शेतक-यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी





Ø पालकमंत्र्यांची जरबिराच्या पॉलीहाऊसला भेट

यवतमाळ, दि. 26 : कोरोनाच्या महामारीत कृषी विभाग पूर्णपणे अनलॉक असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कृषी विभागाचे चांगले योगदान राहिले आहे. शेतक-यांनीही केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये केला तर शेतक-यांच्या हातात दोन पैसे जास्तीचे येतील. त्यामुळे जीवनमान उंचाविण्यासाठी शेतक-यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

मडकोना येथील सचिन जिरापुरे यांच्या जरबिरा फुलांच्या पॉली हाऊसला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.

या पॉलीहाऊसमधून दिवसाला 12 हजार रुपयांची जरबिराची फुले हैद्राबाद, नागपूर आणि अमरावतीला जाते, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, अशा प्रकारचे नवीन प्रयोग शेतक-यांनी करणे काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीव्यतिरिक्त आधुनिक पध्दतीचा अवलंब केला तर शेतक-यांचा चांगला फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. तर पोकरा अंतर्गत अशा पध्दतीने शेती करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहन दिले जाईल. शेतक-यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी