रानभाजी महोत्सवाचे १७ ऑगस्टला आयोजन

यवतमाळ,दि.१२ ऑगस्ट जिमाका :- मानवी आरोग्यासाठी सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व असल्याने विविध भाज्यांचा आहारात समावेश आवश्यक आहे. सद्यस्थितीत रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे , रानफळांचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आत्मा अंतर्गत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र यवतमाळ येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन होत आहे. सदर कार्यक्रम सकाळी ११ वाजता मंत्री संजय राठोड तसेच विधानसभा व विधान परिषद सदस्य यांचे उपस्थितीत होणार आहे. सदर महोत्सवाचा यवतमाळच्या जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा,असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी