शेतकऱ्यांनी दुकानांचा लाभ घ्यावा

यवतमाळ, दि 1 ऑगस्ट (जिमाका) :- जिल्हा नियोजन निधी नावीन्यपुर्ण योजनेअंतर्गत कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे शेतातील माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविणेकरीता हक्काची जागा/बाजरपेठ दुकानगाळे उपलब्ध करून देण्यासाठी कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र मधिल 4 दुकानगाळे व्यवस्थापन समिती मार्फत उपलब्ध करण्यात येत आहे. सदर दुकानगाळे आत्मा अंतर्गत नोंदणी असलेले शेतकरी गट,फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना प्रायोगिक तत्वावर 5 महीन्याकरीता भाड्याने देण्याचे नियोजन आहे. ईच्छुक शेतकरी गट,महिला बचत गट,फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता अर्ज सादर करावेत. सदर अर्ज कृषी विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ येथे सादर करावेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी गट, महीला बचत गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी