Posts

Showing posts from April, 2019

अवैध रेती उत्खननप्रकरणी 2.44 लाखांचा दंड वसूल

v सात प्रकरणात गुन्हा दाखल       यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यातील रेती घाटावरून अवैधरित्या रेती उत्खनन करणा-यांविरुध्द जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. 29 एप्रिलच्या रात्री महसूल विभागाने केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 2 लक्ष 44 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.             महसूल विभागाने विशेष मोहिमेदरम्यान अवैध रेती वाहतुकीचे एकूण 12 प्रकरणे शोधून काढली. यात दिग्रस तालुक्यात दोन प्रकरणे, पुसद तालुक्यात दोन, उमरखेड तालुक्यात तीन, महागाव तालुक्यात एक, घाटंजी तालुक्यात तीन आणि वणी तालुक्यातील एका प्रकरणाचा समावेश आहे.   त्यापैकी पुसद येथील एका प्रकरणात 2 लक्ष 44 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. तर दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ०००००००

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नका

v जिल्हाधिकारी यांचे आवाहन यवतमाळ, दि. 30 : स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतो. यावेळी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा, हे प्रत्येक सुजान नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनी प्लास्टिक ध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, रस्त्यांवर पडलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले आढळतात. राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजान व जागरूक नागरिक, ग्रामपंचायत, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सर्व खाजगी संस्था यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेच्या मदतीने अशाप्रकारे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. तसेच विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची वि

राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गानुसार कर्तव्य पार पाडा – जिल्हाधिकारी

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात तुकडोजी महाराज जयंती       यवतमाळ, दि. 30 : संत तुकडोजी महाराज यांचा जन्म विदर्भात झाला असला तरी देशाचे राष्ट्रसंत होते. त्यांनी संपूर्ण देशाला ग्रामीण प्रशासनाचे धडे दिले. स्वच्छता, शिक्षण आदी विषयांबाबत त्यांच्या संदेशाचे महत्व आजही कायम आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रसंतांनी दाखविलेल्या मार्गानुसार कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.   भराडी, तहसीलदार शैलेश काळे आदी उपस्थित होते.             राष्ट्रसंतांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावल येथे झाला, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, समाजात एक आदर्श व्यवस्था कशी निर्माण करावी, याबाबत त्यांनी ग्रामगीतेत सांगितले आहे. त्यांच्या ग्रामगीतेत सर्व विषय

33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेकरीता सर्वांचा समन्वय आवश्यक – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक यवतमाळ, दि. 23 : दिवसेंदिवस कमी होणा-या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मात्र हे केवळ एकट्या वनविभागाचे काम नाही. तर या मोहिमेच्या यशस्वीकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. 2019 मधील 33 कोटी वृक्षारोपन कार्यमक्रमाचे नियोजन व पुर्वतयारीबाबत सर्व विभागांच्या समन्वय अधिका-याची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी जि.प.मुख्याधिकारी जलजकुमार शर्मा, मुख्यवनसंरक्षक पी.जी.राहूरकर, उपवनसंरक्षक बि.एन. पिंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार व-हाडे व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उदिष्ट, नियोजनाचा आढावा घेतला. ते म्हणाले उदिष्टांच्या पुर्ततेच्या दृष्टिकोनातुन विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या

बोंडअळी नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच काळजी घ्या - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Image
यवतमाळ, दि. 18 : शेतीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. या हंगामात योग्य नियोजन करण्याच्या सुचना जिल्ह्यातील कृषी यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. बोंडअळी नियंत्रणात जिनिंग प्रेसिंगचीसुध्दा महत्वाची भुमिका आहे. त्यामुळे जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनानेसुध्दा याबाबत सुरवातीपासूनच काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, उपसंचालक रवींद्र पाटील, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात जवळपास चार लक्ष हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, बोंडअळी नियंत्रणासाठी सुरवातीपासूनच फेरोमन ट्रॅप लावणे गरजेचे आहे. यासाठी सर्व जिनिंग प्रेसींग व्यवस्थापनाने कामाला लागावे. फेरोमन ट्रॅप लावल्यानंतर त्यातील कॅप्सुल नियमित बदलविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने योग्य नियोजन करा. पुढील आठवड्यापासून जिनींग प्रेसींगच्या तपासणीला सुरवात करावी. फेरोमन ट्रॅप हा विषय अत्यंत जि

निवडणूक खर्च व अनियमिततेच्या अनुषंगाने तीन गुन्हे दाखल

यवतमाळ, दि. 15 : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक खर्च तसेच अनुषंगीक बाबींमधील अनियमिततेच्या अनुषंगाने तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ लेखी परवानगीशिवाय एकनाथ पंजाब तुमकर व अर्चना अरुण खंडाळकर यांनी सभेकरीता आलेल्या लोकांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी खिचडीचे वाटप केल्याने यवतमाळ शहर पोलिस स्टेशन येथे येथे कलम 171 एच, 188 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा पुसद (शहर) पोलिस स्टेशन येथे भावना गवळी व रवी पांडे यांचे विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 171- एच, 188 नुसार नोंदविण्यात आला आहे. शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडणुकीला चालना देण्याकरीता मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या वाहनात इंधन टाकून देण्याचे प्रलोभन दिल्याचे निदर्शनास आले आहे. आदर्श आचारसंहितेचे हे उल्लंघन असल्यामुळे गुन्हा   नोंदविण्यात आला आहे.   तिसरा गुन्हा दारव्हा पोलिस स्टेशन येथे कृषी पर्यवेक्षक प्रकाश अभिमान उघडे व कृषी सहाय्यक राजेश प्रेमसिंग राठोड यांचे विरुध्द नोंदविण्यात आला आहे. त्यांनी संबंधीताकडून भ

14 - यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 54.69 टक्के मतदान

Image
v अंतिम आकडेवारी उशीरापर्यंत मिळणार यवतमाळ, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या पहिल्या टप्प्यात 14- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाकरीता मतदान झाले. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 54.69 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या अंतिम टक्केवारीमध्ये हा आकडा वाढणार आहे. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 34-वाशिम, 35-कारंजा, 77-राळेगाव, 78-यवतमाळ, 79-दिग्रस आणि 81- पुसद या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लक्ष 14 हजार 805 मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी (11 एप्रिल) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली. सुरवातीला सकाळी 7 ते 9 या वेळेत 5.03 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा आकडा वाढत गेला आणि सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत अंदाजे 54.69 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शहरातील दादासाहेब मांडले विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होते. सकाळी या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे स्वागत गुलाब पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल

जिल्ह्यात 2 लक्ष 71 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त

Image
v राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई यवतमाळ, दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तीचे दिनांक 9 एप्रिल 2019 च्या सायंकाळी 6 वाजता पासून व्यवहार बंद करून सिलबंद करण्यात आले आहे. या अनुषंगाने विविध पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 2 लक्ष 71 हजार 963 रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला असून चार नागरिकांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शन विविध पथके तयार करण्यात आली आहे.   या दरम्यान दारुची विक्री व वाहतुकीवर पाळत ठेवण्यात येत आहे. 10 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितेवरून वणी तालुक्यात राजूर कॉलरी येथील अशोक पुरणलाल जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानासमोरील त्यांच्याच मालकीचे पडक्या जुन्या घरात दारू बंदी कायद्यांतर्गत छापा टाकण्यात आला. यात देशीदारूच्या 180 मिलीच्या विविध ब्राँडच्या 62 पेट्या व इतर साहित्य असे एकूण 1 लक

मतदानाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज

Image
v निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी रवाना यवतमाळ, दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होत आहे. या मतदानाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. 14-   यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघातील 34 – वाशिम, 35 – कारंजा, 77- राळेगाव, 78- यवतमाळ, 79- दिग्रस व 81- पुसद या विधानसभा मतदार संघात 2206 मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन मतदान पथके रवाना करण्यात आली. या साहित्यामध्ये 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट व 1 व्हीव्हीपॅट मशीनचा समावेश आहे. मतदान पथके मतदान केंद्रावर पोहोचली असून लोकसभा मतदार संघातील 219 मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार संघात एकूण 88 मतदान केंद्रे क्रिटीकल असून या मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार संघात 217 बसेस, 41 मिनी बसेस व   427 जिप्समार्फत मतदान पथकांना मतदान केंद्रावर सोडण्यात आले. दिव्यांग मतदान बांधवांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा केंद्रावर उपलब

खर्च नोंदीबाबत टाळाटाळ करणा-या उमेदवारांना नोटीस

v निवडणूक निरीक्षकांनी केली अंतिम तपासणी यवतमाळ, दि. 10 : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहिची अंतिम तपासणी गार्डन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. यावेळी खर्चाचा अहवाल देण्यास घेण्यास टाळाटाळ किंवा नोंदीबाबत अनियमितता दर्शविणा-या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.      खर्च निरीक्षक विक्रम पगारीया यांनी उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहिची अंतिम तपासणी केल्यानंतर नोटीस देण्याचे आदेश दिले. यात भावना गवळी, माणिकराव ठाकरे, शहेजाद समिउल्ला खान, वैशाली येडे, अनिल राठोड, अरुण किनवटकर, पुंडलीक राठोड, परशराम आडे, प्रवीण पवार, सलीम शाह सुलेमान शाह, रवी जाधव, डॉ. राजीव अग्रवाल, अंकित चांडक, प्रेमासाई महाराज, शेख जावेद शेख मुश्ताक आणि सिंपल राठोड यांचा समावेश आहे. कमी खर्च दाखविल्याबद्दल मागील निरीक्षणाच्या वेळी ज्या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी बहुतांश उमेदवारांनी खर्च मान्य करून सदर खर्च नोंदवहित समाविष्ट केला आहे. रवी जाधव यांना तीन वेळा नोटीस देऊनही त्यांनी खर्चाची देयके सादर केली नाही. तसेच म

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कलम 144 लागू

v आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना यवतमाळ, दि. 9 : 14 - यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या 48 तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद झाला आहे. तसेच जिल्ह्यात कलम 144 लागू झाले आहे. त्यामुळे या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या तर त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत. जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदार संघात कोणत्याही पक्षाचे स्टार प्रचारक, मतदार संघाच्या बाहेरील पक्षाचे कार्यकर्ते / व्यक्ती संबंधित मतदारसंघात राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. मतदार संघाबाहेरील व्यक्ती राहू शकणारी संभाव्य ठिकाणे यात सार्वजनिक सभागृहे, खाजगी हॉल, रेस्ट हाऊस, लॉजींग, हॉटेल्स, मंगल कार्यालये यांचा समावेश आहे. या ठिकाणांची कसून तपासणी करण्याकरीता स्वतंत्र चमुची व्यवस्था करावी. मतदारसंघाच्या भौगोलिक सिमांवर अधिकचे चेकपोस्ट लावून सदर चेकपोस्टवर वाहनांची तपासणी क

संशयास्पद बँक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याबाबत बँकर्सची बैठक

v निवडणूक निरीक्षकांनी केल्या सुचना       यवतमाळ, दि. 8 : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुढील दोन - तीन दिवसांत होणा-या बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक विक्रम पगारीया यांनी बँकर्सची बैठक घेतली. रेमंड येथील विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, उपजिल्हा निबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.             निवडणुकीच्या कालावधीत होणा-या संशयास्पद बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे तसेच त्यांचा अहवाल पाठविण्याच्या सुचना खर्च निरीक्षकांनी दिल्या. तसेच 5 लक्ष रुपयांवरील खात्यात जमा किंवा उचल होणा-या व्यवहारांची माहिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. निवडणूक काळात बँकेच्या या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र सुचना दिल्या आहे. त्या सर्व सुचना निवडणूक निरीक्षकांनी बँकेच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्या. ०००००००

निवडणूक निरीक्षकांनी केली मतदान केंद्राची पाहणी

Image
v क्षेत्रीय अधिका-यांच्या प्रशिक्षणाला उपस्थिती यवतमाळ, दि. 8 : निवडणूक निरीक्षक (सामान्य) सुधीरकुमार शर्मा यांनी कळंब तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. कळंब तालुक्यातील जि.प. कन्या शाळेतील मतदान केंद्र 106 व 107, चिंतामणी हायस्कूल मधील मतदान केंद्र 108 व 109 आणि उर्दु हायस्कूल येथील मतदान केंद्र 115 व 116 या मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षकांनी भेटी देऊन येथे तयार करण्यात आलेल्या किमान सुविधांची पाहणी केली. तत्पूर्वी नियोजन सभागृहात आयोजित क्षेत्रीय अधिका-यांच्या प्रशिक्षणाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे तसेच सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), आणि खर्च निरीक्षक यांच्याशी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी वाशिम जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी त्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. निवडणूक आयोगाच्या म

निवडणूक तयारीबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Image
v जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिका-यांची बैठक यवतमाळ, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 संदर्भात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. 11 एप्रिल रोजी यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा उपयोग होत आहे. याबाबत काही तक्रार आली तर ती त्वरीत सोडवा. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी असलेल्या व्हीलचेअरचा उपयोग वयोवृध्द मतदारांनासुध्दा करता येणार आहे. तसेच मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांना मतदान करण्यासाठी पर्यायी 11 प्रकारच्या ओळखपत्रापैकी एक ओळखपत्र दाखविणे आवश्यक आहे. ओळखपत्राची ही यादी मतदान केंद्रांवर ठळक अक्षरात लावावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.     वाहन तपासणी दरम्यान आतापर्यंत किती रक्कम जप

मतदानाच्या व पुर्वीच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक

यवतमाळ, दि. 7 : मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दिनांक 10   व   11   एप्रिल रोजी प्रकाशित होणा-या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालय, दगडी इमारत, तहसील चौक, यवतमाळ येथील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरुपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार आदेश काढले आहेत. त्यानुसा

निवडणूक खर्च तपासणीस सहा उमेदवार अनुपस्थित

v नोटीस बजावण्याच्या खर्च निरीक्षकांच्या सुचना यवतमाळ, दि. 6 : निवडणूक खर्च तपासणीच्या दुस-या बैठकीस सहा उमेदवार / प्रतिनिधी अनुपस्थित असल्याने त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारीया यांनी दिले. उमेदवारांकडून निवडणुकीत करण्यात येणा-या खर्चाची द्वितीय तपासणी गार्डन हॉल,जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली.   14 यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 11 एप्रिल रोजी होणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकापासून उमेदवारांचा खर्च सुरू होतो. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून होणारा दैनंदिन खर्च निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. या खर्चाची तपासणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून तीन वेळा करण्यात येते. यापैकी प्रथम तपासणी 2 एप्रिल रोजी झाल्यानंतर द्वितीय तपासणी 5 एप्रिल रोजी करण्यात आली. द्वितीय तपासणीदरम्यान एकूण 24 उमेदवारांपैकी 18 उमेदवार / त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर अनुपस्थित सदस्यांमध्ये सुनील नटराजन नायर उर्फ प्रेमासाई महाराज, रमेश गोरसिंग पवार, पुरुषोत्तम अजगवरे, उत्तम कांबळे, पुंडलिक राठो

उमेदवारांना जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक

v बल्क एस.एम.एस,केबल नेटवर्क, सोशल मीडिया,रेडियो,डिजिटल बोर्डवरील जाहिरातींचा समावेश यवतमाळ, दि. 3 – लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताच उमेदवारांचा प्रचार सुरू होतो. प्रचारासाठी तयार करण्यात येणा-या विविध प्रकारच्या ऑडीओ-व्हिज्यूअल जाहिराती, बल्क एस.एम.एस, केबल नेटवर्क, सोशल मिडिया, रेडियो तसेच सार्वजनिक ठिकाणी डिजीटल बोर्डवरील जाहिराती   प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. या जाहिराती विविध माध्यमांना प्रसारण करण्यापूर्वी प्रसार माध्यम सनियंत्रण समितीकडून जाहिरातींचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या जाहिराती जिल्हा माहिती कार्यालय, दगडी इमारत, तहसील चौक,   (काटेबाईंच्या शाळेजवळ) यवतमाळ येथे जिल्हास्तरीय प्रसारमाध्यम सनियंत्रण समितीकडे प्रमाणित करण्यासाठी द्यावयाच्या   आहेत. निवडणुकीच्या कालावधीत सर्वत्र आचारसहिंता लागू असल्यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी करावयाच्या जाहिरातीसाठी वैयक्तिक टिका- टिप्पणी, धार्मिक, जातीय भावना दुखावणारी किंवा समाजात एकमेकाबद्दल तिरस्कार , घृणा आणि तिटकारा निर्माण करणारी जाहिरात या कालावधीत प्रसारीत होणार नाही, याची काळजी घेण्याची आव

केंद्रीय निरीक्षक शर्मा यांनी घेतला निवडणुकीबाबत आढावा

Image
v सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या सुचना यवतमाळ, दि. 3 : केंद्रीय निवडणूक निरीक्षक सुधीर कुमार शर्मा यांनी निवडणुकीच्या तयारीबाबत यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव, दारव्हा, दिग्रस, पुसद येथे भेटी देऊन आढावा घेतला. तसेच ईव्हीएम – व्हीव्हीपॅटची पाहणी केली. निवडणूक निरीक्षकांनी राळेगाव येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी झाडगाव येथील मतदान केंद्राला भेट दिली. तिवसा येथे स्टॅटिक सर्व्हेलंन्स पथकाची तपासणी केली असता आढळलेल्या उणिवाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच दारव्हा येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाला त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना निवडणूक निरीक्षक सुधीर कुमार शर्मा म्हणाले, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी मतदान केंद्रावर किमान सुविधांची पुर्तता झाल्याची खात्री करावी. सर्व ईव्हीएम मशीनचे सिलींग योग्यप्रकारे करण्याबाबत सहाय

खर्च तपासणीस अनुपस्थित असणा-या सात उमेदवारांना नोटीस

v निरीक्षकांकडून दैनंदिन खर्चाच्या नोंदवहिची तपासणी यवतमाळ, दि. 3 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांकडून होणारा दैनंदिन खर्च निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. या खर्चाची तपासणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत तीन वेळा करण्यात येते. खर्च नोंदवहिच्या पहिल्या तपासणीदरम्यान अनुपस्थित असणा-या सात उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायदा कलम 77 (1) नुसार उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. गार्डन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पहिल्या तपासणीदरम्यान एकूण 24 उमेदवारांपैकी 17 उमेदवार / प्रतिनिधींनी दैनंदिन खर्च नोंदवही निवडणूक निरीक्षक विक्रम पगारीया यांच्यापुढे   सादर केली. तपासणीस अनुपस्थित असलेले प्रभुध्द रिपब्लिकन पार्टीचे   उत्तम कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे रवि जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राजेश राऊत, प्रहार जनशक्ती पक्षाचे वैशाली येडे, अपक्ष उमेदवार अनिल राठोड, डॉ. राजीव अग्रवाल आणि रामराव पवार या सात उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. अनुपस्थित उमेदवाराने नोटीस

मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

यवतमाळ, दि. 2 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 13 – चंद्रपूर – केळापूर – आर्णि व 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान आहे. तसेच 15 – हिंगोली लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. सदर निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता जिल्ह्यातील तिनही मतदारसंघात मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम अंतर्गत असलेले महाराष्ट्र देशीदारु नियम 1973 चे नियम 20 व 26 (क) (1) व महाराष्ट्र विदेशी मद्य नियमाच्या तरतुदीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील मद्य विक्री अनुज्ञप्त्या (सीएल-2, एफएल-1, एफएल-2, सीएल/एफएल/टीओडी-3, एफएल/बिअर-2, एफएल-3, सीएल-3 अनुज्ञप्ती) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 13 – चंद्रपूर – केळापूर – आर्णि व 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेदरम्यान संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ( हिंगोली लोकसभा क्षेत्रात येत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्र वगळून) दिनांक 9 ए

दिव्यांग मतदारांसाठी 970 व्हीलचेअर

Image
v विविध मतदान केंद्रावर 92 रॅम्पची व्यवस्था       यवतमाळ, दि. 1 : दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा राहणार आहे. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तिंसाठी एकूण 970 व्हीलचेअर व एकूण 92 रॅम्पची व्यवथा करण्यात आली आहे.      राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या 2 लाख 24 हजार 162 इतकी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 4781 एवढी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले, मूकबधीर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. 76 – वणी मतदारसंघात 566 दिव्यांग मतदार, 77 – राळेगाव मतदारसंघात 992 दिव्यांग मतदार, 78 – यवतमाळ मतदारसंघात 540 मतदार, 79 – दिग्रस मतदारसंघात 1530 मतदार, 80 - आर्णि विधानसभा मतदारसंघात 568 मतदार, 81 – पुसद विधानसभा मतदारसंघात 299 आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघात 286 असे एकूण 4 हजार 781 दिव्यांग मतदार आह