जिल्‍ह्यात 3 सप्टेंबर पर्यंत स्‍टार्टअप यात्रेचे आयोजन

यवतमाळ, दि. 17 ऑगस्ट : राज्‍यातील नागरिकांच्‍या नाविन्‍यतापुर्ण संकल्‍पना आणि नवउद्योगांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी कौशल्‍य, रोजगार, उद्योजकता व नाविन्‍यता विभागामार्फत महाराष्‍ट्र राज्‍य नाविण्‍यपुर्ण स्‍टार्टअप धोरण 2018 अंतर्गत महाराष्‍ट्र स्‍टार्टअप आणि नाविन्‍यता यात्रेचे यवतमाळ जिल्‍हयात आयो‍जन करण्‍यांत आले आहे. यवतमाळ जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुक्‍यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व निवडक महाविद्यालये येथे दिनांक १७ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्‍टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्‍यांसाठी एक मोबाईल व्‍हॅन पाठविणार आहे. सदर मोबाईल व्‍हॅन सोबत असलेल्‍या प्रतिनिधीव्‍दारे नागरिकांना या यात्रेबाबतची संपुर्ण मा‍हिती, नविन्‍यपुर्ण संकल्‍पना व त्‍याचे विविध पैलू तसेच विभागामार्फत राबविल्‍या जाणा-या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्‍यात येणार आहे. याचबरोबर नाविन्‍यपूर्ण कल्‍पना असलेल्‍या नागरिकांची नोंदणी करुन यात्रेच्‍या पुढील टप्‍प्‍याबाबत माहिती सुद्धा पुरविण्‍यांत येईल. नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक २३ ऑगष्‍ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा बाबत जनजागृती करणारी व्‍हॅन जिल्‍हाधिकारी कार्यायलयात दाखल होईल मा. जिल्‍हाधिकारी यांना स्‍टार्टअप यात्रेच्‍या प्रयोजनाचे माहिती देऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था यवतमाळ तसेच शहरातील नामांकीत महाविद्यालयांना भेट देऊन नागरिकांना स्‍टार्टअप बाबत संपूर्ण माहीती देण्‍यात येईल. याच दिवशी तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेटी देऊन स्‍टार्टअप बाबत माहिती देण्‍यात येईल. दिनांक १७ ऑगष्‍ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा महागावतालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. दिनांक १९ ऑगष्‍ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा उमरखेड तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. दिनांक २२ ऑगस्ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा नेर तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा यवतमाळ व दारव्हा तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल.दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा आर्णी आणि दिग्रस तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा पुसद तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा बाभूळगाव तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा कळंब आणि राळेगाव तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ रोजी स्‍टार्टअप यात्रा मारेगाव आणि वणी तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल.दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ रोजी झरी (जामणी) आणि केळापूर (पांढरकवडा) तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. त्यानंतर दिनांक ०३ सप्टेंबर २०२२ रोजी घाटंजी तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल. स्‍टार्टअप यात्रेचे वेळापत्रक व भेटीची ठिकाणे याबाबत अधिक माहितीसाठी संबधीत तालूक्‍याचे शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍थाचे प्राचार्य किंवा जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या कार्यालयाच्‍या दूरध्‍वनी क्रमांक०७२३२- २४४३९५ किंवा ८३७९८९८७९८ या भ्रमणध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्‍त जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी