गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी नियोजन करावे -जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील सर्व जिनिंग व प्रेसिंग मिल्स ने सर्व शेतकऱ्यांना कामगंध सापळे उपलब्ध करावे यवतमाळ, दि 11 ऑगस्ट, जीमाका:- यवतमाळ जिल्ह्यात मागील काही वर्षापासुन गुलाबी बोंड अळीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागिल वर्षी कापूस पिकाचा हंगाम लांबला असून जिनिंग मिल मध्ये कापूस साठवण्यात आलेला आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जिनिंग व प्रेसिंग मिल्सच्या माध्यमातुन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी बियाणे कंपन्या आणि जिनिंग व प्रेसिंग मिल्स यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कामगंध सापळे वाटप करावे. तसेच कामगंध सापळे वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. जिनिंग मिल्स तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्रे यांनी स्वखर्चातून त्यांच्या किमान दोन किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना कामगंध सापळे व ल्तुर्सची उपलब्धता करून द्यावी. बियाणे व निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी कंपनी सामाजिक दायित्व निधीतून शेतकऱ्यांना कामगंध सापळे उपलब्ध करून द्यावे. कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर गुलाबी बोंड अळीच्या नियोजनाबाबत व व्यवस्थापनाबाबत जनजागृती करावी अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. ग्रामस्तरावर कृषी संजीवनी समित्यांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी व जनजागृतीसाठी सहभाग घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात काल बोंड आळी नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सदर सूचना केल्यात. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ जिनिंग व प्रेसिंग मिल्सचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे १)अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी सारखे फुले हे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे विशेष लक्षण आहे त्यालाच 'डोमकळी' असे म्हणतात. २) वाढ अवस्थेतील हिरव्या बोंडावर कोषा अवस्थेत जाण्याकरिता कळी बाहेर पडल्याचे छोटे छिद्र. ३) उमलललेल्या बोंडामध्ये प्रादुर्भावाजवळ रंगीत कापूस आढळणे. ४) अर्धवट उमललेली किडकी सरकी असलेली प्रादुर्भावग्रस्त बोंडे ५)गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त बोंडातील कापूस हलक्या दर्जाचा असतो.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी