आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा

यवतमाळ दि.3 ऑगस्ट (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ९ ऑगस्ट जागतिक आदवासी दिन निमित्त राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव गुणगौरव कार्याक्रमाचे आयोजन दिनांक ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ कालावधीत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,अमरावती येथे करण्यात आले आहे.या निमित्त महोत्सवात पुढील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्रयवीरांच्या कुटुंबाचा गौरव,आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद कामगिरी केलेल्या आदिवासी व्यक्तीचा/विद्यायार्थ्यांचा गौरव,आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री,रानभाज्या स्टॉल,खाद्यपदार्थ,बचतगट,वनधन केंद्र,वनौषधी स्टॉल.तसेच आदिवासी पारंपारिक नृत्य कलेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्रयवीरांच्या कुटुंबाचा तसेच आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद कामगिरी केलेल्या आदिवासी व्याक्तीचा/विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,रोखबक्षीस देवून गौरव करण्यात येणार आहे.तसेच उपरोक्त विविध कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना प्रमाणपत्र,मानधन व इतर देय भत्ते शासनमान्य प्रचलित दरा प्रमाणे देण्यात येणार आहेत.सदर कार्यक्रमात निवास व भोजनाची व्यवस्था आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे मार्फत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आदिवसी हस्तकलाकारांची,नृत्यपथकांची,बचतगटांची,वनऔषधी उपचारक,रानभाज्या व वनउपज उत्पादक,वनधन केंद्र अशा विविध आदिवासी कलाकारांची माहिती प्रकल्प कार्यालयामार्फत संकलित करावयाची आहे.तरी आदिवासी स्वातंत्रयवीरांच्या कुटुंबातील व्यक्तीनी,आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय स्तरासवर गौरवास्पद कामगिरी केलेल्या आदिवासी व्यक्तीनी,हस्तकलाकारांनी,नृत्यपथक प्रमुख,बचतगट प्रमुख,वनऔषधी उपचारक,रानभाज्या व वनउपज उत्पादक यांनी राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव कार्यक्रमात भाग घेण्याकरीता आपली माहिती प्रकल्प कार्यालय,पुसद अंतर्गत शासकीय वसतीगृहे तसेच एकात्मिक आदिासी विकास प्रकल्प,पुसद जि.यवतमाळ येथे दिनांक ३ऑगस्ट २०२२ पर्यंत द्यावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी