मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद


यवतमाळ, दि. 2 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 13 – चंद्रपूर – केळापूर – आर्णि व 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान आहे. तसेच 15 – हिंगोली लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.
सदर निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता जिल्ह्यातील तिनही मतदारसंघात मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम अंतर्गत असलेले महाराष्ट्र देशीदारु नियम 1973 चे नियम 20 व 26 (क) (1) व महाराष्ट्र विदेशी मद्य नियमाच्या तरतुदीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील मद्य विक्री अनुज्ञप्त्या (सीएल-2, एफएल-1, एफएल-2, सीएल/एफएल/टीओडी-3, एफएल/बिअर-2, एफएल-3, सीएल-3 अनुज्ञप्ती) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
13 – चंद्रपूर – केळापूर – आर्णि व 14 – यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेदरम्यान संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ( हिंगोली लोकसभा क्षेत्रात येत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील क्षेत्र वगळून) दिनांक 9 एप्रिल च्या सायंकाळी 6 वाजतापासून दि. 11 एप्रिल च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत, 15 – हिंगोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या क्षेत्रात मतदान प्रक्रियेदरम्यान दि. 16 एप्रिल च्या सायंकाळी 6 वाजतापासून 18 एप्रिलच्या सायंकाळी 6 वाजपर्यंत मद्यविक्री बंद राहील. तसेच 23 मे 2019 रोजी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्यात येईल. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीकरीता सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी