“महारथी महाराष्ट्राचे” पुस्तक सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध ग्रंथालयांनी 31 ऑगस्ट पर्यंत मागणी करावी

यवतमाळ, दि.18 ऑगस्ट (जिमाका) : “महारथी महाराष्ट्राचे भाग-2” या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 13 डिसेंबर 2021 राज्यपाल भगत सिंह कोशारी यांच्या शुभ हस्ते राजभवन येथे आयोजीत केलेल्या ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रमात करण्यात आले होते. “महारथी महाराष्ट्राचे भाग-1 व भाग-2” या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील शुरविरांची माहिती शौर्यगाथा लिखीत आहे. तसेच शौर्यपदक विजेते सैन्यातील जवान, पोलीस आणि नागरीकांची माहिती आहे. या पुस्तकांची किंमत प्रत्येकी रुपये 300 असून भाग-1 व भाग-2 ची एकूण किंमत रुपये 600 आहे. हे पुस्तक प्रत्येक ग्रामीण / शहरी ग्रंथालयात ठेवल्यास महाराष्ट्रातील महारथींच्या त्याग व शौर्य गाथेची ओळख शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, व जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत पोहंचेल तसेच देशभक्तीची भावना भावी पिढीत प्रज्वलीत होईल. याकरीता जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या संख्येनुसार पुस्तकाची मागणी एकत्रीतरित्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ यांच्याकडे दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात यावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी