्र कोणी आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या सिमेवर असलेल्या बहादुर सैनिकांमुळे नागरिकांचे रक्षण होत असून त्यामुळेच आपण शांततेची झोप घेऊ शकतो, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालय येथील बळीराचा चेतना भवन येथे शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, फ्लाईट लेफ्टं. तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ, राजेंद्र डांगे, मनिष गंजीवाले आदी उपस्थित होते.             आजचे सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी कावा होय, असे सांगून अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू म्हणाले, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले. कोणत्याही देशाने भारताला कमजोर समजू नये. शांतताप्रिय असलो तरी इतर देशाची कुरघोडी भारत कदापी सहन करीत नाही.

विभागीय आयुक्तांनी घेतली लाभार्थ्यांची भेट

Image
यवतमाळ , दि. 29 : टाटा ट्रस्टच्या यांच्या माध्यमातून मनपूर (ता.यवतमाळ) येथे राबविण्यात येत असलेल्या विदर्भ मनोसामाजिक आधार व काळजी कार्यक्र मां तर्गत विभागीय आयुक्तांनी मानसिक रोगी असलेल्या लाभार्थ्यां ची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख , उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे , केमचे जिल्हा व्यवस्थापक देवानंद खांदवे, टाटा ट्रस्ट चे मानसिक आरोग्य तज्ञ प्रफुल कापसे, प्रणव पाटील आदी उपस्थित होते.         मनपूर येथील टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तणावग्रस्त शेतकरी व मानसिक रोगी व्यक्तीसाठी एप्रिल २०१६ पासून विदर्भ मनोसामाजिक आधार व काळजी कार्यक्रम यवतमाळ व घाटंजी मधील एकूण ६४ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तणावग्रस्त शेतकरी वा मानसिक रोगीची ओळख करुण त्यांना समुपदेशन व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे . तसेच गावांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे, गाव पातळीवर मानसिक आरोग्यासंदर्भात काम करण्यासाठी स्वयंसेवक व आरोग्यसेवक यांचे प्रशिक्षण घेणे तसेच समुपदेशन व उपचारातून बरे झालेल्या रुग्णांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुण

स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य उपयुक्त - उपमुख्य कार्य. अधिकारी जाधव

Image
v लोकराज्य वाचक अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन       यवतमाळ, दि. 29 : प्रशासनात मोठ्या प्रमाणात अधिकारी हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून येत असतात. या परिक्षेचा अभ्यासक्रम हा बहुतांशी निश्चित केला असला तरी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर बाबींचेसुध्दा ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुस्तकांसोबतच वृत्तपत्रे, मासिक आदींचा अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे त्यासाठी अतिशय उपयुक्त मासिक आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी केले.             वडगाव रोडस्थति वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकराज्य वाचक अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या प्रविणा आडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.             वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने विद्यार्थ्यांना इयत्ता 8 वीपासूनच स्पर्धा परिक्षेचा मार्

विभागीय आयुक्तांची शेततळ्यामधील मत्स्यउत्पादन नर्सरीला भेट

Image
यवतमाळ, दि. 28 : कृषी समृध्दी प्रकल्प (केम) आणि टाटा ट्रस्टच्या यांच्या माध्यमातून मनपूर (ता.यवतमाळ) येथे विकसीत करण्यात आलेल्या शेततळ्यामधील मत्स्यउत्पादन नर्सरीला विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय   अधिकारी स्वप्निल तांगडे, केमचे जिल्हा व्यवस्थापक देवानंद खांदवे आदी उपस्थित होते.             मनपूर येथील नर्सरीची पाहणी करतांना विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, शेततळ्यांमध्ये मत्स्यउत्पादन हा अतिशय अभिनव उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात साडेसहा हजारांच्या वर शेततळे निर्माण केले आहेत. यापैकी जवळपास एक हजार शेततळ्यांमध्ये मत्स्य्उत्पानदाचे नियोजन आहे. शेतक-यांनी याचा फायदा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.   तसेच बोटुकली तयार झाल्यावर कुठे देणार, यासाठी शेतक-यांना प्रत्येक बोटुकलीमागे किती पैसे दिले जाते, याची विचारणा विभागीय आयुक्तांनी केली.             तर केम आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार शेततळ्यांमध्ये मत्स्यउत्पादनासाठी 200 नर्सरी तयार करण्यात आल्य

18 वर्षांवरील सर्व मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक       यवतमाळ, दि. 28 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बघता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये बदल, सुचना, नवमतदारांची नोंदणी आदी बदल करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. यात काही बदल करावयाचा असल्यास तो आता करणे गरजेचे आहे. मतदानाच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे. तसेच 18 वर्षांवरील जिल्ह्यातील सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, स्वप्नील तांगडे, संदीप अपार, नितीन हिंगोले, स्वप्नील कापडनीस

केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर

Image
v सर्वांसाठी घरे व प्रत्येक घराला वीज प्राधान्याचे विषय v जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक       यवतमाळ, दि. 25 : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविणे हे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे काम आहे. सन 2022 पर्यंत प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे तर सौभाग्य योजनेंतर्गत 100 टक्के वीज कनेक्शन हे केंद्र शासनाचे प्राधान्याचे विषय आहेत. याशिवाय केंद्राच्या इतरही योजना महत्वाच्या असून या योजनांची सर्वांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.             नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार सर्वश्री मनोहर नाईक, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश

योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

Image
  यवतमाळ, दि. 24 : केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा कामगार अधिकारी श्री. धुर्वे आदी उपस्थित होते.             यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत दीड लक्षाच्या वर नागरिकांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र अजूनही काही लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे. उज्वला गॅस योजनेचा एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. गॅस एजन्सीने पात्र लाभार्थ्यांना त्वरीत गॅस कनेक्शन द्यावे. त्यासाठी पुरवठा विभागाने पात्र लाभार्थ्यांची यादी गॅस एजन्सीधारकांना उपलब्ध करून द्यावी. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनीसुध्दा दहा दिवसांत सर्व अर्ज प्रत्येक एजंन्सीला देणे आवश्यक आहे. वनश्री योजनेत असणा-

बँकांनी महिला बचत गटांचे खाते त्वरीत उघडावे

Image
आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले निर्देश       यवतमाळ, दि. 24 : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे. आज महिला प्रत्येकच बाबतीत सक्षम होत आहे. बचत गटाच्या माध्यमातून तर महिलांची मोठी शक्ती उदयास आली आहे. या माध्यमातून त्या अर्थकारणसुध्दा सांभाळत आहे. केंद्र व राज्य सरकार महिला बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करीत असतात. त्यामुळे बचत गटांचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांनी आपापल्या क्षेत्रातील महिला बचत गटांचे खाते बँकेत उघडण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी आढावा बैठकीत दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत आदी उपस्थित होते.             महिला सक्षमीकरण हे पहिले ध्येय आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बँकेकडून महिला बचत गटांना मिळणा-या कर्जापैकी 99.09 टक्के कर्जाची रक्कम बँ

जिल्ह्यातील 15 लक्ष नागरिकांना मिळणार लाभ - पालकमंत्री मदन येरावार

Image
v ग्रामीण आणि शहरी भागातील 3 लक्ष 86 हजार कुटुंब पात्र       यवतमाळ, दि. 23 : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांमध्ये आता आरोग्य आणि शिक्षण याचांसुध्दा समावेश झाला आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी या महत्वाकांक्षी योजनेचे लोकार्पण हा देशासाठी गौरवाचा क्षण आहे. आपल्या जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण 3 लक्ष 86 हजार 544 कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास 15 लक्ष नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.             नियोजन भवन येथे ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा’ शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्यो

येत्या दहा दिवसांत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी - किशोर तिवारी

Image
यवतमाळ, दि. 21 : खरीप पीक कर्ज वाटपाचे जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टापैकी सरासरी 54 टक्के कर्जवाटप झाले आहे. यात काही बँकांनी अतिशय उत्तम कामगिरी केली असून काही बँकाची कामगिरी मात्र निराशाजनक आहे. त्यामुळे या बँकानी उर्वरीत दिवसांत पीक कर्जवाटपाची गती वाढवावी, अशा सुचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंत घोडखांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, सहकारी संस्थेचे उपजिल्हानिबंधक गौतम वर्धन आदी उपस्थित होते.             पीक कर्ज वाटपात जिल्हा अव्वल आहे, असे सांगून किशोर तिवारी म्हणाले, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांनी कर्ज वाटपाची कामगिरी सुधारावी. या बँकांची कर्ज वाटपाची सरासरी अनुक्रमे 12 टक्के, 22 टक्के आणि 23 टक्के आहे. इतर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी 60 ते 70 टक्के कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्य

स्क्रब टायफस बरा होऊ शकतो……

विशेष लेख           यवतमाळ : अनेक रोगांची उत्पत्ती ही पावसाळ्यात होत असते. यात प्रामुख्याने मलेरिया, स्वाईन फ्लू, डेंगी या साथीच्या रोगांचा समावेश असतो. यावेळेस मात्र विदर्भात ‘स्क्रब टायफस’ या रोगाने थैमान घातले आहे. यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया आदी जिल्ह्यात कमीजास्त प्रमाणात या रोगाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या रोगाबाबत भितीचे वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र असे असले तरी वेळीच उपचार, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपाययोजना केल्या तर ‘स्क्रब टायफस’ पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे, ती केवळ अलर्ट राहण्याची.    ‘स्क्रब टायफस’ या आजाराची सर्वात प्रथम ओळख 1930 मध्ये जपानमध्ये झाली. जगातील अनेक डोंगराळ प्रदेशात या रोगाचे जीवाणू आढळतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भारत आणि नेपाळच्या पहाडी भागात या रोगाचे जीवाणू प्रामुख्याने निदर्शनास येतात. मात्र यावेळेस विदर्भात याचा शिरकाव झाला आहे. ‘स्क्रब टायफस’ हा एकप्रकारे प्रचंड तापाचा प्रकार असून साधारणत: पाण्याचा साठा असलेल्या जागी वाढणा-या ‘ओरिएंटा सुसुगामुशी’ नामक किड्याच्या चावण्यामुळे हा आजार होतो. प

विडूळ येथे एकाच छताखाली गणपती आणि मोहरम

Image
सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण * पोलिसांच्या प्रयत्नांना मिळाले यश यवतमाळ दि.17 : सध्या संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. येथील नालसाहेब देवस्थानात एकाच वेळेस गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यात येत आहे. गणेशाच्या मुर्तीच्या बाजूलाच मोहरमची सवारी असून सामाजिक सलोख्याचे हे दृष्य बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. येथील नालसाहेब देवस्थानचे अध्यक्ष जयराम डांगे यांची 4 थी पिढी मोहरम हा उत्सव परंपरेने साजरा करतात. त्यांच्या घराण्यामध्ये 134 वर्षापासून ही परंपरा सुरु आहे. स्वत:च्या मालकीचे असलेले हे देवस्थान आता सार्वजनिक झाले आहे. 21 जानेवारी 2015 रोजी या संस्थेची रितसर नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावर्षी गणेशोत्सव व मोहरम हे एकाच वेळेस साजरे करण्यात येत आहे. ही बाब हेरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सुचनेनुसार उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी 8 सप्टेंबर 2018 रोज

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी – पालकमंत्री येरावार

Image
v घोडखिंडी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ यवतमाळ दि.15 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘क्विट इंडिया’ सोबतच ‘क्लिन इंडिया’ चा नारा दिला होता. संत गाडगे महाराज यांनी गावागावात स्वच्छतेचा जागर केला. हे दोन्ही महात्मे स्वच्छतेचे दूत आहेत. गाव, जिल्हा, देश यांचा विकास करण्यासाठी स्वच्छता ही महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्यासाठी स्वच्छता ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. घोडखिंडी (पांढरी) येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत आयोजित श्रमदान स्वच्छतेसाठी या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, सदस्या रेणू शिंदे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चौधर, गटविकास अधिकारी अमित राठोड, गावचे सरपंच श्रीराम मंदीलकर, उपसरपंचा पुष्पा पातोडे आदी उपस्थित होते. येत्या 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेव

अंजूमन उर्दु हायस्कूलमध्ये लोकराज्य वाचक मेळावा

Image
यवतमाळ दि.14 : येथील अंजूमन उर्दु हायस्कूलमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांचा लोकराज्य वाचक मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाला उर्दु हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद अहसामूर रहीम, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, शाळेतील शिक्षक नदीम नियाजी, फिरोज खान, अब्दूल रफिक, नजमूल असरा, सबा नसरीन आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्याध्यापक मोहम्मद रहीम म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण मराठीत प्रसिध्द आहे. याचाच अर्थ ‘पढेंगे तो ही बचेंगे’ असा असून पुस्तक हाच विद्यार्थ्यांचा खरा मित्र आहे. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे मासिक मराठी भाषेशिवाय उर्दुमध्येसुध्दा प्रकाशित होत असते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. लोकराज्यमध्ये नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती, शासननिर्णय आदींची माहिती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उर्दु लोकराज्य वेळात वेळ काढून वाचणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना, धोरणात्मक निर्णय तसेच राज्यातील विविध विषयांवरच्या यशकथा यात समाविष्ट

किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Image
यवतमाळ दि.12 : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला व संबंधीत विभागांना सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,‍ निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मनिष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुर्योधन चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य डॉ.किशोर मोघे उपस्थित होते. यावेळी बोलतांना किशोर तिवारी म्हणाले, जिल्ह्यात सुरु असलेल्या 108 अॅम्बुलन्सबाबत आरोग्य विभागाने सुसूत्रता आणावी. ज्या गाड्या नादुरुस्त आहेत त्यांना त्वरीत दुरुस्त कराव्यात. साथिचे रोग विषबाधेचे रुग्ण आदींबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यांना जिल्हास्तरावरून नियमित सुचना द्याव्यात. तसेच अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कडक कार्यवाही करावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साथिच्या रोगाचे तसेच विषबाधेचे रुग्ण मोठ्या येतात. त्यांना योग्य उपचार देण्यासाठी डॉक्टरांन

लोकराज्यच्या विशेषंकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

Image
यवतमाळ दि.12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित झालेल्या सप्टेंबर महिन्याच्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे समृध्द महाराष्ट्राचे’ या विशेषंकाचे विमोचन जिल्हाधिकारी   डॉ.राजेश देशमुख यांच्याहस्ते मत्स्यव्यवसाय कार्यशाळेदरम्यान करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय शिकरे, सहायक आयुक्त सुखदेवे, केमचे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी नंदकिशोर इंगोले, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते. लोकराज्यचे या विशेषंकात राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्‌यवृत्ती योजना, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह योजना व वसतीगृह योजना, शेतीपुरक कौशल्य प्रशिक्षण, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांसह इतर योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या योजनांवर आधारीत यशकथांचा समावेशही या अंकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सदर अंक अत्य

नीलक्रांती योजनेतून शेतक-यांची आर्थिक क्रांती होणार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
v बचत भवन येथे मत्स्यशेती व्यवसायाबाबत कार्यशाळा यवतमाळ दि.12 : आपला जिल्हा हा संपूर्णत: खरीपाच्या शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाच्या संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतक-यांना शेती करावी लागते. अशा परिस्थितीत पारंपरिक शेती करतांना मस्त्यशेती, रेशीम, कुक्कुटपालन आदींचा विचार करणे गरजेचे आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे मत्स्यशेतीला जिल्ह्यात भरपूर वाव आहे. त्यामुळे नीलक्रांती योजनेंतर्गत मत्स्यशेतीच्या माध्यमातून शेतक-यांची आर्थिक क्रांती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त कार्यालय, कृषी समृध्दी प्रकल्प (केम) आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यशेतीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय शिकरे, सहायक आयुक्त सुखदेवे, केमचे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी नंदकिशोर इंगोले, भोपाळ येथील विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. बेलसरे आदी उपस्थित होते. मत्स्यशेती करण्यास जिल्ह्यातील शेतकरी उत

21 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मोतिबिंदु रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रीया

* जास्तीत जास्त रुग्णांनी नोंदणी करण्याचे आवाहन यवतमाळ दि.11: मोतिबिंदु मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत 21 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील मोतिबिंदु रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक तात्याराव लहाने व जे.जे.हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभाग प्रमुख रागिणी पारेख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मनिष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील 1 हजार मोतिबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाईल. शस्त्रक्रीयेस पात्र रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय एकूण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथे शस्त्रक्रीयेसाठी घेऊन जाण्यासाठी वाहनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रीया येथे करणे शक्य होणार नाही, अशा रुग्णांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालया

प्रसिध्द झालेल्या मतदार याद्या प्रत्येकाने बघाव्या - एसडीएम अपार

Image
* मतदान केंद्र 241 चापर्डा येथे चावडी वाचन यवतमाळ दि.11 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात 1 सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या याद्या त्रृटीरहित करण्यासाठी तसेच आपले नाव यादीत समाविष्ठ आले की नाही, याची खात्री करण्यासाठी प्रसिध्द झालेल्या याद्या प्रत्येकाने बघाव्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी केले. कळंब तालुक्यातील चापर्डा (मतदान केंद्र 241) येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आयोजित मतदार याद्यांच्या चावडी वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कळंबचे तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार वंदना वासनिक, चापर्डाच्या सरपंचा सरला खंडाते, ग्रामपंचायत सदस्य सुरेश उईके, मंडळ अधिकारी विजय शिवणकर, मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) हेमलता आत्राम आदी उपस्थित होते. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे सांगून उपविभागीय अधिकारी संदीप अपार म्हणाले, गावागावात मतदार याद्यांच्य