जिल्ह्यात मागील 24 तासात 423 नवीन पॉझेटिव्ह

 


Ø पाच मृत्यु ; 208 जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वेगाने वाढत असून गत 24 तासात आजपर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक 423 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे तर पाच कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 208 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्या पाच जणांमध्ये पांढरकवडा शहरातील 40 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, उमरखेड शहरातील 65 वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील 49 वर्षीय पुरुष आणि आर्णी तालुक्यातील 84 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तसेच गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 423 जणांमध्ये 252 पुरुष व 171 महिला आहेत. यात आर्णी शहरातील 17 पुरूष व सात महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरूष व सात महिला, दारव्हा शहरातील सहा पुरूष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील सहा पुरूष, दिग्रस शहरातील 12 पुरुष व 16 महिला, दिग्रस तालुक्यातील तीन पुरूष, घाटंजी शहरातील नऊ पुरूष व 15 महिला, घाटंजी तालुक्यातील एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरूष, केळापुर तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील 16 पुरूष व 11 महिला, महागाव तालुक्यातील 17 पुरूष व सहा महिला, मारेगाव शहरातील दोन पुरूष व चार महिला, नेर शहरातील तीन पुरुष व चार महिला, नेर तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील आठ पुरुष व पाच महिला,  पुसद शहरातील 53 पुरूष व 37 महिला, पुसद तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील 19 पुरुष व 11 महिला, वणी शहरातील 16 पुरुष व 15 महिला, वणी तालुक्यातील तीन पुरूष, वर्धा शहरातील एक पुरूष, यवतमाळ शहरातील 46 पुरुष व 21 महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व एक महिला, झरी जामणी शहरातील एक पुरूष व तीन महिला, झरी जामणी तालुक्यातील दोन पुरूषांचा समावेश आहे.

 जिल्ह्यात सद्यस्थितीत 1210 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये 326 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 5247 झाली आहे. यापैकी 3572 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 138 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 327 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 280 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 60167 नमुने पाठविले असून यापैकी 57353 प्राप्त तर 2814 अप्राप्त आहेत. तसेच 52106 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी