मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी मतदार ओळखत्र जोडा आधार क्रमांकाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ, दि २२ (जिमाका) :- देशहिताचे विकासात्मक निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी निवडण्याचे काम मतदानाच्या माध्यमातून आपण करतो व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे देशाच्या विकास प्रक्रीयेत सहभागी होतो. लोकशाही बळकटीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा तसेच मतदार यादी अधीक सक्षम बनविण्यासाठी आपल्या मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांकाची जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. मतदार ओळखपत्र व आधार जोडणीची विशेष मोहिम 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आहेआर्णी रोड येथील जगदंबा अभियांत्रीकी महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत आधार जोडणीचा कार्यक्रमाची आज सुरूवात करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय स्तरावर ही शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणार झाल्टे, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नेवे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक केल्यामुळे एका व्यक्तीचे कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम राहील तसेच डुप्लीकेट नावे राहणार नाही. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज 6-ब तयार करण्यात असून तो निवडणूक आयोगाच्या eci.gov.in आणि https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन असून त्याद्वारे देखील आपण स्वत: आपला आधार क्रमांक मतदार ओळखपत्राला जोडू शकतो. युवा वर्गाने आपले व आपले नातेवाईक तसेच शेजारी यांचे आधार लींक करण्यासाठी एकमेकांना मदत करावी मतदार ओळखपत्र व आधार जोडणी चा संदेश सर्व समाजात द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाला निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जगदंबा महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी