जिल्ह्यात 2 लक्ष 71 हजार रुपयांचा दारुसाठा जप्त



v राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
यवतमाळ, दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तीचे दिनांक 9 एप्रिल 2019 च्या सायंकाळी 6 वाजता पासून व्यवहार बंद करून सिलबंद करण्यात आले आहे. या अनुषंगाने विविध पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 2 लक्ष 71 हजार 963 रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला असून चार नागरिकांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शन विविध पथके तयार करण्यात आली आहे.  या दरम्यान दारुची विक्री व वाहतुकीवर पाळत ठेवण्यात येत आहे. 10 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितेवरून वणी तालुक्यात राजूर कॉलरी येथील अशोक पुरणलाल जयस्वाल यांच्या देशी दारू दुकानासमोरील त्यांच्याच मालकीचे पडक्या जुन्या घरात दारू बंदी कायद्यांतर्गत छापा टाकण्यात आला. यात देशीदारूच्या 180 मिलीच्या विविध ब्राँडच्या 62 पेट्या व इतर साहित्य असे एकूण 1 लक्ष 56 हजार 752 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य दारूबंदी कायदा 1949 नुसार जागा मालक अशोक पुरणलाल जयस्वाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आले. तसेच छेाटी गुजरी, यवतमाळ येथे आरोपी शैलेश महादेव पातालबंसी यांच्या राहते घरी छापा टाकून 180 मिलीच्या 98 बॉटल व 90 मिलीच्या 94 बॉटल, 58 बियरच्या बाटल्या व एक स्कुटर अशा एकूण 88160 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या विभागाद्वारे जिल्ह्यात दारुबंद कायद्यांन्वये इतर ठिकाणी धाडी टाकून हातभट्टी दारू 8 लिटर 180 मिलीच्या 28 बॉटल, 1500 लिटर मोहाफुल सडवा असा एकूण 27051 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील सर्व कार्यवाहीत देशी दारू 557 लिटर, विदेशी दारु 25 लिटर, बियर 24 लिटर, हातभट्टी दारु 8 लिटर, मोहासडवा 1500 लिटर अशा एकूण 2 लक्ष 71 हजार 963 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 4 इसमाविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. वरील कार्यवाही राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुरेंद्र मनपीया यांचे मार्गदर्शनाखाली पांढरकवडा राज्य उत्पादन शुल्कचे निरिक्षक सुबोध कुमार केडीया, दुय्यम निरिक्षक संतोष भटकर, वणीचे दुय्यम निरिक्षक प्रविण मोहोतकर, यवतमाळचे दुय्यम निरिक्षक अनिल खांदवे, शहर व ग्रामिण राजेश तायकर दुय्यम निरिक्षक भरारी पथक तसेच सहदुय्यम निरिक्षक श्री. घाटे, रमेश राठोड, जवान सर्वश्री घाडगे, दहेलकर, संदीप मनवर, प्रविण मसराम, मनोज शेंडे, संदीप दुधे, साठे, दिनेश पेंदोर यांच्यामार्फत करण्यात आली.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी