दारव्हा येथे अवैध सावकारांवर धाड



सोने व चांदीच्या वस्तु तसेच दस्तऐवज जप्त
यवतमाळ, दि. 1 : अवैधरित्या सावकारी करणाऱ्या दाम्पत्याच्या दुकानावर धाड टाकून महत्वाचे दस्तऐवज व सावकाराकडे गहाण असलेल्या सोने-चांदीच्या वस्तु दारव्हा येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी जप्त केले आहे.
दारव्हा तालुक्यातील धुळापूर येथील बाबुसिंग बदुसिंग चव्हाण, प्रेमसिंग मानसिंग चव्हाण व मानसिंग बाबुसिंग चव्हाण यांनी दारव्हा येथील अवैध सावकार किशोर नानाजी चित्रीव व ज्योती किशोर चित्रीव हे पती-पत्नी अवैधरित्या सावकारी व्यवसाय करीत असल्याचे तक्रार केली होती. तसेच चित्रीव दाम्पत्याने सावकारी व्यवसायात चव्हाण कुटुंबियांची शेती हडपल्याची तक्रार सावकाराचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दारव्हा यांच्या कार्यालयाकडे 13 ऑगस्ट 2018 रोजी  केली होती. या तक्रारीच्या आधारावर सावकाराचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनात आज सकाळी 10.30 वाजता अवैध सावकारी संबंधाने महाराष्ट्र सावकारी  (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये चित्रीव दाम्पत्याच्या दारव्हा येथील निवासस्थानी व व्यावसायिक प्रतिष्ठान येथे एकाचवेळी झडती घेण्यात आली. या धाडी दरम्यान अवैध सावकारी संबंधात काही आक्षेपार्ह कागदपत्रे व पांढऱ्या पिवळ्या रंगाच्या धातुंच्या वस्तु/दागिणे ताब्यात घेण्यात आले आहे.
            सदर कार्यवाही उमरखेड येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तसेच जिल्हास्तरीय अवैध सावकारी नियंत्रक पथक यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सहाय्यक निबंधक एस.एस.भालेराव, प्रेम राठोड, एम.एम.अंबीलपुरे, आर.पी.राठोड, सहकार अधिकारी ए.आर.बांते, एस.आर.अभ्यंकर यांचा समावेश होता तर पंच म्हणून दारव्हा येथील मंडळ अधिकारी ए.एम.बेलसरे, तलाठी एन.पी.कोटावार यांच्यासह पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक इंदलसिंग चव्हाण, पोलीस शिपाई शेख वसीम, शितल मोहिते यांनी काम पाहिले.
अवैध सावकारी संदर्भात काही तक्रारी असल्यास संबंधीतांनी सावकाराचे  सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक  सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल कराव्यात, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी