Posts

Showing posts from September, 2020

दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 66 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 66 जण नव्याने पॉझेटिव्ह आले  आहे.  मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 52 वर्षीय व 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.   नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 66 जणांमध्ये 48 पुरुष व 18  महिला आहेत. यात  यवतमाळ शहरातील 13 पुरुष व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील सात पुरुष व चार महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील 12 पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील पाच पुरुष, नेर शहरातील दोन पुरुष व एक महिला आणि उमरखेड शहरातील एका महिलेचा समावेश आहे.   जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 276 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8536 झाली आहे.  जिल्ह्यात 264 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 272 जण भरती आहे. श

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकास कामांना गती द्यावी - संजय राठोड

Image
                                                                                     मुंबईच्या विक्रोळीमध्ये 10 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी व कांदळवन प्रतिष्ठान च्या अधिकृत संकेतस्थळाचे उदघाटन                  यवतमाळ दि. 30 :- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर   भर दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे डिसेंबर 2020 अखेर पूर्ण करावी असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथील विविध विकास कामांचा आढावा श्री. राठोड यांनी आज मंत्रालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते.              यावेळी   'युनायटेड वेस्टर्न कंपनी' सोबत मुंबईच्या विक्रोळीमध्ये 10 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या लागवडीसाठी   33 लाख रुपये कंपनीकडून आणि 4 लाख रुपये 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून देण्यात येणार आहेत.               यावेळी महाराष्ट्र

जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यु

  Ø 194 नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 29 : गत 24 तासात जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 194 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, वणी शहरातील 70 वर्षीय महिला, पुसद येथील 64 वर्षीय पुरुष, महागाव शहरातील 30 वर्षीय पुरुष, बाभुळगाव शहरातील 65 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 63 वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 194 जणांमध्ये 127 पुरुष व 67 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 49 पुरुष व 21 महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला,   पांढरकवडा शहरातील 28 पुरुष व 15 महिला, पांढरकवडा तालुक्यातील दोन पुरुष, पुसद शहरातील 18 पुरुष व नऊ महिला, आर्णी शहरातील सात पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक महिला, दारव्हा   शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, महागाव तालुक्यातील तीन पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहराती

कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजीपूर्वक हाताळावीत - न्यायमूर्ती अ.श. चांदूरकर

Image
           Ø यवतमाळ येथे कौटुंबिक न्यायालयाचे आभासी उद्घाटन यवतमाळ, दि. 29 : आनंदी कौटुंबिक जीवन जगणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तथापि त्यात अडचण उद्भवल्यास कुटुंबातील आपसी वाद मिटविण्यासाठी ते न्यायालयाला धाव घेतात. मानवी दृष्टीने संवेदनशील असलेली अशी प्रकरणे हाताळतांना योग्य काळजी, खबरदारी व नैतिक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच भविष्यात पुन्हा याबाबत तक्रार उद्भावणार नाही, या आत्मविश्वासातून न्यायनिवाडा करावा, असे मत उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे तथा यवतमाळचे न्यायिक पालक न्यायमूर्ती अ.श.चांदुरकर यांनी व्यक्त केले. यवतमाळ येथील कौटुंबिक न्यायालयाचे वेबीनारद्वारे आभासी पध्दतीने उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पु.वि.गनेडीवाला प्रमुख अतिथी म्हणून तर यवतमाळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कि.रा.पेठकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. न्यायमूर्ती अ.श. चांदुरकर पुढे म्हणाले की, आभासी प्रक्रीयेद्वारे उद्घाटन करण्यात येत असलेले   विदर्भातील हे पहिलेच कौटुंबिक न्यायालय आहे. न्यायालयीन इमारतीच्या नुतणीकरणामुळे व सर्व

जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यु

Ø 128 जणांना सुट्टी ; 85 नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 85 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 128 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्या चार जणांमध्ये दिग्रस शहरातील 49 वर्षीय महिला आणि तालुक्यातील 77 वर्षीय महिला तसेच राळेगाव शहरातील 89 वर्षीय आणि घाटंजी शहरातील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 85 जणांमध्ये 48 पुरुष तर 37 महिला आहेत. यात आर्णी शहरातील चार पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील 11 पुरुष व सहा महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष, कळंब शहरातील सहा पुरुष व दोन महिला,   महागाव शहरातील तीन पुरुष व एक महिला, नेर शहरातील तीन पुरुष व सहा महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व सात महिला, उमरखेड शहरातील तीन पुरुष व आठ महिला, वणी शहरातील दोन महिला, यवतमाळ शहरातील 13 पुरुष व चार महिला आणि यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष पॉझेटिव्ह   आहे.

24 तासात 296 जणांची कोरोनावर मात

  Ø तिघांचा मृत्यु ; 95 नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 27 : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 296 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 95 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.  मृत झालेल्या तीन जणांमध्ये यवतमाळ शहरातील 58 वर्षीय व घाटंजी शहरातील 55 वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 95 जणांमध्ये 69 पुरुष व 26 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 30 पुरुष व 16 महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व एक महिला, कळंब शहरातील पाच पुरुष व एक महिला, महागाव शहरातील चार पुरुष, महागाव तालुक्यातील सात पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व एक महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, उमरखे

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा

Image
  Ø 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' ही लोकचळवळ - पालकमंत्री Ø आतापर्यंत 43 टक्के कुटुंबाचे सर्व्हेक्षण यवतमाळ, दि. 27 : दिवसेंदिवस कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असून जग दुस-या लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी तसेच प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' ही मोहीम शासनाने सुरू केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. मुंबई येथून व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ व इतर अधिका-यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना वाढतोय त्यामुळे जनतेला सजग करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे या प्राथमिक बाबींची अंमलबजावणी केली तर आपण निरोगी राहून कोरोनापासून वाचू शकतो. उपचारापेक

प्रतिष्ठान सुरू ठेवल्यामुळे पॉझेटिव्ह कुटुंबाच्या संपर्कातील व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल

       यवतमाळ, दि. 26 : पॉझेटिव्ह व्यक्तिच्या कुटुंबातील हाय रिस्क काँटॅक्टमध्ये असलेल्या नागरिकाने शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून आपले प्रतिष्ठान ग्राहकांसाठी उघडे ठेवल्यामुळे सदर व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील पळसवाडी कॅम्प येथे राहणा-या या कुटुंबाचे नगर परिषदेच्या बाजुला चर्चजवळ प्रतिष्ठान आहे.             व्हॉट्सॲप वर मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबातील काही जण 20 सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार पॉझेटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. यांच्या कुटुंबातील हाय रिस्क संपर्कात असलेल्या व्यक्तिंचे नगर परिषदेजवळ प्रतिष्ठान आहे. त्यांनी शासनाच्या आदेशानुसार  पुढील 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन न करता आपले प्रतिष्ठान उघडे ठेवून साहित्याची विक्री केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या प्रतिष्ठानमधील कर्मचारी तसेच त्या ठिकाणी येणा-या ग्राहकांना कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या नेतृत्वात न.प.आरोग्य अधिकारी डॉ

जिल्ह्यात 24 तासात 155 जण कोरोनामुक्त

  Ø 172 नव्याने पॉझेटिव्ह तर तिघांचा मृत्यु यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात गत 24 तासात 155 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नव्याने जिल्ह्यात 172 जण पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 69 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 75 वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 172 जणांमध्ये 104 पुरुष व 68 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 14 पुरुष व नऊ महिला आणि यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष, उमरखेड शहरातील 16 पुरुष व 22 महिला, घाटंजी शहरातील 18 पुरुष व एक महिला, पुसद शहरातील 13 पुरुष व पाच महिला, बाभुळगाव शहरातील एक पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील पाच पुरुष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन महिला, कळंब शहरातील एक पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील सात पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरुष, नेर शहरातील आठ पुरुष व नऊ महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्य

शासन नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी – पालकमंत्री राठोड

Image
  Ø पावसामुळे कोंब फुटलेल्या सोयाबीनची पाहणी यवतमाळ, दि. 26 : संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले असून सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. एवढेच नाही तर अमरावती, वर्धा, बुलढाणा आदी जिल्ह्यात व राज्यात शेतमालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बुधवारी याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असून नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.   मडकोना येथील दिनेश गोठे या नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार कुणाल झाल्टे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश नेमाडे, डॉ. प्रमोद मगर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, याबाबत जिल्ह्यातून आपल्याकडे तसेच प्रशासनाकडे शेतक-यांच्या तक्रारी येत आहे. त्यामुळेच प्रशासनाला

शेतक-यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी

Image
Ø पालकमंत्र्यांची जरबिराच्या पॉलीहाऊसला भेट यवतमाळ, दि. 26 : कोरोनाच्या महामारीत कृषी विभाग पूर्णपणे अनलॉक असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कृषी विभागाचे चांगले योगदान राहिले आहे. शेतक-यांनीही केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये केला तर शेतक-यांच्या हातात दोन पैसे जास्तीचे येतील. त्यामुळे जीवनमान उंचाविण्यासाठी शेतक-यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. मडकोना येथील सचिन जिरापुरे यांच्या जरबिरा फुलांच्या पॉली हाऊसला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते. या पॉलीहाऊसमधून दिवसाला 12 हजार रुपयांची जरबिराची फुले हैद्राबाद, नागपूर आणि अमरावतीला जाते, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, अशा प्रकारचे नवीन प्रयोग शेतक-यांनी करणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीव्यतिरिक्त आधुनिक पध्दतीचा अवलंब केला तर शेतक-यांचा चांगला फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगि

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यु ; 76 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 17 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 76 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 17 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 55 व 42 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 46 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 65 वर्षीय महिला, वणी शहरातील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 76 जणांमध्ये 46 पुरुष व 30 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 28 पुरुष व 13 महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व आठ महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील एक पुरुष, घाटंजी तालुक्यातील एक महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व तीन महिला, वणी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुषाचा समावेश आहे. वैद्

जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यु

  Ø 215 नव्याने पॉझेटिव्ह ; 230 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात गत 24 तासात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 230 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 31 वर्षीय, 46 वर्षीय, 56 वर्षीय आणि 17 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील 19 वर्षीय महिला, उमरखेड शहरातील 50 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 56 वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील 57 तसेच 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.   नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 215 जणांमध्ये 135 पुरुष व 80 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 33 पुरुष व 16 महिला, यवतमाळ तालुक्यातील चार पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील 10 पुरुष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील 12 पुरुष व आठ महिला, कळंब शहरातील 11 पुरुष व 10 महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील 13 पुरुष व आठ महिला, आर्णी शहरातील पाच पुरुष व चार महिला, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील दोन

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री राठोड

Image
  यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले आहे. जिल्ह्यात केवळ जून महिना वगळता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच पाऊस बरसला. पेरणी झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली राहिली. मात्र आता पीक हाती येण्याच्या वेळेस या महिन्यात धो-धो पाऊस कोसळल्यामुळे हातचे पीक जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या शेंगांना तर कोंबे फुटली असून कपाशीलासुध्दा फटका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे हातातील उभे पीक सततच्या पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी त्यांना तात्काळ मदत देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामस्तरावरील यंत्रणेने नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करावे. यात कोणतीही चालढकल करू नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सततच्या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर

आतापर्यंत सहा हजारांच्या वर बरे ; 60 हजारांच्या वर निगेटिव्ह

  Ø 24 तासात 236 जण नव्याने पॉझेटिव्ह ; सात जणांचा मृत्यु यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सहा हजारांच्या वर गेली आहे. गत 24 तासात आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 115 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 6140 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 60 हजार 728 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर गत 24 तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून नव्याने 236 रुग्णांची भर पडली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 68 वर्षीय व 72 वर्षीय पुरुष तसेच 61 वर्षीय महिला, उमरखेड शहरातील 50 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला, दिग्रस शहरातील 50 वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.   नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 236 जणांमध्ये 154 पुरुष व 82 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 48 पुरुष व 30 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील दोन

सर्व्हेक्षणासाठी घरी येणा-या पथकाला अचूक माहिती द्या - विभागीय आयुक्त सिंह

Image
                                                               Ø बाभुळगाव तालुक्यात ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन यवतमाळ, दि. 23 : गत सहा महिन्यांपासून शासन आणि प्रशासन कोरोनविरुध्दची लढाई अविरत लढत आहे. कोरोनाचा प्रकोप मात्र कमी होण्यापेक्षा वाढतीवरच आहे. सप्टेंबर महिन्यात तर बाधितांच्या आणि मृत्युच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढत झाली आहे. त्यामुळेच शासनाने प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणा-या पथकाला अचूक माहिती दिली तरच आपण कोरोनामुळे होणारे नुकसान टाळू शकतो, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. बाभुळगाव तालुक्यातील मालापूर येथे ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. समाज मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, डॉ. पी.एस.चव्हाण, मालापूरच्या सरपंचा शांताबाई हुकरे आद

‘त्या’ वाघिणीस वनविभागाने अखेर जिवंत पकडले

Image
  Ø तातडीने उपाययोजना करण्याबाबत वनमंत्र्यांनी दिले होते निर्देश यवतमाळ, दि. 23 : टिपेश्वर अभयारण्यालगत पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील अंधारवाडी, वासरी, कोपामांडवी, कोब्बई परिसरात दहशत माजविणा-या ‘त्या’ नरभक्षक वाघिणीला जिवंत पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. विशेष म्हणजे मानव - वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच या वाघिणीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी गावकरी व वन विभागाच्या अधिका-यांसोबत तातडीने बैठक घेतली होती. तसेच वन विभागाला याबाबत निर्देश दिले होते. सदर वाघिण वन विभागाच्या ताब्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.             पांढरकवडा तालुक्यातील अंधारवाडी, कोपामांडवी, वासरी व कोब्बई या गावाजवळ वाघिणीचा गेल्या दोन महिन्यांपासून संचार असल्याने स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर वाघिणीकडून पशुधन हाणीच्य सहा घटना, एक व्यक्ती जखमी व एका महिलेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले होते. सदर वाघिणीबाबत उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली होती. वनमंत्र्या

जिल्हाधिका-यांनी केली बाभुळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

Image
            यवतमाळ, दि. 23 : ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या कार्यक्रमासाठी बाभुळगावात आलेल्या जिल्हाधिका-यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांची आस्थेवाईपणे विचारपूस केली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खोडवे व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.             यावेळी जिल्हाधिका-यांनी फवारणीमुळे बाधित झालेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. किटकनाशक फवारणी करतांना सुरक्षा किट का वापरली नाही, असे विचारून यापुढे काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रसुती पश्चात वॉर्डात जाऊन नवजात शिशुसाठी भेटवस्तू दिली. मुलगा आहे की मुलगी, जन्म झाला तेव्हा वजन किती होते, आदी बाबी त्यांनी विचारल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी पुरुष वॉर्ड, महिला वॉर्ड, प्रसुती गृह, शल्य गृह, नेत्र विभाग, एक्स – रे विभाग, समुदपेशन कक्ष, लसीकरण विभाग, बाह्य रुग्ण विभाग पाहून समाधान व्