किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा


यवतमाळ दि.12 : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला व संबंधीत विभागांना सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,‍ निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मनिष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुर्योधन चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य डॉ.किशोर मोघे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना किशोर तिवारी म्हणाले, जिल्ह्यात सुरु असलेल्या 108 अॅम्बुलन्सबाबत आरोग्य विभागाने सुसूत्रता आणावी. ज्या गाड्या नादुरुस्त आहेत त्यांना त्वरीत दुरुस्त कराव्यात. साथिचे रोग विषबाधेचे रुग्ण आदींबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यांना जिल्हास्तरावरून नियमित सुचना द्याव्यात. तसेच अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कडक कार्यवाही करावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साथिच्या रोगाचे तसेच विषबाधेचे रुग्ण मोठ्या येतात. त्यांना योग्य उपचार देण्यासाठी डॉक्टरांनी संवेदनशिल असावे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पिककर्ज, विज वितरण, आरोग्य विभाग आदींचा आढावा घेतला.
तर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आरोग्य विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्ह्यात शासकीय जागा पाहिजे असल्यास त्यांनी तसा प्रस्ताव त्वरीत पाठवावा, अशी सुचना केली. आरोग्य विभागाच्या इमारती बांधकाम संदर्भात डागडुजीच्या तक्रारी असल्यास त्रयस्त ऐजेंसीद्वारे सदर बांधकामाचे निरिक्षण करण्याचे आदेश द्यावे. खराब पाणीपुरवठ्यामुळे साथिच्या रोगांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे आरोग्य विभागाने संबंधीत इमारतीत पाण्याचा स्त्रोत त्वरीत दुरुस्त करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लोकसहभागातून स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, आदी सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केल्या.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी