Posts

Showing posts from August, 2022

राष्ट्रीय लोकअदालतच्या माध्यमातून 34 विभक्त जोडपे आले एकत्र

Ø पाच ते दहा वर्ष जुनी 154 प्रकरणे निकाली Ø मोटार अपघात प्रकरणात रुपये 63 लाख नुकसान भरपाई यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :- पती-पत्नीचे वैवाहिक वादाबाबतच्या प्रकरणात बऱ्याच कालावधीपासुन विभक्त राहत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील 34 कुंटुंब राष्ट्रीय लोकअदालतीच्या मध्यस्थीने आपसी वाद तडजोडीने मिटवून एकत्र नांदावयास आली आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांनी संपुर्ण यवतमाळ जिल्हयामध्ये दिनांक 13 ऑगस्ट,2022 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्य मार्गदर्शनात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये आपसी सामंज्यास्याने 34 विभक्त कुटूंब एकत्र आले तसेच पाच ते दहा वर्ष जुनी 154 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी सन 2005 चे सगळ्यात जुने प्रकरण देखील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये निकाली काढण्यात आले.याशिवाय पुसद न्यायालयातील मोटार अपघात नुकसान भरपाईच्या प्रकरणामध्ये रुपये 63 लाख नुकसान भरपाई म्हणुन अपघातामध्ये मृत्यु पावलेल्या पिडीतांचे वारसदारांना विमा कंपनीकडुन मंजूर करण्यात आले. “राष्ट्रीय लोकअदालतमुळे जुने प्रकरणे निकाली निघतात तसेच दुराव

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना

प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या राज्यातील शासन मान्यताप्राप्त अनुदानित/ विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुपये दोन लक्ष अनुदान देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या 7 ऑक्टोंबर 2015 च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी उपरोक्त नमूद शाळा/ संस्थांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी, जैन या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या किमान 70 टक्के तसेच शासनमान्य खाजगी दिव्यांग शाळांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या किमान 50 टक्के असणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेले अभ्यासक्रम चालविणाऱ्या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयं –अर्थसहाय्यित शाळा या योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असणार नाहीत. महानगरपालिका व जिल्हा

सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
महिला शेतकऱ्यांचा ऑर्गानिक प्रमाणपत्र देऊन सन्मान यवतमाळ, दि २२ (जिमाका) :- सेंद्रीय शेतमालाला येणाऱ्या काळात सर्वाधीक मागणी राहणार आहे तसेच प्रक्रीया केलेल्या शेतीउत्पादनांना चांगला भाव मिळतो त्यामुळे सेंद्रीय शेतीमालावरील प्रक्रीया उद्योग त्याचे ब्रॅन्डींग व पॅकिंग आत्मसात करून जास्तीत जास्त मार्केट कॅप्चर करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. उमेद अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पामधील सेंद्रिय शेती उपक्रम अंमलबजावणीसाठी महिला शेतकऱ्यांचा लोकल ग्रूप तयार करण्यात आला आहे. तीन वर्षाचा कालावधी पुर्ण करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ऑर्गानिक प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वय डॉ. नेमाडे, उमेदचे निरज नखाते, प्रगतीशील शेतकरी तसेच लोकल ग्रुपच्या महिला शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. विचारपुर्वक गुंवणूक व नियोजनपुर्वक कामे करण्यात महिला आघा

मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Image
यवतमाळ, दि २२ (जिमाका) :- देशहिताचे विकासात्मक निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याचे काम मतदानाच्या माध्यमातून आपण करतो व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे देशाच्या विकास प्रक्रीयेत सहभागी होतो. लोकशाही बळकटीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा तसेच मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी आपल्या मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांकाची जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. मतदार ओळखपत्र व आधार जोडणीची विशेष मोहिम 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आहेआर्णी रोड येथील जगदंबा अभियांत्रीकी महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत आधार जोडणीचा कार्यक्रमाची आज सुरूवात करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय स्तरावर ही शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणार झाल्टे, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नेवे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक केल्यामुळे एका व्यक्तीचे कोण

कोविडमुळे निराधार झालेली बालके शाळाबाह्य होणार नाहित याची काळजी घ्या - जिल्हाधिकारी यांच्या सुचना

Image
जिल्ह्याला बाल न्याय निधीमध्ये 55 लाख प्राप्त, 164 बालकांना मदत रस्त्यावर सापडलेत 287 बालक यवतमाळ, दि २२ (जिमाका) :- कोवीडमुळे निराधार झालेल्या बालकांना त्यांच्या वयोमानानुसार शाळेत प्रवेश देण्यात आलेला आहे. मात्र कौटुंबिक अडचणी किंवा सामाजिक अडचणीमुळे यापुढे ही बालके शाळाबाह्य होणार नाहीत याची काळजी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा कृती दल समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची मासिक बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बैठकीला विधिक सेवा प्राधिकरण चे सचिव के. के. नाहर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर डी राठोड, मुख्याधिकारी माधुरी मडावी, चाईल्डलाईनचे दिलीप दाभोळकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वसुदेव डायरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एल आगाशे, फाल्गुन पालकर, माविमचे रंजन वानखेडे, आर के काझी,

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्याचा निर्णय

मुंबई, दि. 18 : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती. मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल. हा आदेश केवळ या वर्षीसाठी (वर्ष 2022) लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस

Image
यवतमाळ, दि.18 ऑगस्ट (जिमाका) :: दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना सद्भावना दिनाची शपथ देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कौशल्य विकास विभागातर्फे 19 ते 28 ऑगस्ट दरम्यान

ऑनलाईन रोजगार मेळावा यवतमाळ, दि.18 ऑगस्ट (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांचे वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 19 ते 28 ऑगस्ट 2022 दरम्यान केले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम नोंदवावा. किमान 12 वी पास उमेदवारांना सेवायोजन कार्य चा युझरेनेम व पासवर्ड ने लॉगीन करून या मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता 07232-244395 या क्रमांकावार संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

अन्नप्रक्रिया उद्योग योजना जनजागृती पंधरवडा

यवतमाळ, दि.18 ऑगस्ट (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (PMFME) ही योजना राज्यात सन 2020-21 पासून पाच वर्षासाठी म्हणजे सन 2024-25 पर्यंत राबविण्यात शासनाने मान्यता दिली आहे. योजनेच्या जनजागृतीसाठी 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान कृषी प्रक्रिया जागृती पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविली जाणार आहे. योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी संसाधन व्यक्ती यांचा मुख्य समारंभात प्रशस्तीपत्र देवून सत्कार होईल. 25 पेक्षा जास्त प्रस्ताव मंजूर करणाऱ्या संसाधन व्यक्तींची त्यासाठी निवड होईल. पंधरवडा साजरा करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली आहे. या दरम्यान सर्व प्रस्ताव जिल्हा संसाधन व्यक्तींना वाटप होतील. तृटीची पूर्तता करून याच पंधरवाड्यात प्रस्ताव बँकेला सादर केले जातील. योजनेची उद्दिष्टे : कार्यरत असलेल्या वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था स्वयंसहायता गट व उत्पादक सहकारी संस्था यांची पतमर्यादा वाढविणे. उ

क्षयरोग निर्मुलनाकरीता दानशुरांनी सहकार्य करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.18 ऑगस्ट :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील क्षयरुग्णांना मदत उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगसमुह, स्वयंसेवी संस्था व दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. भारत सरकारने सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने शासन क्षयरुग्णांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देवून त्यांना औषधोपचार मिळवून देत आहे. उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना शासनामार्फत प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजने अंतर्गत 500 रुपयांची मदत थेट बॅक खात्यामध्ये दिली जात आहे. परंतु या व्यतीरिक्त क्षयरुग्णांना अतिरिक्त मदत देण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, डायग्नोस्टीक मदत, व्होकेशनल मदत या स्वरुपातील मदत उद्योगसमुह, सामाजिक संस्था व दानशुर यांनी करावी असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. ही मदत उपचार सुरु असणाऱ्या क्षयर

“महारथी महाराष्ट्राचे” पुस्तक सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध ग्रंथालयांनी 31 ऑगस्ट पर्यंत मागणी करावी

यवतमाळ, दि.18 ऑगस्ट (जिमाका) : “महारथी महाराष्ट्राचे भाग-2” या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 13 डिसेंबर 2021 राज्यपाल भगत सिंह कोशारी यांच्या शुभ हस्ते राजभवन येथे आयोजीत केलेल्या ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रमात करण्यात आले होते. “महारथी महाराष्ट्राचे भाग-1 व भाग-2” या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील शुरविरांची माहिती शौर्यगाथा लिखीत आहे. तसेच शौर्यपदक विजेते सैन्यातील जवान, पोलीस आणि नागरीकांची माहिती आहे. या पुस्तकांची किंमत प्रत्येकी रुपये 300 असून भाग-1 व भाग-2 ची एकूण किंमत रुपये 600 आहे. हे पुस्तक प्रत्येक ग्रामीण / शहरी ग्रंथालयात ठेवल्यास महाराष्ट्रातील महारथींच्या त्याग व शौर्य गाथेची ओळख शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, व जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत पोहंचेल तसेच देशभक्तीची भावना भावी पिढीत प्रज्वलीत होईल. याकरीता जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या संख्येनुसार पुस्तकाची मागणी एकत्रीतरित्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ यांच्याकडे दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांन

प्रकल्पस्तरीय जागतिक आदिवासी गौरव दिन पुसद येथे उत्साहात साजरा

यवतमाळ,दि.18 :-“भारतीय स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव” व “जागतिक आदिवासी गौरव दिन” निमित्त “प्रकल्पस्तरीय जागतिक आदिवासी गौरव दिन” समारंभ दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालयात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास विभागाचे माजी आयुक्त संभाजी सरकुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आले, अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे हे होते. कार्यक्रमात आदिवासी सेवक रामकृष्ण, चौधरी,शामरावजी व्यवहारे, नारायण क-हाळे, भगवान डाखोरे, श्रीराम अंभोरे यांच्यासह आदिवासी समाजासाठी गौरवास्पद कार्य केलेल्या व्यक्तींचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच प्रकल्प कार्य क्षेत्रातील अनुदानित आश्रमशाळांचे संस्थाचालक, गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचाही पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संभाजी सरकुंडे यांनी आपल्या भाषणात प्रत्येकाने शिक्षण घेवून स्वत:चा सर्वांगीण विकास करुन घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर आत्माराम धाबे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाव्यतीर

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यत पोहचवावा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
पुसद प्रकल्प कार्यालयात घेतला विविध योजनांचा आढावा यवतमाळ, दि. 18 ऑगस्ट :- पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांनी आज भेट देवून प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. पारधी विकास योजना, स्वाभिमान व सबळीकरण योजना, घरकुल योजना यांची तात्काळ अंमलबजावणी करुन गरजू आदिवासी व पारधी लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत निर्देश दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे व प्रकल्प कार्यालयाचे इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येणाऱ्या तसेच प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे व शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी प्रकल्प कार्यालय, शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहे येथील भुसंपादन व बांधकामाबाबत आढावा जिल्हाधिकारी यांनी घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेंतर्गत कामांची अंमलबजावणी संबंधीत य

कृषी मंत्री अब्दुल सत्तार 20 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यात

यवतमाळ, दि. 18 ऑगस्ट (जिमाका) : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे 20 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12 वाजता राळेगाव तालुक्यातील मौजे झाडगाव येथे तसेच दुपारी 2 वाजता उमरखेड तालुक्यातील मौजे मालेगाव येथे कृषी मंत्री भेट देवून अतिवृष्टीग्रस्त भागाची व पिकांची पाहणी करतील व तद्नंतर ते नांदेडकडे प्रयाण करतील.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय यवतमाळ यांचे तर्फे पदयात्रेचे आयोजन

यवतमाळ,दि.१७ ऑगस्ट:(जिमाका) - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांचे आदेशावरून जिल्हा विधी सेवा प्रधिकरण जिल्हा न्यायालय यवतमाळ यांचे तर्फे दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३ वाजता स्वातंत्राचा अमृत मोहत्सवानिमित्य घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्याचा संदेश देण्याकरीता पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर पदयात्रा रॅलीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी केले.सदर पदयात्रा रॅलीमधे यवतमाळ मुख्यालयातील न्यायिक अधिकारी,वकील मंडळी कर्मचारी व पॅरा विधी स्वंयसेवक,अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. ७५ मिटर लांबीचा तिरंगा खांद्यावर घेत ही पदयात्रा शहरातील मुख्य मार्गावरून आणि चौका चौकातून मार्गक्रमण करत जिल्हा न्यायालय ते पोस्ट ऑफीस चौक,एल.आय.सी चौक ते जिल्हा न्यायालयत येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.सदर पदयात्रेमध्ये घरोघरी तिरंगा लावण्याबाबत व स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जिल्‍ह्यात 3 सप्टेंबर पर्यंत स्‍टार्टअप यात्रेचे आयोजन

यवतमाळ, दि. 17 ऑगस्ट : राज्‍यातील नागरिकांच्‍या नाविन्‍यतापुर्ण संकल्‍पना आणि नवउद्योगांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी कौशल्‍य, रोजगार, उद्योजकता व नाविन्‍यता विभागामार्फत महाराष्‍ट्र राज्‍य नाविण्‍यपुर्ण स्‍टार्टअप धोरण 2018 अंतर्गत महाराष्‍ट्र स्‍टार्टअप आणि नाविन्‍यता यात्रेचे यवतमाळ जिल्‍हयात आयो‍जन करण्‍यांत आले आहे. यवतमाळ जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुक्‍यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व निवडक महाविद्यालये येथे दिनांक १७ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्‍टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्‍यांसाठी एक मोबाईल व्‍हॅन पाठविणार आहे. सदर मोबाईल व्‍हॅन सोबत असलेल्‍या प्रतिनिधीव्‍दारे नागरिकांना या यात्रेबाबतची संपुर्ण मा‍हिती, नविन्‍यपुर्ण संकल्‍पना व त्‍याचे विविध पैलू तसेच विभागामार्फत राबविल्‍या जाणा-या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्‍यात येणार आहे. याचबरोबर नाविन्‍यपूर्ण कल्‍पना असलेल्‍या नागरिकांची नोंदणी करुन यात्रेच्‍या पुढील टप्‍प्‍याबाबत माहिती सुद्धा पुरविण्‍यांत येईल. नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक २३ ऑगष्‍ट २०२२ रोजी स्‍टार्टअप या

समूह राष्ट्रगीत गायन : यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

Image
यवतमाळ, दि. 17 ऑगस्ट (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘स्वराज्य महोत्सवांतर्गत आज सकाळी 11 वाजता यवतमाळ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदे, पोलीस मुख्यालय, सर्व शासकीय कार्यालये, सर्व तहसिल, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खाजगी आस्थापना यासह विविध ठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या समुह राष्ट्रगीत गायनासाठी नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला, विशेषत: दहा हजार लोकवस्तीच्या ढाणकी नगरपंचायत क्षेत्रात तब्बल सात हजार नागरिकांनी समुह राष्ट्रगीत गायन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे समूह राष्ट्रगीत गायनप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा सूचना अधिकारी राजेश देवते, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीरे आयोजित करा आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

Image
Ø रेशीम शेती वाढवण्यासाठी अभ्यासगट Ø बाजारपेठची माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची समिती Ø प्रगतीशील शेतीची माहिती प्रसारित करा Ø गावोगावी बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी वाढवावी Ø मधमाशी व शेततळ्यातून मत्स्यपालन वाढवण्याचे नियोजन करावे यवतमाळ, दि. 17 ऑगस्ट (जिमाका) : कमी खर्चात चांगले उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असून येथे रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढविण्याच्या नियोजनासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत (आत्मा) एक अभ्यास समिती स्थापन करावी व समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना रेशीम शेती सोबतच बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी, मधमाशी पालन व शेततळ्यातून मत्स्य उत्पादनाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. आत्मा नियामक मंडळाची सभा आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक एस.यु.नेमाडे, नियामक मंडळाचे

शहीद किशोर कुनगर स्मारकाला भेट

Image
नेर तालुक्यातील उत्तर वाढोणा येथे शहीद किशोर कुनगर यांच्या शहीद स्मारकाला जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ येथे भेट देऊन अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शहीद किशोर कुनगर यांच्या आईची आस्थने विचारपूर केली तसेच शहीद स्मारकाचे देखभाल दुरूस्तीबाबत तहसिलदार यांना सूचना दिल्या.

वृक्षसंवर्धनातून पुढील पीढीसाठी हिरवळ जोपासा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वृक्षरोपण यवतमाळ, दि. 14 ऑगस्ट (जिमाका) :- नवीन झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे व आपल्या गावातील हिरवा परिसर पुढील पिढीसाठी जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे विशेषत: युवकांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज सप्ताहात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन शपथ कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. याअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते यवतमाळ जवळील किन्ही व नेर तालुक्यातील बोरगाव (लिंगा) येथे वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रंसगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पंकज भोयर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, गटविकास अधिकारी केशव गड्डापोळ, सरपंच (किन्ही) ज्ञानेश्वर गोहाडे, सरपंच (बोरगाव) प्रवीण आडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १४ कोटी मुल्याची ७७२१ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

Image
यवतमाळ दि. 14 ऑगस्ट (जिमाका) : यवतमाळ जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 2543 प्रलंबीत व 5178 वादपुर्व अशी एकूण सात हजार 721 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य रूपये 14 कोटी चार लाख 51 हजार 619 आहे. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत २०८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशावरुन 13 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा न्यायालय येथे त्यांचे हस्ते राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के. ए. नहार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अमित बदनोरे, तसेच जिल्हा न्यायालय यवतमाळचे न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार उपस्थित हो

फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त’ आयोजित प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन

Image
यवतमाळ, दि.14 ऑगस्ट (जिमाका) :- 14 ऑगस्ट या 'फाळणी दु:खद स्मृती दिन' निमित्त यवतमाळ शहरातील नगरभवन येथे आयोजित चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नगरपालीकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, अभियंता देशमुख, उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी देशाची फाळणी झाल्यामुळे फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेले बलिदान, सहन केलेले अत्याचार, दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 00000

अतिवृष्टीग्रस्तांना नवीन निकषानुसार तात्काळ मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू - मंत्री संजय राठोड

नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करण्याच्या प्रशासनाला सूचना यवतमाळ दि.१३: यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार तात्काळ मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही मंत्री संजय राठोड यांनी दिली असून प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा ना. संजय राठोड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे प्रामुख्याने उपस्थित होते. ना. संजय राठोड यांनी शेती नुकसानी सोबतच इतर शासकीय मालमत्ता हानीचाही आढावा घेतला व झालेल्या नुकसानीचा अहवाल त्या-त्या विभागाने सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचे व ती रक्कम पूर्णपणे व्यवस्थित

पदयात्रेच्या माध्यमातून 'घरोघरी तिरंगा' फडकवण्याचा संदेश शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रेचे मार्गक्रमण 75 फूट तिरंगा ध्वज ठरला पदयात्रेतील आकर्षण

Image
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पदयात्रेत सहभाग यवतमाळ दिनांक 12 ऑगस्ट जिमाका:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'घरोघरी तिरंगा' ध्वज फडकवण्याचा संदेश देण्यासाठी आज सकाळी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. 'वंदे मातरम' आणि 'जय हो' सारख्या देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण पदयात्रेमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चौका - चौकात पदयत्रेत सहभागी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 75 मीटर लांबीचा तिरंगा या पदयात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, शासकीय कार्यालय तसेच खाजगी कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरावर तिरंगा ध्वज फडकवावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज सकाळी साडे

अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये

यवतमाळ,दि.12 आँगस्ट जिमाका:- शासनाची मान्यता नसलेल्या अनधिकृत संस्था प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यता प्राप्त आहे असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात व नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निर्दशनास येते. कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधी प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थी व पालक यांनी महाराष्ट्र शासन यांची मान्यता व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांची सलग्नता नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये. अनधिकृत संस्थेच्या भुलथापांना,त्यांच्या खोट्या दाव्यांना व जाहिरातींना बळी न पडता संस्था व अभ्यासक्रमाची मान्यता शासनाच्या वा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://msbsd.edu.in तपासून खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडाळामार्फत विविध ३६ गटात (sector) कौशल्य व्यवसाय शिक्षण (vocational education) व व

रानभाजी महोत्सवाचे १७ ऑगस्टला आयोजन

यवतमाळ,दि.१२ ऑगस्ट जिमाका :- मानवी आरोग्यासाठी सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व असल्याने विविध भाज्यांचा आहारात समावेश आवश्यक आहे. सद्यस्थितीत रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे , रानफळांचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आत्मा अंतर्गत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र यवतमाळ येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन होत आहे. सदर कार्यक्रम सकाळी ११ वाजता मंत्री संजय राठोड तसेच विधानसभा व विधान परिषद सदस्य यांचे उपस्थितीत होणार आहे. सदर महोत्सवाचा यवतमाळच्या जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा,असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी नियोजन करावे -जिल्हाधिकारी

Image
जिल्ह्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग मिल्स ने सर्व शेतकऱ्यांना कामगंध सापळे उपलब्ध करावे यवतमाळ, दि 11 ऑगस्ट, जीमाका:- यवतमाळ जिल्ह्यात मागील काही वर्षापासुन गुलाबी बोंड अळीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागिल वर्षी कापूस पिकाचा हंगाम लांबला असून जिनिंग मिल मध्ये कापूस साठवण्यात आलेला आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जिनिंग व प्रेसिंग मिल्सच्या माध्यमातुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी बियाणे कंपन्या आणि जिनिंग व प्रेसिंग मिल्स यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कामगंध सापळे वाटप करावे. तसेच कामगंध सापळे वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. जिनिंग मिल्स तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्रे यांनी स्वखर्चातून त्यांच्या किमान दोन किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना कामगंध सापळे व ल्तुर्सची उपलब्धता करून द्यावी. बियाणे व निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी कंपनी सामाजिक दायित्व निधीतून शेतकऱ्यांना कामगंध सापळे उपलब्ध करून द्यावे. कृषी सहाय्यक, कृषी अधिकार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 'जीवन गाणे गातच जावे' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Image
यवतमाळ, दि ११ ऑगस्ट जिमाका :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी बांधवांचे मनोरंजनच्या माध्यमातून प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित नानेटकर यांच्या चमूने नृत्य व देशभक्तीपर गीत बंदिवानांसमोर सादर केले. या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, कीर्ती राऊत, क्रांती धोटे, स्मिता भोईटे, माया शेर, आकाश घुरट, विक्रांत कोटक, विशाल डहाके,नितीन भुतडा, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्रीधर काळे, तुरुंगाधिकारी धनंजय हुलगुडे उपस्थित होते. यावेळी बंदी जणांना शुभेच्छा देताना कीर्ती चिंतामणी म्हणाल्या की, आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. या स्वातंत्र्याची महती, त्याचा इतिहास आपल्याला माहीत व्हावा, त्यातुन आपल्याला प्रेरणा घेता यावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हा

आपसी तडजोडीने वाद मिटविण्यासाठी लोकअदातीचा लाभ घ्यावा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांचे आवाहन राष्ट्रीय लोकअदालत 13 ऑगस्ट रोजी

यवतमाळ दि.१० ऑगस्ट जिमाका :- भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यात आनंद खरा, सामंजस्याने वाद मिटवणं यातच खरं शहाणपण, त्यासाठी विधी सेवा प्रधिकरणाच्या मदतीने आपसी वाद मिटविण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी केले आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालय तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय,कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅंका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायधिश तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत 'माझा दाखल खारीज - माझा अधिकार' उपक्रम Ø ५ मिनीटात ५००० दाखल खारीज उतारे वाटप Ø पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचा अभिनव उपक्रम

Image
यवतमाळ, दिनांक 10 ऑगस्ट :- शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी बालक जेव्हा शाळेत नाव नोंदणीसाठी जातो, तेव्हा त्याची सर्वप्रथम नोंद होते ती दाखल खारीज रजिस्टरला. विद्यार्थ्यांची नोंदणी कधी, कोणत्या वर्गात झाली, याचा शालेय स्तरावर एक अभिलेख असतो, तो म्हणजे दाखल खारीज रजिस्टर. विद्यर्थ्याचे स्वतःचे वय व अधिवास प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी हमखास लागणारे कागदपत्र म्हणजे दाखल खारिज रजिटर होय. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'माझा दाखल खारीज - माझा अधिकार' हा अभिनव उपक्रम राबवत ५ मिनीटात ५ हजार दाखल खारीज उतारे आज वाटप केले. खरेतर दाखल खारीज व खारीज ह्या दोन बाबी भिन्न आहेत. प्रवेश घेताना त्याची नोंद दाखल या रकान्यात व विद्यार्थी शाळा सोडून इतर शाळेत जातो त्यावेळी खारीज या रकान्यात नोंद केली जाते. विद्यार्थ्यांची शाळेत नाव नोंदणी केली जाते. तो दररोज शाळेतही जातो. पण त्याच्याकडे शाळेत नोंदणी, कधी झाली याचा काहीही शासकीय पुरावा राहत नाही. हल्ली शाळेत ओळखपत्र दिले जाते. परंतु ते त्या एका वर्षासाठी ग्राह्य मान

नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा निष्काळजीपणे मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
पूर परिस्थितीचा घेतला आढावा यवतमाळ, दि १० ऑगस्ट :- वर्धा नदीच्या उगमक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे अप्पर वर्धा आणि निम्नवर्धा धरणातून वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पुढिल काही तसात बेंबळा प्रकल्पात येणाऱ्या येव्यानुसार धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. विशेष करून वणी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभुळगाव या तालुक्यातिल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अलर्ट मोडवर काम करावे. गरज पडल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठीचे नियोजन करून ठेवावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आज आपत्ती व्यवस्थापन संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिल्यात. सद्यस्थितीत बेंबळा प्रकल्पातून विसर्ग कमी झालेला असला तरी मध्य प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सध्या अप्परवर्धा धरण 88 टक्के भरले असून त्यातून 3800 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्याचबरोबर निम्न वर्धा धरणातून 3549.82 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणाती

मानव विकास कार्यक्रमातून जास्त रोजगार निर्मिती करणारे प्रस्ताव सादर करा Ø तालुका स्पेसिफीक योजना राबविणार Ø प्रत्येक तालुक्याला 2 कोटी निधी Ø मधाचे गाव विकसित करा

Image
यवतमाळ, दि. 10 ऑगस्ट : जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुका स्पेसिफीक योजना राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 2 कोटी निधी वितरीत करण्यात येणार असून त्यातून उत्पन्नात वाढ करणारे, मुल्यवर्धक व जास्तीत जास्त रोजगार निर्मिती देणारे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मानव विकास कार्यक्रम योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी यांनी घेतला. याप्रसंगी मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी अ.वि.सुने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, माविमचे रंजन वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते. मानव विकास कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश असून प्रत्येक तालुक्याला 2 कोटी प्रमाणे एकूण 18 कोटी निधी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या तालुक्यांसाठी विशेष योजना तयार करतांना महिला बचत गट, लोक संचलित साधन केंद्र, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती / जमातीचे शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासी वन धन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट, आदिवासी सहकारी संस्था, मच्छिमार सहकारी संस्था व इतर स