राळेगाव नगर पंचायतीमध्ये पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

यवतमाळ, दि. 21 : राळेगाव नगर पंचायत अंतर्गत करण्यात येणा-या विविध विकास कामांसदंर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी नगर पंचायतीत आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, नगराध्यक्ष बबन भोंगरे, उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण, जि.प.सदस्य चित्तरंजन कोल्हे, पं.स. सदस्य प्रशांत तायडे आदी उपस्थित होते.
नगर पंचायतीला विकासकामाकरीता वैशिष्टपूर्ण योजनेतून किती निधी मिळाला, असे विचारून पालकमंत्री येरावार म्हणाले, राळेगावच्या विकासाकरीता शासन कटिबध्द आहे. येथील तलाव सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव नगर पंचायतीने तातडीने पाठवावा. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांना द्यावी, असे ते म्हणाले. यावेळी नगर पंचायतीला विकास कामांसाठी 10 कोटी रुपये मिळाले असून 5 कोटी रुपयांमधून किरकोळ रस्ते, 3 कोटी गार्डन, स्मशानभुमी आदी कामांसाठी तर 2 कोटी रुपये व्यापारी संकुलासाठी असल्याचे उपाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार यांनी कळंब- राळेगाव रस्त्याच्या काँक्रेटीकरण करणा-या डी.एल.जी. मशीनचे उद्घाटन केले. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, भोपाळ येथील बेडकॉम कंपनीचे व्यवस्थापक सुनील तोमर उपस्थित होते. सदर रस्त्याची लांबी 50 किमी असून रुंदी 10 मीटर आहे.

                                                000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी