दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 66 जण नव्याने पॉझेटिव्ह


यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 66 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 52 वर्षीय व 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 66 जणांमध्ये 48 पुरुष व 18 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 13 पुरुष व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील सात पुरुष व चार महिला, दिग्रस शहरातील दोन पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील 12 पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील पाच पुरुष, नेर शहरातील दोन पुरुष व एक महिला आणि उमरखेड शहरातील एका महिलेचा समावेश आहे. 

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 276 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8536 झाली आहे.  जिल्ह्यात 264 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 272 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 75242 नमुने पाठविले असून यापैकी 74334 प्राप्त तर 908 अप्राप्त आहेत. तसेच 65798 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी