33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेकरीता सर्वांचा समन्वय आवश्यक – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने




जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
यवतमाळ, दि. 23 : दिवसेंदिवस कमी होणा-या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मात्र हे केवळ एकट्या वनविभागाचे काम नाही. तर या मोहिमेच्या यशस्वीकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
2019 मधील 33 कोटी वृक्षारोपन कार्यमक्रमाचे नियोजन व पुर्वतयारीबाबत सर्व विभागांच्या समन्वय अधिका-याची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी जि.प.मुख्याधिकारी जलजकुमार शर्मा, मुख्यवनसंरक्षक पी.जी.राहूरकर, उपवनसंरक्षक बि.एन. पिंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार व-हाडे व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय विभागनिहाय वृक्ष लागवडीचे उदिष्ट, नियोजनाचा आढावा घेतला. ते म्हणाले उदिष्टांच्या पुर्ततेच्या दृष्टिकोनातुन विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या जागेचा वापर वृक्ष लागवडीसाठी  करावयाचा आहे. परंतु विभाग ज्या घटकांना सेवा पुरवितात   तसेच जे लाभार्थी , घटक विभागांचे सेवा ग्राहक आहेत अशांचाही उपयोग या मोहिमेमध्ये करून वृक्षरोनणासाठी उपलब्ध जमीनीची माहिती (लॅण्ड बँक) वन विभागाला द्यावी. तसेच सर्व विभागांनी त्यांना वृक्ष लागवडीसाठी दिलेले लक्ष एप्रिल महिण्याच्या शेवट पर्यंत पुर्ण करून अपलोड करायचे आहे. बांधावरील वृक्षलागवडीसाठी शेतक-यांना विनामुल्य रोपे मिळण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी त्यांनी यावेळी सांगीतले.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी