जिल्हाधिका-यांची चापर्डा येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट

 

यवतमाळ, दि. 14 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कळंब तालुक्यातील चापर्डा येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.

यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा शल्य चिकिसक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, कळंबचे तहसीलदार सुभाष जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय अकोलकर,  ठाणेदार विजय राठोड आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्यांवर भर द्या. पूर्व व्याधींनी ग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तिची वेळत तपासणी करा. लक्षणे असलेल्या रुग्णाची तात्काळ तपासणी करून वेळेत उपचार उपलब्ध करून द्या. ग्रामस्तरीय समितीमार्फत रोज सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणातून लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ आरोग्य विभागास द्या, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. यावेळी त्यांनी कोव्हीड – 19 बाबत करण्यात आलेल्या उपाययोजना, प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच कोव्हीड केअर सेंटरमधील सोयीसुविधा, तपासण्या, संपर्कातील व्यक्तिंचा शोध आदींचा आढावा घेतला.

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनीसुध्दा ग्रामीण भागातील चाचण्यांवर भर देण्याच्या सुचना केल्या. यावेळी कोव्हीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. प्रणय पेंदोर, डॉ. शैलेश चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रवी पाटील, कृषी अधिकारी प्रतिभा कुटाळ आदी उपस्थित होते.

००००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी