संशयास्पद बँक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याबाबत बँकर्सची बैठक


v निवडणूक निरीक्षकांनी केल्या सुचना
      यवतमाळ, दि. 8 : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुढील दोन - तीन दिवसांत होणा-या बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक विक्रम पगारीया यांनी बँकर्सची बैठक घेतली. रेमंड येथील विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, उपजिल्हा निबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.
            निवडणुकीच्या कालावधीत होणा-या संशयास्पद बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे तसेच त्यांचा अहवाल पाठविण्याच्या सुचना खर्च निरीक्षकांनी दिल्या. तसेच 5 लक्ष रुपयांवरील खात्यात जमा किंवा उचल होणा-या व्यवहारांची माहिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. निवडणूक काळात बँकेच्या या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र सुचना दिल्या आहे. त्या सर्व सुचना निवडणूक निरीक्षकांनी बँकेच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिल्या.
०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल