दाखल प्रकरणात कायदा व नियमानुसार कारवाई करणार -जिल्हाधिकारी अमोल येडगे

· सौहार्दाचे वातावरणावर गावकऱ्यांनी दर्शविला विश्वास · फिर्यादीच्या घरी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांची भेट · प्रकरणाचा तपास आय पी एस दर्जाच्या अधिका-याकडे सुपुर्द · चुकिच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन · कारला येथे ऐक्य परिषदेचे आयोजन यवतमाळ, दि २ ऑगस्ट :- कारला गावातील नागरिकांनी शांतता व सौहार्द राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. दाखल झालेल्या गुन्ह्यात कायदा व नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच या प्रकरणाचा तपास आय पी एस दर्जाच्या अधिका-याकडे सुपुर्द करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारला येथे घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत गावकऱ्यांना सांगितले. पुसद तालुक्यातील कारला येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आणि प्रसार माध्यमात येत असलेल्या माहितीची खातरजामा करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिस अधिक्षक दिलिप भुजबळ पाटिल यांनी आज कारला गावाला भेट दिली. तसेच गावात फिरुन घडलेल्या घटनेबद्दल गावकऱ्यांना बोलते केले. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना उचित कार्यवाहीबाबत आश्वस्त केले. गावात घडलेल्या घटनेबद्दल बाहेर चुकिच्या पद्धतिने माहिती दिली जात असल्याचे नागरिकांनी त्यांना सांगितले. यावेळी गावात ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, नियमानुसार तपास सुरू असतानाही विविध माध्यमातून वेगवेगळी माहिती येत असल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी, तपास योग्य दिशेने सुरू आहे की नाही हे बघण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. गावातील नागरिकांनी गावाच्या विकासावर आणि समृद्धीवर लक्ष द्यावे. चुकिच्या माहितीवर वुश्वास ठेवू नये. जिल्ह्यातील शांतता व सौहार्द बिघडण्यासाठी अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ म्हणाले कि, बाबासाहेबांची गाणी वाजविण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला, गावातील सरपंचाने मारहाण केली अशी माहिती काही माध्यमातुन पसरविली जात आहे. मात्र गावामध्ये सर्व लोकांशी संवाद साधल्यानंतर अशी कोणतीही बाब नसल्याचे दिसुन आले आहे. या प्रकरणात नोंद झालेल्या गुन्ह्यात नियमानुसार चौकशी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे पोलीस विभागाचे लक्ष आहे. गावकऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गावात पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येईल. गावकऱ्यांना कोणतीही मदत लागल्यास किंवा माहिती द्यायची असल्यास त्यांनी नि:संकोचपणे पोलीस विभागाशी संपर्क साधावा. तसेच या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी साक्षीदारांनी तपासाला सहकार्य करावे. गावातील ऐक्य आणि सलोख्याला बाधा पोहोचणार नाही यासाठी गावकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन दिलीप भुजबळ पाटील यांनी केले. हरिभाऊ पुलाते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तिन हजार लोकवस्तीच्या या गावात सर्व समाजाचे नागरिक गुण्या गोविंदाने राहतात. गावामध्ये बंधुभाव व एकोपा असुन यापूर्वी कधीही या गावात अशी घटना घडलेली नाही. गावातील नागरिकांचा शांतता आणि सौहार्दावर विश्वास असून दुकानात किंवा गिरणीवर सर्वांना समान वागणूक दिल्या जात आहे अशी माहिती दिली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तपास अधिकारी आदित्य मिरखेलकर व प्रदीप पाडवी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, उपविभगिय अधिकारी व्यकट राठोड, तहसिलदार श्री. चव्हाण, पोलीस निरीक्षक मोतीराम बोडके,उपस्थित होते. याप्रसंगी रुखमाबाई चव्हाण, सुशीला पवार, हरिभाऊ नागोजी टाळकुटे, माणिकराव धारणे, रविदास देवकते, विनोद राठोड, बंडू राठोड, गणेश, तानाजी, सुभाष राठोड जेष्ठ नागरिक शामराव पवार, सुरेश ढोले, श्री मेश्राम, हरिभाऊ चव्हाण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी