यवतमाळ पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने मार्गी लावा


Ø मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Ø मंत्रालयात आढावा बैठक
यवतमाळ, दि. 8 : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेच्या पाईप लाईनचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यवतमाळ शहराला व समाविष्ट आठ गावांना बेंबळा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळमधील टंचाई परिस्थिती पाहता शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी पाईपलाईनची कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी नियोजन करावे.
यावेळी पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, पाणीपुरवठा योजनेचे काम पाईपलाईन अभावी रखडले आहे. त्यामुळे पाईप पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीने तातडीने पाईप पुरवठा करावे, जेणेकरून काम लवकर पूर्ण करता येईल.
००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी