बाल न्याय मंडळ आढावा बैठक संपन्न

यवतमाळ, दि 3 ऑगस्ट बाल न्याय अधिनियम २०१५ व मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशने बाल न्याय मंडळ,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व बाल संरक्षण कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने यवमाळ जिल्ह्यातील बाल न्याय व्यवस्थेत काम करणारी यंत्रणा यांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सभागृह येथे २० जुलै रोजी पार पडली. बैठकीची प्रस्तावना बाल न्यायमंडळ प्रमुख सु.वि.लाड (प्रमुख्‍ बाल न्यायदंडाधिकारी) यांनी मान्यवरांचे स्वागत करून केली. बैठकीचे सुत्रसंचालन काजल कावरे यांनी केले व मागील बैठकीचे इत्तीवृत चे वाचन देवेंद्र राजूरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले. बैठकीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश अनिल सुब्रमण्यम यांनी बालकारिता बालस्नेही वातावरण निर्मिती बाबत सर्व पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या तसेच बाल न्याय मंडळ येथील प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याबाबत निर्देश दिले. प्रत्येक उपविभाग स्तरावर बाल कल्याण पोलीस अधिकारी यांचे प्रशिक्षण राबविण्यात यावे याबाबत संबधित विभागाला त्यांनी सुचना दिल्या. सदर बैठकीत न्यायदंडाधिकारी डी.एस.थोरात, विधी सेवा प्रधिकणाचे सचिव कुणाल नहार, बाल कल्याण सिमिती सदस्य श्रीमती निलावार, श्रीमती आदे, श्रीमती शिरुफुले, परीविक्षा अधिकारी विनोद चौगुले, शासकीय निरीक्षणगृह अधिक्षक गजानन जुमळे, रविंद्र गजभिये, विजया पंधारे, महेश हळदे, अविनाश पिसुर्डे, माधुरी पावडे, स्वप्निल शेटे व सुनिल बोक्से, राजू भगत तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी