तालुकास्तरावर कुक्कुटपालनाचे मदर युनीट त्वरीत सुरू करा - पालकमंत्री मदन येरावार

स्वयंम प्रकल्प आणि जिल्हा खनीज प्रतिष्ठान आढावा बैठक
यवतमाळ, दि. 3 : आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आहारात कुक्कुटपालनाच्या माध्यमातून नियमित अंड्यांचा पुरवठा करणे, या उद्देशाने स्वयंम प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ही अतिशय महत्वाची योजना असून कुपोषण निर्मुलन आणि रोजगार निर्मिती या दोन्ही गोष्टी यामुळे साध्य होऊ शकतात. स्वयंम प्रकल्पामध्ये  रोजगार निर्मितीची क्षमता असल्याने स्थानिक स्तरावर कुक्कुटपालनाचे मदर त्वरीत सुरू करावे, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वयंम प्रकल्पाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी.आर. रामटेके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जी.एस. इवनाथे, विश्वास डाखोरे, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत सुर्यवंशी उपस्थित होते.
स्वयंम प्रकल्प हा राज्यपाल आणि राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, ग्रामीण परसातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाड्यांमधील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक स्तरावर कुक्कुटपालनाला चालना देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यातून स्वयंरोजगार निर्मिती होणार आहे. तालुका स्तरावर कुक्कुटपालनाचे मदर युनीट सुरू करण्यासाठी ज्या इच्छुकांनी अर्ज केले आहे, ते प्रस्ताव तातडीने मार्गी लावावे. ज्या तालुका स्तरावर एकच अर्ज आला आहे, अशा ठिकाणी मदर युनीट त्वरीत सुरू करावे. एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर निकषानुसार अर्जाची छाणनी करून मदर युनीट सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी. पशुसंवर्धन विभागाने कालबध्द कार्यक्रमानुसार नियोजन करून प्रशिक्षणासह डिसेंबरअखेरपर्यंत मदर युनीट सुरू होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सुचना पालकमंत्री येरावार यांनी केले.
            अनुसूचित क्षेत्र व आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये मदर युनीट मार्फत सुधारीत जातीचे चार आठवडे वयाच्या पक्षांचे 100 टक्के अनुदानावर वाटप करायचे आहे. जिल्ह्यात पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 8 बालाविकास प्रकल्प तर पुसद प्रकल्पांतर्गत 4 बालविकास प्रकल्प असे एकूण 12 बालविकास प्रकल्प जिल्ह्यात कार्यरत आहे. याअंतर्गत कुक्कुटपालन मदर युनीट सुरू करण्यासाठी इच्छुक अर्जाची संख्या 27 आहे. प्रत्येक बालविकास प्रकल्पामध्ये एक मदर युनीट स्थापन करून त्यामार्फत 417 लाभार्थ्यांना सदर पक्षांचा तीन टप्प्यामध्ये पुरवठा करायचा आहे. 
  बैठकीला जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, डॉ. अ.म.खोडवे, जी.आर. ठाकरे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा खनीज प्रतिष्ठान बैठक : पालकमंत्री मदन येरावार यांनी खनीज बाधित क्षेत्रात करावयाच्या विकास कामासंदर्भात जिल्हा खनीज प्रतिष्ठानची बैठक घेतली. यावेळी आमदार वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अधिक्षक अभियंता काटपिल्लेवार, जिल्हा खनीकर्म अधिकारी महाजन, वणी नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बोरकर, विजय पिदूरकर, वेस्टर्न कोलफिल्डचे सुनीलकुमार आदी उपस्थित होते.
खनीज बाधित क्षेत्रात पाणी पुरवठा, कौशल्य विकास, शिक्षण व क्रीडा, पर्यावरण संवर्धन व प्रदुषण नियंत्रण उपाययोजना या विकासकामांना प्राधान्य आहे. तसेच वणी येथील ग्रामीण रुग्णालय सोयीसुविधायुक्त करून तेथे त्वचारोग तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात येईल. प्रदुषण निर्मुलनासाठी खनीजबाधित क्षेत्रातील रस्त्यांच्या दुतर्फा जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष लावावेत. तसेच अशा क्षेत्रात पर्यावरणपूरक विषय प्राधान्याने हाताळावे, असे पालकमंत्री येरावार म्हणाले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
                                                            000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी