राष्ट्रीय लोकअदालतच्या माध्यमातून 34 विभक्त जोडपे आले एकत्र

Ø पाच ते दहा वर्ष जुनी 154 प्रकरणे निकाली Ø मोटार अपघात प्रकरणात रुपये 63 लाख नुकसान भरपाई यवतमाळ, दि. 23 (जिमाका) :- पती-पत्नीचे वैवाहिक वादाबाबतच्या प्रकरणात बऱ्याच कालावधीपासुन विभक्त राहत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील 34 कुंटुंब राष्ट्रीय लोकअदालतीच्या मध्यस्थीने आपसी वाद तडजोडीने मिटवून एकत्र नांदावयास आली आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांनी संपुर्ण यवतमाळ जिल्हयामध्ये दिनांक 13 ऑगस्ट,2022 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्य मार्गदर्शनात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये आपसी सामंज्यास्याने 34 विभक्त कुटूंब एकत्र आले तसेच पाच ते दहा वर्ष जुनी 154 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी सन 2005 चे सगळ्यात जुने प्रकरण देखील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये निकाली काढण्यात आले.याशिवाय पुसद न्यायालयातील मोटार अपघात नुकसान भरपाईच्या प्रकरणामध्ये रुपये 63 लाख नुकसान भरपाई म्हणुन अपघातामध्ये मृत्यु पावलेल्या पिडीतांचे वारसदारांना विमा कंपनीकडुन मंजूर करण्यात आले. “राष्ट्रीय लोकअदालतमुळे जुने प्रकरणे निकाली निघतात तसेच दुरावलेले व्यक्ती एकत्र येतात. राष्ट्रीय लोकअदालतमुळे पैसा, वेळ हा सुध्दा वाचतो” असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी