राखी विक्रीसाठी बचत गटांना विनामुल्य जागा उपलब्ध

इच्छुकांनी कृषी विभागाकडे 5 ऑगस्टपुर्वी अर्ज करण्याचे आवाहन यवतमाळ, दि 1 ऑगस्ट (जिमाका) :- कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र (मॉल), बस स्थानक चौक, यवतमाळ येथील इमारतीमधील परिसरात रक्षाबंधन निमित्त राखी विकणे, भाऊबहिणीसाठी असलेले भेटवस्तु विकणे यासाठी आत्मा अंतर्गत बचत गटांना विविध दुकाने स्टॉल लावण्यासाठी ७ दिवस विनामुल्य जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. ईच्छुक बचत गट, महिला बचत गट यांनी दिनांक ५ ऑगस्ट २०२२ पावेतो कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता अर्ज सादर करावेत. सदर अर्ज कृषि विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ, शासकिय रुग्णालयाजवळ येथील कार्यालयात सादर करावेत. तरी जास्तीत जास्त बचत गट, महीला बचत गटांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असल्याचे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी