सामूहिक वन हक्काच्या 15 हेक्टर क्षेत्रावर बीज टोबनी वन हक्क व पेसा संसाधन केंद्र द्वारा बीज टोबनी आणि वृक्ष लागवड अभियान

यवतमाळ, दि 4 ऑगस्ट (जिमाका) :- यंदा चांगला पाऊस झाल्याने जमीन मध्ये पोटभर पाणी झाले आहे. नवीन वृक्ष लागवड व बीज टोबनी साठी पोषक वातावरण आहे. जागतिक तापमान वाढ व बिघडलेला निसर्गाचा समतोल यावर एकमेव उपाय तसेच लुप्त होत असलेल्या वंनोपजाचे सवर्धन करण्याचे उद्देशाने युनिसेक इंडिया पुणे संचालित वन हक्क व पेसा कायद्याचे सूक्ष्म नियोजन व संसाधन केंद्र यवतमाळ द्वारा बीज टोबनी व वृक्ष लागवड करण्यात आली. दिनांक २० जुलै ते २८ जुलै या दम्यान यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी आणि मारेगाव तालुक्यातील जानाकाईपोड, कालेश्वर, जांब किन्ही वन या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. दिवसागणिक जंगलातील वृक्षांची संख्या कमी होत आहे तसेच देशी वृक्ष मोठ्या प्रमाणात नष्ट होत असून लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. लोक सहभातून एकूण १५ हेक्टर सामुहिक वन हक्क प्रयोग म्हणून क्षेत्रावर बेहडा, मोह, गावराणी आंबे, बेल, कवठ, चिंच, चारोळी यासारखी झाडे मोठ्या प्रमाणात लागली पाहिजे यासाठी शाळकरी मुले व गावातील लोकांच्या सहकार्याने जमिनी वर बीज टोबनी व वृक्ष लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी संसाधन केंद्राचे समन्वक शेख रसूल सुरज राजकोल्हे, वैभव पंडित, तितिक्षा दंभे, सैय्यद मोहसीन अली , आकाश राऊत, अमोल नगराळे यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाला सरपंच श्री. शेडमाके, वासुदेव टेकाम, जमुना आत्राम, मनीषा अलाम उमेद, रेखा मोरे, सुनिता येरमे, अर्जुन टेकाम, बालाजी टेकाम, बहिरू टेकाम, पिंटू जांभूळकर, तेजस्विनी टेकाम, मानेकर तसेच गावातील महिला बचत गट, वन हक्क व पेसा समिती चे सदस्य उपस्थितित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी