सिमेवरील सैनिकांमुळेच देशातील नागरिकांचे रक्षण - अतिरिक्त जिल्हाधिकारी जाजू



v जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन
      यवतमाळ, दि. 29 : भारतीय संस्कृती ही मूळातच शांतताप्रिय आहे. याचा अनुभव जगानेसुध्दा घेतला आहे. मात्र कोणी आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या सिमेवर असलेल्या बहादुर सैनिकांमुळे नागरिकांचे रक्षण होत असून त्यामुळेच आपण शांततेची झोप घेऊ शकतो, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालय येथील बळीराचा चेतना भवन येथे शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, फ्लाईट लेफ्टं. तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ, राजेंद्र डांगे, मनिष गंजीवाले आदी उपस्थित होते.
            आजचे सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी कावा होय, असे सांगून अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू म्हणाले, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केले. कोणत्याही देशाने भारताला कमजोर समजू नये. शांतताप्रिय असलो तरी इतर देशाची कुरघोडी भारत कदापी सहन करीत नाही. शस्त्रुंना योग्य वेळी योग्य प्रतिउत्तर देऊन भारत मोकळा होतो. येथे असलेल्या वीर माता, वीर पत्नी यांनी आपला मुलगा, पती देशाला दिला. त्यामुळेच आपला देश सुरक्षित आहे. अशा वीर मातांचा, पत्नींचा भारतीय जनतेला नेहमीच अभिमान राहील, असेही ते म्हणाले. यावेळी राजेंद्र डांगे यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
            यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंजनाबाई देविदास तायडे, अलकनंदा पुंजाजी सरोदे, राधाबाई रामकृष्ण बोरीकर, सत्वशिला साहेबराव काळे, मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुरांग, सुनिता प्रकाश विहिरे आणि स्नेहा विकास कुडमेथे या वीरमाता/ वीरपत्नी यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी तर संचालन बालाजी शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सैनिक कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी