14 - यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 54.69 टक्के मतदान





v अंतिम आकडेवारी उशीरापर्यंत मिळणार
यवतमाळ, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या पहिल्या टप्प्यात 14- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाकरीता मतदान झाले. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 54.69 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या अंतिम टक्केवारीमध्ये हा आकडा वाढणार आहे.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 34-वाशिम, 35-कारंजा, 77-राळेगाव, 78-यवतमाळ, 79-दिग्रस आणि 81- पुसद या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लक्ष 14 हजार 805 मतदार आहेत. मतदानाच्या दिवशी (11 एप्रिल) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली. सुरवातीला सकाळी 7 ते 9 या वेळेत 5.03 टक्के मतदान झाले. मतदानाचा हा आकडा वाढत गेला आणि सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत अंदाजे 54.69 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
शहरातील दादासाहेब मांडले विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे व्यवस्थापन महिलांच्या हाती होते. सकाळी या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे स्वागत गुलाब पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक न.प.शाळा क्रमांक 1 येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्याकरीता दिव्यांग कर्मचा-यांची सोबत होती.
००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी