Posts

Showing posts from November, 2017

जिल्ह्यात 39 “मिलेनियम व्होटर”

Image
राष्ट्रीय मतदार दिवशी होणार सत्कार यवतमाळ, दि. 29 : जन्मतारखेचे प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष महत्व असते. काही विशिष्ट तारखांना जन्म झाला असेल तर तो दिवस निरंतर लोकांच्या लक्षात राहतो. नवीन वर्षाची पहिली तारीख आणि त्यातही नवीन शतकाची सुरवात म्हटले की मग काही विचारायलाच नको. अशीच तारीख आहे 1 जानेवारी 2000. ही तारीख 18 वर्षांपूर्वी येऊन गेली. मात्र 1 जानेवारी 2018 ला वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे यावेळेस “ मिलेनियम व्होटर ” ठरणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत असे 39 “ मिलेनियम व्होटर ” आढळले आहेत. या लकी मिलेनियम मतदारांचा राष्ट्रीय मतदार दिवशी (25 जानेवारी) सत्कार होणार आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या तरुण-तरुणींना राज्यघटनेनुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2000 रोजी झालेला असेल त्या मुला-मुलींची मिलेनीयम मतदान म्हणून नोंदणी करून घ्यायची आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशा मतद

महिला बचत गटाने शोधली प्रगतीची वाट

Image
Ø जुट प्रक्रियेतून 2 लाखांची विक्री यवतमाळ, दि. 29 : बचत गटाच्या चळवळीमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उपजिवीकेचे साधन निर्माण करण्यासाठी महिलांना ही चळवळ उपयोगी ठरत आहे. महागाव तालुक्यातील पिंपरी (इजारा) येथील संस्कृती महिला बचत गटानेसुध्दा कृषी समृध्दी विकास प्रकल्पाच्या मार्गदर्शनात प्रगतीची वाट शोधली आहे. जुट बारदाण उद्योगातून या महिला बचत गटाने यावर्षी 2 लक्ष 10 हजार रुपयांची विक्री केली आहे. संस्कृती महिला बचत गटाची स्थापना पिंपरी येथे 2015 मध्ये करण्यात आली. या गटात एकूण 11 महिला कार्यरत आहेत. यातील 10 महिला आदिवासी असून त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. आपले घरगुती तसेच शेतातील काम आटपून या महिला बचत गटाचे काम करीत आहेत. दोन वर्षापूर्वी पुणे येथे ॲग्रो व्हिजनचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पिंपरी येथील महिलांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी ज्युटवर प्रक्रीया करणारे मशिन बघितले. काहीतरी वेगळे करण्याच्या संकल्पनेतून त्यांनी हा व्यवसाय निवडला. ज्युट प्रक्रीया हा प्रकल्प महिलांसाठी नवीनच होता. बचत गटामध्ये एकमेव पदव

सरकारच्या योजना शेवटच्या उपेक्षित माणसांपर्यंत पोहचवा - पालकमंत्री येरावार

Image
Ø गहूली हेटी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश वाटप यवतमाळ, दि. 28 : सामान्य नागरिकांचा सर्वांगीन विकास करणे हे सरकारचे ध्येय आहे. समाजाच्या उपेक्षित घटकांतील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना शासकीय यंत्रणेने तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात. याकडे सरपंचांनी गांभिर्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.             यवतमाळ तालुक्यातील गहूली हेटी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश वाटप तसेच लाभार्थ्यांना धडक सिंचन विहिर प्रमाणपत्र वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ, गहूली हेटीचे सरपंच संदेश राठोड, बोदबोडणचे सरपंच दिनेश पवार, बाळासाहेब शिंदे, अमर दिनकर उपस्थित होते.             गावाच्या विकासाकडे सरपंचांनी लक्ष द्यावे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, घरातील गेलेला जीव परत आणता येणार नाही. मात्र अशा कुटुंबाला धीर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सरकारकडून हा मदतीचा हात असून विधवा पत्नी ज्योती पवार ह्या अपंग असल्यामुळे त्यांना अपंगांचा पगार सुरू करण्यात येईल.

हक्काचे पाणी कमाविण्याची जिल्ह्याला संधी – जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Image
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा Ø यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक तालुक्यांचा समावेश यवतमाळ, दि. 28 : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नकारात्मक ओळख आपल्या जिल्ह्याची आहे. ही ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्याचे नियोजन आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यात या स्पर्धेत सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील  आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले हक्काचे पाणी कमाविण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेसंदर्भात आयेाजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सुभाष मानकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या संकटा

तीन एकर पडीत ते बारा एकर ओलित

Image
Ø नरेगातील सिंचन विहिरीमुळे शेतकरी सुखावला यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस…..पाण्याची पातळी खालावलेली….बोंडअळीचा प्रादुर्भाव…..किटकनाशक फवारणी ……अशा एक ना अनेक समस्यांचा जिल्ह्यातील शेतक-यांना सामना करावा लागला. ही परिस्थिती जवळपास सगळीकडे सारखीच. मात्र शेतक-याला नरेगातून सिंचन विहिरीचा आधार मिळाला आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे बारा एकर शेती फुलली. स्वत:च्या मालकीची तीन एकर पडीत ते आता बारा एकर ओलिताची शेती असा प्रवास केवळ नरेगाच्या सिंचन विहिरीमुळे झाला, याबद्दल शेतक-यांने कृतज्ञता व्यक्त केली. हा अनुभव आहे यवतमाळ तालुक्यातील कापरा येथील अब्दूल कलीम शेख मेहबुब यांचा. मेहबुब भाई हे सावर येथील रहिवासी असून त्यांची कापरा ग्रामपंचायत हद्दित तीन एकर शेती आहे. ही शेती पडीत जमिनीवर असल्यामुळे सर्व काही वरच्या पावसावरच अवलंबून होते. दरवर्षी हीच परिस्थिती. त्यामुळे मेहबुब भाई यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अर्ज केला. त्यानुसार त्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला. तीन लक्ष रुपये खर्च करून शासनाच्या अनु

“गाव तेथे वाचनालय” संकल्पना राबाविणार - पालकमंत्री येरावार

Image
Ø नगर भवनात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 25 : आजकाल वाचन संस्कृती कमी झाली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन आवश्यक असून त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. ग्रंथ आणि पुस्तक हे ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे साधन आहे. तसेच वाचन हा माहिती देण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. वाचन संस्कृतीकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून तसेच नियोजन समितीच्या निधीतून “ गाव तेथे वाचनालय ” ही संकल्पना राबविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, जि.प.शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगर भवन येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक जगदीश पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी राजे

आदिवासी बांधवांनो शासकीय योजनांचा लाभ घ्या - पालकमंत्री येरावार

Image
Ø शिबला येथे “ सरकार आपल्या दारी ” अंतर्गत समाधान शिबिर यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या भरपूर आहे. पांढरकवडा, पुसद, झरी जामणी हे आदिवासी बहुल तालुके आहेत. आदिवासींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घेऊन स्वत:चे जीवनमान उंचवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. झरी जामणी तालुक्यातील शिबला येथे “ सरकार आपल्या दारी ” उपक्रमांतार्गत आयोजित समाधान, मोफत रोगनिदान तसेच उपचार व रक्तदान शिबिरात ते प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, झरीच्या पंचायत समिती सभापती लता आत्राम, शिबलाचे सरपंच पारिकराव टेकाम, जि.प.सदस्य मिनाक्षी बोलेनवार, संगिता मानकर, बंडू चांदेकर, पं.स.सदस्य राजेश गोंडावार, भाऊराव मेश्राम, नितेश जुनघरे, अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, डॉ. महेंद्र लोढा आदी उपस्थित होते. आदिवासी नागरिकांसाठी असलेल्या सर्व योजनांची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल

विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक  यवतमाळ, दि. 23 : अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. यावेळी पियुषसिंह म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे. त्यामुळे काम त्वरीत सुरू करा. शेततळ्यांची संपूर्ण कामे मार्च 2018 अखेरपर्यंत करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे. जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात प्रत्येक यंत्रणेला दिलेली कामे त्वरीत सुरू करावी. धडक सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणा-या लाभार्थ्यांना अग्रीम रक्कम अदा झाली असल्यास त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सातत्य ठेवा. गुड मॉर्निंग आणि मॉनेटरींग पथकाचा आढावा नियमित घ्या. बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात ज्या शेतक-यांच्या तक्रारी आल्या असतील, त्यांचे सर्व्हेक्षण त्वरीत करा. बेंबळा प्रकल्पांतर्गत पूनर्वसनासाठी निधी मंजूर झाला आहे. मार्च 2018 पर्यंत 18

सव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे उत्पादन

Image
केमच्या मार्गदर्शनात लिझा तत्वाने केली लागवड यवतमाळ, दि. 23 : पारंपारिक शेतीला फाटा देत प्रायोगिक तत्वावर हळद लागवडीच्या प्रयोगातून ज्ञानेश्वर सुरोशे यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे. कृषीसमृध्दी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या ( केम ) मार्गदर्शनात सव्वा एकरात त्यांनी लिझा तत्वाने हळदीची लागवड केली. हंगामाअखेर तब्बल 200 क्विंटल हळदीचे उत्पादन निघाले. यातून त्यांच्या हाती सव्वाचार लाख रुपये निव्वळ नफ्याच्या स्वरुपात आले. त्यामुळे यावर्षी 4 एकरात त्यांनी हळद लावली आहे. महागाव तालुक्यातील अंबोडा येथील रहिवासी असलेले सुरोशे यांचा मुळ पिंड शेती आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. रासायनिक खताच्या अति वापराने शेतीचे तंत्र बिघडले असून ते सुधारण्याची गरज आहे, अशी त्यांची धरणा आहे. त्यामुळे केवळ गोमुत्र, शेणखत व एस – 9 कल्चरच्या भरोश्यावर त्यांनी पाच पैकी सव्वा एकरात हळद लागवड केली. प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या अभिनव प्रयोगातून त्यांना एकूण 200 क्विंटल उत्पादन आले. हळदीच्या बेण्याची विक्री अडीचशे रुपये प्रति क्विंटल या दराने त्यांना एकूण 5 लक्ष रुपये मिळाले. यातील लागवड व इतर खर्च 72 ह

दोन वर्षात राज्यात 1500 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्ट - पालकमंत्री मदन येरावार

Image
वेदधारिणी विद्यालयात सोलर रुफ टफचे उद्घाटन यवतमाळ, दि. 21 : सद्यस्थितीत जगाला ग्लोबल वॉर्मिंगची समस्या भेडसावत आहे. दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कोळशापासून होणा-या वीज निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. तसेच हवेच्या माध्यमातून हे कण आपल्या शरीरात जातात. परिणामी नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सरकार, सामाजिक संघटना आदींच्या माध्यमातून प्रदुषण निर्मुलनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सौरउर्जा हा त्यावर एक चांगला उपाय आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात राज्यात 1500 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. पिंपळगाव येथील वेदधारिणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सौर उर्जेवर आधारीत वीज निर्मिती संचाचे (सोलर रुफ टफ) उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका ॲड. करुणा तेलंग होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नीरज डफळे, विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, उपाध्यक्ष विनोद संगीतराव,

राळेगाव नगर पंचायतीमध्ये पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

Image
यवतमाळ, दि. 21 : राळेगाव नगर पंचायत अंतर्गत करण्यात येणा-या विविध विकास कामांसदंर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी नगर पंचायतीत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष बबन भोंगरे, उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण, जि.प.सदस्य चित्तरंजन कोल्हे, पं.स. सदस्य प्रशांत तायडे आदी उपस्थित होते. नगर पंचायतीला विकासकामाकरीता वैशिष्टपूर्ण योजनेतून किती निधी मिळाला, असे विचारून पालकमंत्री येरावार म्हणाले, राळेगावच्या विकासाकरीता शासन कटिबध्द आहे. येथील तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव नगर पंचायतीने तातडीने पाठवावा. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना द्यावी, असे ते म्हणाले. यावेळी नगर पंचायतीला विकास कामांसाठी 10 कोटी रुपये मिळाले असून 5 कोटी रुपयांमधून किरकोळ रस्ते, 3 कोटी गार्डन, स्मशानभुमी आदी कामांसाठी तर 2 कोटी रुपये व्यापारी संकुलासाठी असल्याचे उपाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार यांनी कळंब- राळेगाव रस्त्याच्या काँक्रेटीकरण करणा-या डी.एल.जी. मशीनचे उद्घाटन केले. यावेळी आमदार डॉ

पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त पिकाची पाहणी

Image
Ø शेतक-यांनी तक्रारी करण्याचे आवाहन यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी कृषी शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांसह कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील राजेंद्र पांडे यांच्या शेतातील बोंडअळीग्रस्त पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, गावचे सरपंच एच.एच. ठाकरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे, कृषी विद्यापीठाचे डॉ. राठोड, डॉ. कोल्हे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे आदी उपस्थित होते.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई करीता शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांनी याबाबत तक्रारी द्याव्यात. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी सहाय्यक स्तरावर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाचे आदेश येताच त्वरीत सर्व्हे करू. बी.टी – 3 या बियाण्याला परवानगी नाही. तरीसुध्दा ते विकले गेले व शेतक-यांनी खरेदी केले. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले त्यांना त्वरीत मदत मिळवून

आरोग्य व विकासासाठी स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी - पालकमंत्री येरावार

Image
राळेगाव पं.स. येथे हागणदारीमुक्तीबाबत कार्यक्रम यवतमाळ, दि. 20 : स्वातंत्र्यपूर्व काळापासून महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा मंत्र आपल्याला दिला आहे. “ स्वच्छता ही सेवा ” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. स्वच्छतेचा संबंध हा आरोग्याशी निगडीत आहे. समाजव्यवस्था निरोगी, निकोप असली तरच देश प्रगतीपथावर पोहचेल. केवळ शौच्छालय बांधून उद्दिष्ट पूर्ण होणार नाही तर स्वच्छतेबाबत जनजागृती करणे ही खरी फलश्रृती आहे. त्यामुळे आरोग्य व विकासासाठी स्वच्छता ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. राळेगाव पंचायत समिती येथे “ उत्सव हागणदारीमुक्तीचा ” याबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार डॉ. अशोक उईके, राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, उपसभापती नीलेश रोठे, जि. प. सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर, प्रिती काकडे, पंचायत समिती सदस्या शिला सलामे, स्नेहा येणोरकर, प्रशांत तायडे, ज्योती खैरकार, राळेगावचे नगराध्यक्ष बबन भोंगारे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अ

स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या तक्रारी सोडवा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

Image
Ø दिग्रस येथे उपविभागस्तरीय समाधान शिबिर   यवतमाळ, दि. 18 : सामान्य नागरिक शासकीय कार्यालयात आपल्या अडीअडचणी घेऊन येत असतात. अधिका-यांनी या तक्रारी गांभिर्याने घ्याव्यात. वारंवार त्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवायला सांगू नये. नागरिकांच्या तक्रारी स्थानिक स्तरावरच सोडविण्यासाठी अधिका-यांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.             दिग्रस येथील तहसील कार्यालयात आयोजित पुसद उपविभागस्तरीय समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी मंचावर पंचायत समिती सभापती विनोद जाधव, जि.प.सदस्य लखन राठोड, हितेश राठोड, उपसभापती केशव राठोड, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी खरवडे आदी उपस्थित होते.             समाधान शिबिरामध्ये तक्रार घेऊन येणा-या नागरिकांच्या तक्रारींसंदर्भात अधिका-यांनी इत्यंभूत माहिती ठेवावी, असे सांगून राज्यमंत्री राठोड म्हणाले, तक्रारकर्त्यांच्या तक्रारीमध्ये काही चुका असल्यास त्याची खात्री करून समाधान करावे. ज्या कामासाठी निधी प्रस्तावित केला आहे, त्याच कामासा

लाभार्थ्यांच्या खात्यात आता ऑलनाईन पध्दतीने थेट रक्कम

Image
Ø जिल्हा परिषद अंतर्गत डीबीटी संकेतस्थळाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 18 : राज्य शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवून लाभार्थ्यांच्या खात्यात ऑनलाईन पध्दतीने थेट रक्कम जमा करणे आता शक्य होणार आहे. यासंदर्भात विकसीत करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद येथील स्व. वसंतराव नाईक सभागृहात लाभाचे थेट हस्तांतरण (डीबीटी) उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला  समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, आयसीआयसीआय बँकेचे शाखा प्रबंधक राहुल लढ्ढा, प्रादेशिक कार्यालयाचे शाखा प्रबंधक प्रदीप बरडे, प्रतिम गजभिये, कौशल भोजानी, अशोक मांडविया आदी उपस्थित होते. या संकेतस्थळामुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणारे कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणा-या राज्य शासनाच्या व जिल्हा परिषद सेसच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. तसेच अर्ज सादर करण्यापासून ते लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा होण्

पत्रकारितेमध्ये स्पर्धा आणि व्यावसायिकता ही आव्हाने – न.मा.जोशी

Image
Ø जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन पत्रकारितेमध्ये स्पर्धा आणि व्यावसायिकता ही आव्हाने – न.मा.जोशी Ø जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन यवतमाळ दि . 16 : आज प्रत्येकच क्षेत्रात आव्हान आहे. पत्रकारितासुध्दा याला अपवाद नाही. पत्रकारितेतील व्यावसायिकता, स्पर्धा, भांडवलदारी प्रवृत्ती आणि विश्वासअहर्ता हे पत्रकारितेतील आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेतील विचार, अभिव्यक्ती आणि मतस्वातंत्र्य कायम राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त आयोजित “ माध्यमांसमोरील आव्हाने ” या विषयाबाबत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेहमूद नाथानी, दिनेश गंधे उपस्थित होते. तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मिडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुढेसुध्दा एक नवीनच आव्हान उभे राहिले आहे, असे सांगून जोशी म्हणाले प्रिंट मिडीयातील पत्रकारितेबद्दल आजही सामान्य नागरिकांमध