Posts

Showing posts from January, 2019

अवैध दारु धंद्याविरोधात पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम

Image
Ø जिल्हाभरात 37 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त Ø 563 आरोपींना अटक       यवतमाळ, दि. 31 : जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारु धंद्याविरोधात पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविली. सदर मोहीम 19 जानेवारी ते 30 जानेवारी 2019 या कालावधीत राबविण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात 37 लक्ष 17 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात अवैध दारु व्यवसाय करणारे तसेच गावठी दारू निर्मिती करणा-या एकूण 563 जणांना अटक करण्यात आली आहे.             यवतमाळ जिल्ह्यात एकूण 31 पोलिस स्टेशन आहेत. जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारू धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश होता. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 550 केसेस दाखल करण्यात आल्या. यात 563 जणांवर कारवाई करून अटक करण्यात आली. तसेच 37 लक्ष 17 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल

मुद्रा बँकेच्या कर्जामुळे व्यवसायाला उभारी

Image
Ø आठवी उत्तीर्ण युवकाने थाटले हार्डवेअरचे दुकान       यवतमाळ, दि. 30 : एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवल असणे महत्वाचे आहे. कोणाजवळ ते असते आणि कोणाजवळ नाही. मात्र स्वत:च्या कार्यशक्तीवर विश्वास असेल तर भांडवल उभे करण्याचे मार्ग सापडतात. हाच आत्मविश्वास बाळगला पुसद तालुक्यातील पाळोदी येथील रवी रामराव राऊत         (वय 28) या तरुणाने. स्वत:च्या इच्छाशक्तीवर रवीने पुसद येथे हार्डवेअरचे दुकान थाटले. अर्थातच भांडवल उभारण्यासाठी त्याला मुद्रा बँकेच्या कर्जाची साथ मिळाली. एकप्रकारे या कर्जामुळेच रवीच्या व्यवसायाला उभारी मिळाली आहे. या दुकानाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतेच उद्घाटन केले.             12 व्या वर्षापासून पुसद येथील हार्डवेअरच्या दुकानात रवी नोकर म्हणून काम करीत होता. या व्यवसायाचा त्याला तब्बल 16 वर्षे अनुभव आहे. स्वत:च्या मालकीचे दुकान असावे, असे त्याला वाटत होते. मात्र त्यासाठी भांडवलाची आवश्यकता होती. भांडवलाशिवाय व्यवसाय उभारणे शक्य नाही, याची त्याला कल्पना होती. त्यातच त्याने सर्वात प्रथम यु-ट्यूब वर मुद्रा बँकेच्या कर्जाविषयी ऐकले. तेव्हाच ठरविले

निरोगी शरीरासाठी ऑक्सीजन पार्कचा लाभ घ्या – जिल्हाधिकारी

Image
Ø तालुका स्तरावर ऑक्सीजन पार्क निर्माण करण्याचे नियोजन        यवतमाळ, दि. 28 : वन विभागाच्या वतीने शहरालगत निर्माण करण्यात आलेला ऑक्सीजन पार्क हा नागरिकांसाठी आहे. केवळ सहा महिन्यात ही संकल्पना पूर्णत्वास आली, याचा विशेष आनंद आहे. आजच्या काळात शुध्द हवा मिळणे कठीण झाले आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी ऑक्सीजन पार्कचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.             शहरालगत अमोलकचंद विधी महाविद्यालयासमोर साकारण्यात आलेल्या ऑक्सीजन पार्कचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक पी.जी. राहुरकर, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, सहायक वनसंरक्षक विपूल राठोड, मकरंद गुजर, अनंत दिगोळे आदी उपस्थित होते.              शहरातील नागरिकांसाठी शुध्द हवेकरीता एखादा पार्कअसावा, या उद्देशाने ऑक्सीजन पार्कची संकल्पना सर्वात प्रथम मे-जून महिन्यात मनात आली, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, गतवर्षीच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत 1 जुलै

अनेक महत्वाकांक्षी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री मदन येरावार

Image
Ø अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन साजरा Ø अधिका-यांचा गावागावात मुक्काम हे सुशासनाचे उदाहरण       यवतमाळ, दि. 26 : केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या लोकोपयोगी निर्णयाचा फायदा नागरिकांना मिळत आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिका-यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.             पोस्टल ग्राऊंडवर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते. गावागावातील पांदण रस्ते लोकसहभागातून मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यातील 6705 हेक्टर वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये

जिल्ह्यात मतदारांच्या संख्येत 1 लक्ष 8 हजाराने वाढ – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Image
Ø जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिन       यवतमाळ, दि. 25 : गत सहा-सात महिन्यांपासून जिल्ह्यात दोषविरहित मतदार याद्या निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी अभियान राबविणे सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 1 लक्ष 8 हजार नवीन मतदारांची वाढ झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, तहसीलदार शैलेश काळे, निवडणूक विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर तथा हास्य कवी सम्राट मिर्झा रफी अहमद बेग आदी उपस्थित होते.               निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार हा महत्वाचा घटक आहे. मतदारांमध्ये जनजागृती क

गावात अधिका-यांच्या मुक्कामाने विकासाला चालना

Image
Ø नववर्षात रोहदा येथे मुक्काम करून जिल्हाधिका-यांनी घालून दिला आदर्श Ø आतापर्यंत जवळपास वीस अधिका-यांनी मुक्कामी राहून साधला संवाद यवतमाळ, दि. 21 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाच्यावतीने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील जवळपास एक हजार गावांचा कायापालट करण्याचे नियोजन आहे. यवतमाळ जिल्ह्यात 36 गावांमध्ये हे अभियान सुरू असून ग्राम विकासासाठी आता अधिकारी गावागावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधत आहे. एकप्रकारे या अभिनव उपक्रमामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे. नववर्षाच्या सुरवातीलाच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यातील रोहदा येथे मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधला होता. जिल्हाधिका-यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे अनुकरण इतरही अधिकारी करीत आहे. आतापर्यंत जवळपास वीस अधिका-यांनी वेगवेगळ्या गावात मुक्काम केला आहे. यातून आरोग्य, शिक्षण, कृषी असे अनेक विषय निकाली निघत असून गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात यश येत आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी रोहदा येथे मुक्काम केल्यानंतर लोणी गावात गटविकास अध

कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीवर भर – पालकमंत्री येरावार

Image
Ø पोस्टल ग्राऊंड येथे रोजगार मेळावा यवतमाळ, दि. 21 : भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील 70 टक्के लोकसंख्या ही 25 ते 35 या वयोगटातील आहे. हीच देशाची खरी ताकद आहे. देशातील युवक-युवतीच्या हाताला काम देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी कौशल्य विकास ही योजना राबविण्यात येत आहे. एकप्रकारे शासनाचा कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीवर भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. पोस्टल ग्राऊंड येथे दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता अभियान आणि शासकीय औद्योगिक संस्था यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, खासदार भावना गवळी, अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक पी.बी. हरडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख महेश सिडाम आदी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, प्रत्येकाच्या अंगी विशिष्ट गुण असतात

नागरिकांचा मतदान प्रक्रियेत विश्वास वाढवा – जिल्हाधिकारी

Image
Ø मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 16 : लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे. आगामी निवडणुकांत जास्तीत जास्त   मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे हे शासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय कार्यालये, सामाजिक संघटना व इतर महामंडळांच्या आस्थापनेवर मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. या मतदार जागरुकता मंचच्या माध्यमातून नागरिकांचा मतदान प्रक्रियेत विश्वास वाढवावा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय बेले, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर आदी उपस्थित होते.             निवडणुकात मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, प्रत्येक आस्थापनेवर मतदार जागरुकता

विद्युत विभागाच्या नवीन इमारतीमुळे ‘उर्जा’ मिळणार

Image
Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन इमारतीचे भुमिपूजन यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्याला प्रकाश देणारे कार्यालय म्हणून विद्युत विभागाची ओळख आहे. नागरिकांना प्रकाशमय करतांनाच अधिकारी व कर्मचा-यांमध्ये उर्जा असणे आवश्यक आहे. येथे असलेली जुनी इमारत अपु-या सुविधांमुळे आंधारात होती. मात्र आता नवीन इमारत पुरेशा हवा, पाणी आणि नैसर्गिक प्रकाशसह सुसज्ज होत आहे. एकप्रकारे या नवीन इमारतीमुळे ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याची ‘उर्जा’ अधिकारी व कर्मचा-यांना नक्कीच मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. अमरावती परिमंडळ अंतर्गत यवतमाळ मंडळ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ मंडळाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) कविता देशभ्रतार, योगेश वारके, वास्तुशास्त्र विशारद किशोर चिद्दरवार आदी उपस्थित होते. उर्जा विभागात काम करतांना अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये उर्जा असली पा

स्वच्छतेबाबत वारक-यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन - सीईओ जलज शर्मा

Image
Ø स्वच्छतेचा जागर जिल्हास्तरीय कार्यशाळा यवतमाळ, दि. 15 : वारक-यांचे भजन – कीर्तन, त्यांचा नागरिकांशी होणारा संवाद याचा मोठा प्रभाव समाज मनावर असतो. वारकरी चळवळीच्या माध्यमातून चांगले लोकप्रबोधन होत असल्यामुळे स्वच्छतेबाबत वारक-यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ­‘स्वच्छतेचा महाजागर’ या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, हभप श्यामसुंदर महाराज, भागवताचार्य हभप गुलाबराव राऊत, हभप प्रभुदास शिरभाते, हभप पुरुषोत्तम इंगोले, हभप घोगरे महाराज, हभप लक्ष्मण तराळकर, पद्माकर महाराज, मांगीलाल बुटीकर, गोपणे महाराज आदी उपस्थित होते. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण राज्यात स्वच्छतेचा जागर

गोवर-रुबेला लसीकरणाबाबत पालकांची शंका दूर करा

Image
Ø जिल्हाधिका-यांचे शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना Ø लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा यवतमाळ, दि. 15 : आरोग्य विभागाच्या वतीने 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर – रुबेलाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील काही शाळांनी यात उत्तम सहभाग नोंदविला आहे. मात्र अजूनही काही शाळांची कामगिरी   निराशाजनक आहे. विशेषत: उर्दु माध्यमांच्या शाळांमध्ये लसीकरण होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या लसीकरणाबाबत पालकांच्या मनात असलेल्या शंका त्वरीत दूर कराव्यात. यासाठी आरोग्य विभागाने अशा शाळांमध्ये जनजागृती करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात गोवर-रुबेला लसीकरणाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी मनोज तगलपल्लीवार, समन्वयक डॉ. चव्हाण आदी उपस्थित होते. मुलांच्या निरोगी भविष्यासाठी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घेतला पांढरकवडा येथे विविध विषयांचा आढावा

Image
यवतमाळ, दि. 15 : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पांढरकवडा येथील नगर पालिकेच्या सभागृहात विविध विषयांचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्षा वैशाली लहाणे, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, अण्णासाहेब पारवेकर, पंचायत समिती   सभापती मेसेवार, उपसभापती बोडेवार, सदस्य शिला मेश्राम, राकेश नेमणवार, संतोष चिंतावार, शंकर सामृतवार आदी उपस्थित होते.             जिल्ह्यात रेती घाट बंदीबाबत चर्चा करतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, शासनाने पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आलेली रेती घरकुल योजनेकरीता वापरण्यात येत आहे. पालिका क्षेत्रात विद्युत खांब कनेक्शनसाठी बाकी आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितल्यावर मार्च 2018 पर्यंतचे   सर्व कनेक्शन पूर्ण करण्यात येतील. तसेच ज्या गावांनी प्रथम डिमांड भरली आहे, त्या गावाला प्राधान्याने प्रथम कनेक्शन द्यावे, अशा सुचना त्यांनी विद्युत विभागाच्या अधिका-यांना केल्या. यावेळी पांढरकवडा शहरातील अंडरग्राऊंड विद्युत लाईनबाबत चर्चा झाली.             प्रधानमंत्

जिल्ह्यातील शेतक-यांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद

Image
लोकसंवाद कार्यक्रमात नऊ शेतकरी व्हीसीद्वारे थेट ‘लाईव्ह’ यवतमाळ, दि. 14 : कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी        शेतक-यांशी थेट संवाद साधला. माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 9 शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांसोबत व्हीसीद्वारे बोलले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात पार पडला. मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणा-यांमध्ये दिग्रस तालुक्यातील विठोली येथील रविंद्र राऊत, किन्ही (ता.केळापूर) येथील अभय कट्टेवार, अंबोडा (ता.आर्णि) येथील माधव राऊत, मादणी (ता.बाभुळगाव) येथील वच्छला गर्जे, सुकळी (ता.उमरखेड) येथील अशोक वानखेडे, राजचांदणा (ता.यवतमाळ) येथील अरविंद बेंडे, वडगाव (ता.दिग्रस) येथील भाऊराव भुसंगे, दोनाडा (ता.कळंब) येथील माणिक कदम आणि घाटंजी तालुक्यातील पारडीनस्करी येथील संजय निकडे या शेतक-यांचा समावेश होता. मादणी येथील वच्छला गर्जे यांनी शेतीमध्ये फळबाग, सामूहिक शेततळे, गटशेती या कृषी विभागाच्या योजनांचा फायदा कसा झाला याबाबत माहिती दिली. शेततळ्यांच्या पाणीसाठ्यामुळे शेतातील सिताफळ, आंबा, म

साहित्यिकांनी मांडलेल्या विचारांवर समाज उभा -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Image
                             * 92 व्या अ. भा. साहित्य संमेलनाचा समारोप यवतमाळ, दि. 13 : भारतीय समाज हा विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशात विखुरलेला आहे. अशा समाजात विविध मते तयार झालेली असतात, होत राहतात. भारतीय संस्कृती मुल्याधिष्ठित असणे, हे आपले वैशिष्ट्य आहे. ते साहित्य, संस्कृती, कला आणि कवितेतून मिळालेले आहे. साहित्यिकांनी मांडलेल्या विचारांवर समाज उभा आहे. लोकशाहीत मतभेद असणे गैर नाहीत, पण मनभेद असू नयेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यवतमाळ येथे आयोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. तीन दिवस श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमालाही रसिकांची गर्दी झाली होती. समारोप कार्यक्रमाला पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष मदन येरावार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, आमदार डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, उद्घाटक वैशाली येडे, महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. विद्या देवध