अवैध रेती उत्खननप्रकरणी 2.44 लाखांचा दंड वसूल


v सात प्रकरणात गुन्हा दाखल
      यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यातील रेती घाटावरून अवैधरित्या रेती उत्खनन करणा-यांविरुध्द जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. 29 एप्रिलच्या रात्री महसूल विभागाने केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान 2 लक्ष 44 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
            महसूल विभागाने विशेष मोहिमेदरम्यान अवैध रेती वाहतुकीचे एकूण 12 प्रकरणे शोधून काढली. यात दिग्रस तालुक्यात दोन प्रकरणे, पुसद तालुक्यात दोन, उमरखेड तालुक्यात तीन, महागाव तालुक्यात एक, घाटंजी तालुक्यात तीन आणि वणी तालुक्यातील एका प्रकरणाचा समावेश आहे.  त्यापैकी पुसद येथील एका प्रकरणात 2 लक्ष 44 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. तर दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल