Posts

Showing posts from 2023

पिकस्पर्धेतील विजेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला या कृषी विद्यापीठाच्या, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, महोसव-२०२३ च्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते ‘पिक स्पर्धेत विजयी झालेल्या शेतकऱ्यांचे सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सन्मानीय डॉ. शरद गडाख, कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचे संकल्पनेतून तर डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक यांच्या मार्गदर्शनातून आदर्शगाव संकल्पना राबविण्यात येत आहे.वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ सुरेश नेमाडे , यांच्या नेतृत्वातून कृषि विज्ञान केंद्राकडून आदर्शगाव म्हणून बाभूळगाव तालुक्यातील महमदपूर या गावाची निवड करण्यात आली. सदरच्या दत्तक गावामध्ये खरीप हंगामामध्ये कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत सोयाबीन पिकाकरीता ‘पिक स्पर्धेचे’ आयोजन करयात आले होते. सदरची ‘पिक स्पर्धा’ एकुण २५ एकरावर वर राबिवण्यात आली होती. यामध्ये एकुण २५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या ‘पिक स्पर्धेच्या’ माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे शिफारसीत तंत्रज्ञानाची माहिती देवून, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्राने व

तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

हंगाम २०२३-२४ मध्ये नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत बाजार भावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत ३ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. यात महागाव तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा तालुका खरेदी विक्री समिती, दिग्रस खरेदी विक्री समिती यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी दिनांक १३ डिसेंबर २०२३ ते शासनाकडून अंतिम मुदतीचा आदेशा प्राप्त होईपर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे आधारकार्ड, सातबारा उतारा, ऑनलाईन पिकपेरा व बँकेचे पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवुन तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीवगुण देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सन 2024 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 12 वी परिक्षा प्रविष्ठ होणाऱ्या जिल्हास्तर, विभागस्तर, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याच्या दृष्टीने ग्रेस गुणांचे सर्व मान्यताप्राप्त शाळांनी इयत्ता 10 व इयत्ता 12 विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास दि. 1 जानेवारी ते दि. 31.मार्च 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन , यवतमाळचे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना केले आहे.

जिल्हा जागतिक कौशल्य स्पर्धेच्या नोंदणीसाठी 7 जानेवारी पर्यत मुदत

जगभरातील नवयुवकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारी जागतिक कौशल्य स्पर्धा यंदा फ्रान्समधील ल्योन येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून जिल्ह्यातील नवयुवकांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवयुवकांनी आज 7 जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि हि जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. नव्या वर्षामध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य परिषद, विविध औद्यागिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर

एमआयडीसीतील मूलभूत सोयीसुविधांची कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

◆ उद्योगांच्या अडचणींचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा ◆ जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील सोयीसुविधा आणि विविध अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी एमआयडीसीतील मूलभूत सोयीसुविधांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा झाली. या सभेला उपविभागीय अधिकारी डॉ याशनी नागराजन, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण, यवतमाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा, उपाध्यक्ष संदीप तातेड, सचिव आनंद भुसारी, सहसचिव जितेश पतीरा आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध भागातील उद्योजक उपस्थित होते. यवतमाळ येथील अतिरीक्त औद्योगिक क्षेत्रातील भुखंडाचे वाटप, मुलभुत सोयीसुविधा नसल्यामुळे उद्योजकांना येणाऱ्या अडचणी, विविध परवानग्या, नेर, आणि, मारेगांव, पांढरकवडा व उमरखेड येथे अतिरीक्त नवीन जागा शोधणे, घाटंजी, वणी आणि उमरखेड औद्योगिक क्षेत्रासाठी जागा संपादित करणे, एमआयडीसीतील अतिक्रमण,

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मधपाळ व संस्थांनी मधकेंद्र योजनेचा लाभ घ्यावा

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मध केंद्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मधपाळ व संस्थांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. योजनेअंतर्गत मध उद्योगासाठी मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्व:हिस्सा, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी व विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करण्यात येणार आहे. वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार हा साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, केंद्रचालक प्रगतीशिल मधपाळकरीता अर्जदार किमान इयत्ता 10 वी पास असावा. त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या नावे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंदचालक संस्थाकरीता संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली 1 हजार फुट सुयोग्य

हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा पिकावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी जे आर राठोड यांनी केले आहे. सद्यस्थितीत हरभऱ्याचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व या दरम्यान या घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटे अळीही हरभरा पिकावरील प्रमुख कीड असून या किडीची मादी पंतग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फुंलावर एकेरी अंडे घालतात ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातुन 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पड़ते ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पान प्रथम पिवळसर पांढुरी होवून वाळतात व गळून पडतात थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खावुन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्या शिल्लक राहतात. पूढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया प्रामुख्याने फुले व घाटंयाचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाटयाला छिद्र करून आतील दाणे खावुन घाटे पोखरतात एक अळी साधारणतः 30 ते 40 घाटंयाचे नुकसान करते. एकात्मिक व्यवस्थापन : घाटेअळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, क

प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे महाऊर्जातर्फे आवाहन

महाऊर्जामार्फत महाकृषी ऊर्जा अभियानाच्या पी.एम.कुसुम योजना घटक-ब योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3, 5 व 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. याकरीता शेतकऱ्यांचे अर्ज अधिकृत ऑनलाईन लिंक व्यतिरिक्त महाऊर्जामार्फत कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यात येत नाहीत. त्यामुळे खोट्या किंवा फसव्या संकेतस्थळांना, फसव्या दुरध्वन व भ्रमणध्वणीच्या संभाषणाला,आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडु नये व अशा संकेतस्थळावर,ॲपवर कोणत्याही पध्दतीने पैशाचा भरणा करु नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांस 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो. ही योजना राबविण्याकरीता महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असून लाभार्थी शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळांचा उपयोग नोंदणी व इतर माहिती प्राप्त करण्यासाठी करावा. https://kusum.mahaurja.com/solar/

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक केंद्राचे आज उद्घाटन मतदारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी

निवडणूक विभागाच्या नविन इमारतीमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक केंद्राचे आज दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ईव्हीएम प्रात्यक्षिक समजून घेण्यासाठी सामान्य जनतेने मोठ्यासंख्येने या केंद्रास भेट द्यावी व शासनाच्या मोहिमेस आवश्यक सहकार्य करावे. तसेच मतदारांनी या जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा, आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या पत्रानुसार जनजागृती कार्यक्रमाचे वेळापत्रक या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. निवडणूक घोषीत करण्याच्या ३ महिने अगोदर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. या अनुषंगाने जनजागृती मोहीमेचे वेळापत्रक अथवा आराखडा तयार करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांना पाठविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रामध्ये बॅनर, प्रात्यक्षिक टेबलाजवळ आणि पुर

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनीचे १३ ते १७ जानेवारी दरम्यान आयोजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन होणार

राज्य शासनाचा कृषी विभाग व आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयाच्या वतीने १३ ते १७ जानेवारी २०२४ दरम्यान जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनीचे आयोजन पोस्टल ग्राउंड (समता मैदान) यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड, यांच्या शुभहस्ते होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत आहे. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार असणार आहेत. या महोत्सवामध्ये शेतकरी, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेले धान्य जसे गहू ज्वारी विविध प्रकारच्या डाळी जसे मुगडाळ, तुरडाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, विविध प्रकारचा भाजीपाला, जिल्ह्यात पिकत असलेले विविध प्रकारचे फळे जसे संत्रा, लिंबू, मोसंबी, चिकू, सिताफळ, पेरू, ड्रॅगन फ्रुट याशिवाय वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रक्रियायुक्त पदार्थ जसे लोणची, पापड, हळद पावडर, मिरची पावडर, गुळ, मसाले इत्यादी बाबी शहरातील ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. याशिवाय सेंद्रिय शेतीमधील सेंद्रिय गहू सेंद्रिय डाळी सेंद्रिय भाजीपाला सेंद्रिय पदार्थ द्वारे पिकवण्यात आलेले फळे इत्

पशुवैद्यकीय सेवा पोहोचणार पशुपालकांच्या दारात फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन

जिल्ह्यातील पशुधनाच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टिने पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. राज्यातील पशुधनाची क्षमता, उत्पादकतेत वाढ आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. राज्यातील दुर्गम, डोंगराळ आदिवासीबहुल भागामध्ये तसेच दळणवळणाच्या सोई अपुऱ्या आहेत, अशा तालुक्यांमध्ये पशुवैद्यकिय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ व रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३२९ फिरते पशुचिकित्सालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ८० पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पशुचिकित्सा पथकामध्ये एक पदवीधर पशुवैद्यक, एक पदविकाधारक पशुवैद्यक व एक वाहन चालक तथा मदतनीस यांचा समावेश असेल. या पथकाच्या माध्यमातून रोगनिदान, औषधोपचार, लसीकरण, शल्यचिकित्सा तसेच दृकश्राव्य माध्यमांव्दारे विस

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा कृषी विभागाचे आवाहन

रब्बी हंगामास सुरुवात झाली असून तूर पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तूर पीक संरक्षणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काळजी घेवून वेळीच कीड व रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकांचे संरक्षण केल्यास समाधानकारक उत्पन्न मिळू शकते. तुरीवरील शेंगा पोखणाऱ्या अळीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास कीड पिकाचे नुकसान करते. शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरवातीला पिकांच्या कोवळ्या पानावर फुलांवर किवां शेंगावर उपजिविका करतात. नंतर शेंगा भरतांना त्या दाणे खातात. दाणे खात असतांना त्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खूपसुन व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत आढळतात, त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६० ते ८० टक्के नुकसान होते. त्यामुळे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. एकात्मीक व्यवस्थापन कसे करावे : सुरुवातीच्या काळात ५ टक्के निबोंळी अर्काची फवारणी करावी. तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा. तुरीमध्ये एकरी ४ कामगंध सापळे पिकांच्यावर एक फुट उंचीवर लावावेत. जैविक किटकनाशके : तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या हेलीकोव्हरपा अळीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एचए

दिव्यांगांना मिळणार फिरते दुकान ४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल अर्थात फिरते वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी ४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेला दि. १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. योजनेचा उद्देश : दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे तसेच आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी व अर्ज करण्यासाठी दि. ३ डिसेंबर रोजी पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in हि लिं

पांढरकवडा येथे भव्य रोगनिदान शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा शिबीर

पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पांढरकवडा परिसरातील जनतेकरिता आरोग्य सेवा व भव्य रोगनिदान शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. अकोल्याचे उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, यवतमाळचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये आदिवासी भागातील रुग्णांना मुख्यत्वे करून ज्या रुग्णांना शस्त्रक्रीयेची गरज आहे परंतु ते जिल्हा स्तरावर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी विशेष तज्ञ उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथे शस्त्रक्रिया केल्या जातील तरी जनतेने या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराचे वैशिष्टेः शिबिरामध्ये हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स व शरीरातील इतर गाठींचे तसेच अस्थी रुग्णाची तपासणी करून शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येईल. दंत विकार, मुखरोग व कर्करोग असणाऱ्या रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात येईल. शिबिरामध्ये बालरुग्ण, कुपोषित

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हरभरा पिकावरील मररोगाचे व्यवस्थापन करावे

जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरभरा पिकावरील मररोग व स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. या रोगांच्या नियंत्रणासाठी कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालयामार्फत उपाययोजनांची शिफारस करण्यात केली आहे. या शिफारशीनुसार हरभरा पिकावरील मररोगाच्या व्यवस्थापनाकरीता ट्रायकोडर्मा २ किलो प्रति ४० किलो शेणखतात मिसळुन प्रति एकरी समप्रमाणात टाकावे. हरभऱ्यावरील स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थानासाठी निबोळी अर्क ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 x 10 पीओबी प्रति मिली) ५०० एलई प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ६.६ मिली किंवा लॅम्बडा सायहालोथ्रीन ५ टक्के इसी ८ मिली किंवा फ्युबेन्डामाइड ८.३३ टक्के + डेल्टामेथ्रीन ५.५६ टक्के एससी ५ मिली किंवा नोवालुरोन ५.२५ टक्के + इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एससी १६

हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या किडीचे व्यवस्थापन करावे

हरभरा पिकासर शेंडे, पाने व रोप कुडतडणाऱ्या अळी अर्थात कट वर्म या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचे प्रकार व व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अळी ही एक बहुभक्षीय कीड असून या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होतो. मादी पतंग सुरुवातीला पिकाच्या व तणाच्या पानांवर तसेत कोवळ्या शेंड्यांवर एक एक करून किंवा समुहाने ३०० ते ४५० अंडी घालते. अळीची लांबी ही ०.२ ते १.५ इंच असते या अळीचा रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो. या अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजुने असतो. शेतात पाने, शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसून येतात. मात्र, अळी ही झाडाच्या बुंद्याला मातीमध्ये लपून बसते व मुख्यत्वे रात्री पिकावर येवून पाने व शेंडे कुरतडते. प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील हि अळी पिकावर आढळून येते. पूर्ण वाढ झालेली अळी १.५ ते २ इंच लांब असते. अळीला स्पर्श केल्यास ती शरीराचा "सी" आकार करतांना दिसून येते. पिकाच्या सर्व अवस्थामधे या अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो. हि कीड रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप कुरतडते व न

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नामांकित 17 कंपन्या उपस्थित राहणार रिक्त 2 हजार 254 पदांसाठी मुलाखती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करीयर सेंटर मार्फत आमदार मदन येरावार यांच्या मतदारसंघात अमोलकचंद महाविद्यालय येथे दि.23 डिसेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात वैभव एन्टरप्रायजेस नागपूर, फेरोइंडिया प्रा.लि. पूणे, मेगाफिड बायोटेक नागपूर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यवतमाळ, सारा स्पिंटेक्स धामणगाव रोड, यवतमाळ, भुमी विकास इन्डस्ट्रिज पुसद, इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर व इतर नामांकित अशा एकुण 17 कंपन्या उपस्थित राहणार आहे. या कंपन्या त्याच्याकडील रिक्त 2 हजार 254 पदांसाठी मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार आहे. मेळाव्यामध्ये इयत्ता 10 वी, 12 वी, आयटीआय, पदविकाधारक, पदविधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून संधीचा लाभ घेता येणार आहे. मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीद्वारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमे

अडाण प्रकल्पाच्या मुख्य कालवा व वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी १८२ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेला शब्द पाळला ५२०७ हेक्टर क्षेत्र पुर्नस्थापित होणार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अडाण मध्यम प्रकल्पांतर्गत मुख्य कालवा व वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी १८२ कोटी १ लाख ४९ हजार ६९३ रुपये खर्चाच्या प्रस्तावास राज्य शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विशेष दुरुस्तीअंतर्गत प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता कामाच्या अंदाजपत्रकानुसार या खर्चाच्या प्रस्तावास देण्यात आली आहे. त्याचा शासन निर्णय १५ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. अडाण प्रकल्पाचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी जवळजवळ दोनशे कोटींचा निधी आणणार असल्याचा शब्द पालकमंत्री संजय राठोड यांनी जाहीर सभेत दिला होता. हा दिलेला शब्द पाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी दिलेला शब्दही पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे वाशिम जिल्यातील कारंजा आणि यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. अडाण मध्यम प्रकल्प हा विदर्भ पाटबंधारे विकास मह

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेनंतर्गत जिल्ह्यातील ३०७४ घरकुलांसाठी ३८ कोटींचा निधी मंजूर

पालकमंत्री संजय राठोड यांचा पाठपुरावा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यांतील एकूण ३०७४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाने कार्योत्तर मान्यता दिली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याने या घरकुलांसाठी जिल्ह्याला ३८ कोटी ३६ लाख ३५ हजार २०० रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी यापूर्वी ४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधीमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी आता ८ कोटी ५९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचा शासन निर्णय १४ डिसेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील गोरगरीब, गरजूंना घरकुल मिळावे अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे सातत्याने होत होती. त्यांनी ही मागणी शासनस्तरावर सातत्याने लावून धरली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत आहे. पालकमंत्री श्री राठोड हे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी खेचून आणत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात सध्या हजारो कोटींची कामे सुरू आहेत. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रव

विकसित भारत संकल्प यात्रा, प्रधानमंत्र्यांचा लाभार्थ्यांशी संवाद

Image
Ø आ.डॅा.धुर्वे, आ.डॅा.उईकेंची उपस्थिती Ø विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाभार्थ्यांशी दुरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्ह्यात ठिकठिकाणी या संवादाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. या संवाद कार्यक्रमास आमदार डॅा.अशोक उईके, आमदार डॅा.संदीप धुर्वे उपस्थित होते. केंद्र शासनाच्या योजनांची जनजागृती तसेच या योजनांपासून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी दि.15 नोव्हेंबर पासून देशभर विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागात जनजागृती रथाद्वारे योजनांची प्रचार प्रसिद्धी केली जात असून पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जात आहे. ही मोहिम दि.26 जानेवारी पर्यंत चालणार आहे. या उपक्रमानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभर लाभार्थ्यांशी संवाद साधला. या संवादाचे जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींच्या ठिकाणी लाईव्ह प्रसारण करण्यात आले. त्यात यवतमाळ तालुक्यातील मडकोना, उमरखेड तालुक्यातील दराटी, पुसद तालुक्यातील बन्सी, केळापूर तालुक्यातील वांजरी, राळेगाव तालुक्या

चारा पिके उत्पादनासाठी शेतकऱ्यांना एक रुपयात जमीन

राज्यातील दुष्काळी परिस्थिती विचारात घेता जनावरासाठी गाळपेर, चारा पिके उत्पादनासाठी शेतकऱ्यांना जलाशयातील, तलावाखालील जमीन नाममात्र एक रुपये दराने भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहे. गाळपेर जमिनीमध्ये जनावरासाठी सुयोग अशी वैरण व चारा पिके मका, ज्वारी व बाजरी किंवा वैरण समृध्द पिके जसे न्युट्रिफीड व तत्सम घेण्यात यावी. चारा पिके, वैरण पिके घेण्यासाठी पशुसवर्धन विभागामार्फत विभागाच्या विविध योजनामधून बियाण्यांची विनामुल्य उपलब्धता करुन देण्यात येईल. गाळपेर जमिनीवर घेण्यात येणाऱ्या वैरण पिकासाठी जलाशयातील पाणी विनामुल्य उपलब्ध राहील तसेच उपसासनाही परवानगी देण्यात येईल. त्यासाठी कोणतीही पाणीपट्टी आकारण्यात येणार नाही. राज्य शासनाच्या कृषी व पदुम शासन निर्णय अटी व शर्तीला अधिन राहुन प्राधान्य क्रमाने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. याबाबत सविस्तर माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, यवतमाळ अधिक्षक अभियंता (सिंचन), जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता मृद व जलसंधारण कार्यालय यवतमाळ येथे संपर्क करावा. लाभार्थ्यांनी दि २२ डिसेंबरपर्यंत विहित नमुन्यात जलसंपदा, जलसंधार

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अग्रेसर करावे - डॉ पंकज आशिया

Image
जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अग्रेसर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी करण्यात आले. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजन करण्यात आले होते. या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जी.यु. राजूरकर उपस्थित होते. या सादरीकरण सत्रासाठी एकूण ३३ इनोव्हेंटर्सपैकी २५ इनोव्हेटर्स उपस्थित होते. या इनोव्हेटर्सना मुल्यांकन करण्यासाठी १७ ज्युरी मेंबर्स उपस्थित होते. उमेदवारांनी सादरी केलेल्या नाविन्य संकल्पना जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यस्तरावर सादरीकरण करून यवतमाळ जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अग्रेसर करावे, असे आव्हान जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी यावेळी केले. म

यवतमाळच्या जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात विविध सुविधा : नागरिकांना सुविधांचा लाभ घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन

Image
यवतमाळ येथे ऑगस्ट 2022 पासून जिल्हा स्त्री व बाल रुग्णालय यवतमाळ येथे समता मैदान, तिरंगा चैक यवतमाळ येथे सुरु करण्यात आलेले आहे. या रुग्णालयामध्ये महिला व बालकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या रुग्णालयात गर्भवती महिला (एएनसी) संबंधित संपूर्ण आरोग्य तपासणी (रक्त चाचणी, रक्त सक्रंमप पुरवठा, सोनोग्राफी, आहार सुविधा, गर्भपात (एमटीपी), प्रसुती (डिलेव्हरी) प्रसुती शस्त्रक्रिया (एलएससीएस) गर्भवती महिलांना समुपदेशन करण्यात येते. तसेच इतर सुविधा कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया (फॅमिली प्लॅनिंग) मैत्री क्लीनिक, जननी सुरक्षा योजनेचा लाभ, नियमीत लसीकरण, याबाबत च्या सूविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. यवतमाळ शहर व ग्रामीण भागातील गर्भवती महिला यांनी शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालय यवतमाळ यांचा लाभ घेण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व वैद्यकिय अधिक्षक, महिला व बाल रुग्णालय यवतमाळ डॉ. रवि पाटील यांनी कळविण्यात आलेले आहे. या मुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील जनतेने लाभ घ्यावा. जिल्हा महिला व बाल रुग्णालय, यवतमाळ येथे बाह्यरुग्ण व अंतररुग्ण, प्रसुती गर्भवती आरोग्य तपासणी करण

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शिअल पब्लिक स्कूल मध्ये प्रवेशाकरीता प्रवेश परीक्षा दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मा. अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे अधिनस्त असलेल्या प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगर पालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता आयाजित करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत सदर प्रवेश परीक्षा शासकीय आश्रमशाळा शिबला, ता. झरी जि. यवतमाळ व शासकीय आश्रमशाळा अंतरगांव ता.कळंब जि. यवतमाळ या परीक्षा केंद्रावर दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी 11 ते 1 या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेकरीता विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पांढरकवडा प्रकल्प कार्यालय व कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. करीता या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हापरिषद, नगरपालिका तथा नगरपरिषदांच्या प्राथमिक तथा माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य प्राथमिक तथा अनुदान

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह १४ ते २० डिसेंबरदरम्यान

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे व ऊर्जा संवर्धनासाठी “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह दि. १४ ते २० डिसेंबरदरम्यान राबविण्यात येत आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत ऊर्जा संकट व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी दिली. नवीन व नवीकरणीय ऊर्जेचे तसेच ऊर्जा बचतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आजही जवळपास ६० टक्केपेक्षा जास्त ऊर्जा निर्मिती ही औष्णिक ऊर्जा निर्मिती पध्दतीने केली जाते. तथापि पारंपरिक पध्दतीने ऊर्जा निर्मिती करतांना पर्यावरणामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस सोडले जातात. यामध्ये कार्बन, क्लोराईड, नॉयट्रोजन, सल्फेट यांचा अंतर्भाव असतो. या वायुंचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून जागतिक उष्णतामान वाढत आहे. याची आपण सर्वांना जाणीव आहे. पारंपरिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमीत असल्याने सद्य:स्थितीत नित्यनूतनशील ऊर्जा व ऊर्जा बचतीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहामध्ये शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत ऊर्जा संकट

आरबीआयच्या नावाने कर्जमाफीच्या ऑफरपासून सावधनतेचा इशारा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या काही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती लक्षात आल्या आहेत, या संस्था प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा अनेक मोहिमांचा सक्रियपणे प्रचार करत असल्याचे दिसते. अशा संस्था कोणत्याही अधिकाराशिवाय 'कर्जमाफी प्रमाणपत्रे' जारी करण्यासाठी सेवा,कायदेशीर शुल्क नाकारत असल्याच्या बातम्या आहेत. हे देखील आमच्या निदर्शनास आले आहे की काही ठिकाणी, काही व्यक्तीद्वारे मोहिमा चालवल्या जात आहेत, ज्यामुळे बँकांना आकारल्या जाणाऱ्या सिक्युरिटीजवर त्यांचे अधिकार लागू करण्याच्या बँकांच्या प्रयत्नांना खीळ बसते. बँकांसह वित्तीय सस्थांची थकबाकी भरण्याची गरज नाही, असा चुकीचा अर्थ अशा संस्था देत आहेत. अशा कृतीमुळे वित्तीय संस्थांची स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठेवीदारांचे हित बिघडते. हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते की अशा संस्थांशी संबंध ठेवल्याने थेट आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या मोहिमांना बळी पडू नये आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना अशा घटनांचा अहवाल द्यावा, असे जनतेच्या सदस्य

जिल्हाधिकारी कार्यालयात भाडेतत्वावर वाहनासाठी निविदा आमंत्रित

जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर वाहन घेण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या आहेत. एप्रिल २०२३ नंतरचे एसी टॅक्सी परमीट इनोव्हा क्रेस्टा व्ही मॉडेल जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासाठी एप्रिल २०२३ नंतरचे एसी टॅक्सी परमीट इनोव्हा क्रेस्टा व्ही मॉडेल किंवा इनोव्हा क्रेस्टा हायब्रीड व्हीएक्स मॉडेल वाहन भाडेतत्वावर किंवा इनोव्हा क्रेस्टा हायब्रीड व्हीएक्स मॉडेल वाहन भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. पुरवठादार, कंत्राटदार, संस्थेकडून भाडेतत्वावर वाहन ११ महिन्यासाठी किंवा कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्याबाबत जाहीर नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच निवडणूक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक निविदाधारक यांनी निविदा आवश्यक परिपूर्ण कागदपत्रांसह विहित कालावधीत दाखल करावी, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुदर्शन गायकवाड यांनी कळविले आहे.

हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या किडीचे व्यवस्थापन करावे

हरभरा पिकासर शेंडे, पाने व रोप कुडतडणाऱ्या अळी अर्थात कट वर्म या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचे प्रकार व व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अळी ही एक बहुभक्षीय कीड असून या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होतो. मादी पतंग सुरुवातीला पिकाच्या व तणाच्या पानांवर तसेत कोवळ्या शेंड्यांवर एक एक करून किंवा समुहाने ३०० ते ४५० अंडी घालते. अळीची लांबी ही ०.२ ते १.५ इंच असते या अळीचा रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो. या अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजुने असतो. शेतात पाने, शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसून येतात. मात्र, अळी ही झाडाच्या बुंद्याला मातीमध्ये लपून बसते व मुख्यत्वे रात्री पिकावर येवून पाने व शेंडे कुरतडते. प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील हि अळी पिकावर आढळून येते. पूर्ण वाढ झालेली अळी १.५ ते २ इंच लांब असते. अळीला स्पर्श केल्यास ती शरीराचा "सी" आकार करतांना दिसून येते. पिकाच्या सर्व अवस्थामधे या अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो. हि कीड रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप कुरतडते व

मरणोत्तर नेत्रदानामुळे मिळणार दोन अंधांना दृष्टी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथे गजानन रामजी तोडासे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. पारवा येथील रहिवासी गजानन तोडासे यांचा वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथील अपघात विभागामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी त्यांच्या परिवाराने नेत्रदानाची संमती देऊन आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. या नेत्रदानासाठी मुलगा अभिषेक गजानन तोडासे व अविनाश गजानन तोडासे यांनी वडीलांचे नेत्रदान करण्यास संमती दिली होती. दरम्यान नेत्रदान समुपदेशक सोनाली घायवान यांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दुखात सामील होवुन मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्याबाबत समुपदेशन केले होते. नेत्रदान संमतीनंतर वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथील नेत्र विभागातील डॉ. तेजस्विनी गोंडाने, डॉ. सादिक बेनीवाले, डॉ. चिंतन तिमांडे यांनी डॉ. सुधीर पेंडके, डॉ. स्नेहल बोडे, डॉ. अक्षय पडगीलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदान का व कसे करावे : तोडासे परिवाराचा आदर्श डोळ्यासमो

कबड्डीपटुंमध्ये राज्याचा नावलौकिक करण्याचे सामर्थ्य

Image
जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांचे प्रतिपादन शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन पहिल्यांदाच मॅटवर होत असलेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सांघीक भावनेने खेळ खेळत खेळाडूंनी कौशल्यपणाला लावले. राष्ट्रीय स्पर्धेत प्रविण्यप्राप्त करून राज्याचा नावलौकिक करण्याचे सामर्थ्य कबड्डीपटुंमध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय १९ वर्षातील मुले व मुलींचे शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया बोलत होत. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,दादोजी कोंडदेव पुरस्कार्थी डॉ उल्हास नंदुरकर, सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळचे अध्यक्ष अभय राऊत, सचिव नंदू वानखडे, यवतमाळ जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे सचिव विश्वनाथ झिगे, प्राचार्य सोपानराव काळे, कबड्डीपटू लाला राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, न

यंदाची जागतिक कौशल्य स्पर्धा फ्रान्समध्ये होणार : नवयुवकांना सहभागी होण्याची संधी

Ø 20 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जगभरातील नवयुवकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारी जागतिक कौशल्य स्पर्धा यंदा फ्रान्समधील ल्योन येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून जिल्ह्यातील नवयुवकांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवयुवकांनी आज 20 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि हि जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. नव्या वर्षामध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य परिषद, विविध औद्य

हरभरा पिकावरील मररोगाचे व्यवस्थापन करावे

जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरभरा पिकावरील मररोग व स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. या रोगांच्या नियंत्रणासाठी कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालयामार्फत उपाययोजनांची शिफारस करण्यात केली आहे. या शिफारशीनुसार हरभरा पिकावरील मररोगाच्या व्यवस्थापनाकरीता ट्रायकोडर्मा २ किलो प्रति ४० किलो शेणखतात मिसळुन प्रति एकरी समप्रमाणात टाकावे. हरभऱ्यावरील स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थानासाठी निबोळी अर्क ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 x 10 पीओबी प्रति मिली) ५०० एलई प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ६.६ मिली किंवा लॅम्बडा सायहालोथ्रीन ५ टक्के इसी ८ मिली किंवा फ्युबेन्डामाइड ८.३३ टक्के + डेल्टामेथ्रीन ५.५६ टक्के एससी ५ मिली किंवा नोवालुरोन ५.२५ टक्के + इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एससी १

महिला लोकशाही दिन 18 डिसेंबरला

महिलांच्या तक्रार निवारणासाठी सोमवारी दि. 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनी जिल्ह्यातील तक्रारग्रस्त महिलांनी तक्रारी मांडव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर जिल्ह्यात शेळी, गाई व म्हशी गट वाटप सुरु १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षात ५० टक्के अनुदानावर सर्व प्रवर्गासाठी शेळी, गाई व म्हशी गट वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी १८ डिसेंबरपर्यंत अर्ज संबंधित तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा निवड समिती अध्यक्षांनी केले आहे. या योजनेमध्ये १६.२ टक्के अनुसूचित जाती व जमातीचे आठ टक्के लाभार्थींची निवड होणार असून ३० टक्के महिला व ३ टक्के दिव्यांग लाभार्थीस प्राधान्य देण्यात येणार आहे. शेळी गट प्रकल्पात २० शेळ्यांसाठी मापदंड मर्यादा प्रती शेळी सहा हजार रुपये, एकूण किंमत मर्यादा एक लाख २० हजार रुपये, एका गटासाठी ५० टक्के म्हणजेच अनुदान ६० हजार रुपये, दोन बोकडांसाठी मापदंड मर्यादा प्रती बोकड ७ हजार रुपये एकूण किंमत मर्यादा १४ हजार रुपये, एका गटासाठी ५० टक्के म्हणजे ७ हजार रुपये अनुदान, शेळ्यांसाठी गोठा किंवा वाडा बांधकामासाठी मापदंड मर्यादा ४५० चौरस फुट प्रती चौरस फुट २१२ रुपये एकूण किंमत मर्यादा ९५ हजार ४०० रुपये, एका गटासाठी ५० टक्के म्हणजे ४७ हजार ७० अनुदान, एकूण किंमत मर्याद

शाळा, अंगणवाडीतील १०८ मुलामुलींची टूडी इको आरोग्य तपासणी

८ व ९ डिसेंबरला टूडी इको शिबीर संपन्न ; हृदयरोग शस्त्रक्रियासंबंधी ४८ विद्यार्थी रेफर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शून्य ते १८ वयोगटातील शासकीय व निमशासकीय शाळा व अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांची व बालकांची टूडी इको आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण १०८ विद्यार्थ्यांचे टूडी इको करण्यात आले. या टूडी इको तपासणीनंतर हृदयरोग शस्त्रक्रियासंबंधी ४८ विद्यार्थ्यांना संदर्भीत करण्यात आले. या संदर्भीत करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार झालेले हॉस्पीटल व महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही टूडी इको आरोग्य तपासणी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण ४३ पथके कार्यरत आहे. या पथकामध्ये दोन वैद्यकिय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व परिचारीका यांचा समावेश आहे. हे पथक ग्रामीण भागात जाऊन शाळा व अंगणवाडीमधील मुलामुलींची आरोग्य तपासणी करतात. तपासणी दरम्यान संशयित हृदयरोग या गंभीर आजाराने आढळल्यास त्या विद्यार्थी, बालकाची जिल्हास्तरावर पूर्व तपासणी क

लाभार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा- आ.डाॅ.संदीप धुर्वे

Image
वाघोली येथे विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ.डॅा.संदीप धुर्वे यांनी केले. केळापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वाघोली येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन आ.डॅा.धुर्वे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदारांसह तहसिलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी रविंद्रकुमार सांगळे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील सर्वच घटकातील सर्वसामान्य व्यक्ती, कुटुंबासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांना मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रथाद्वारे योजनांची जनजागृती केली जात असून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जात आहे. विविध योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी यात्रा मोहिम कालावधीत लाभ घ्यावे, असे आवाहन डॉ.धुर्वे यांनी केले. घरकुलासाठी गरीब लाभार्थ्यांना जागा उपलब्ध कर

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १३ हजार १४७ प्रकरणे निकाली वकील व पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
जिल्ह्यातील विविध न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १३ हजार १४७ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाचे अध्यक्ष एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या हस्ते झाडाला पाणी देवून करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार, जिल्हा वकील संघाच्या सचिव शिल्पा घावडे, तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आदी उपस्थित होते. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका व विशेष म्हणून जिल्हा परिषद अंतर्गतचे ग्रामपंचायत कराबाबतची वादपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतसमोर ठेवण्यात आली होती. ही

महाडीबीटी पोर्टलवरील निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवरील निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत आहे. फलोत्पादन पिकाचा संशोधन तंत्रज्ञान, प्रसार काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पध्दतीने सर्वांगीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपरिक उत्पादन पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार आदी या योजनेचे उद्दीष्ट आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत १४ व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर मोठ्या संख्येने लाभार्थी निवड झालेली आहे. या नव्याने निवडलेल्या लाभार्थीनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार

तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांची शासकीय तंत्रनिकेतनला भेट

Image
तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचे केले आवाहन राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला शनिवारी दि.९ डिसेंबरला भेट दिली. यावेळी त्यांनी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचे आवाहन केले. या भेटीदरम्यान त्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण केले.तसेच पदविका आणि पदवी महाविद्यालयातील प्राध्यापकांना दोन संस्थांमध्ये समन्वय स्थापित करण्याचा सल्ला दिला. त्यांनी संस्थेच्या फेसलिफ्टिंगच्या प्रस्तावांवरही चर्चा केली आणि यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या शाखेतील अभ्यासक्रमांसाठी नवीन उपकरणे खरेदी बाबत निर्देश दिले. सांघिक कामात सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला. संस्थेतून बाहेर पडताना त्यांनी परिसर विकास उपक्रमांची पाहणी केली व मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृतवाटीकाचे संचालक यांच्या हस्ते करून वृक्षारोपण करण्यात आले. या भेटीदरम्यान अमरावतीचे विभागीय सहसंचालक डॉ.

शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीला निर्देश

Ø जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची सभा Ø ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महसूल व कृषि विभागाच्या पंचनाम्यानुसार पीक विमा भरपाई Ø ५ लाख २८ हजार ३०१ शेतकऱ्यांच्या पूर्व सूचना जिल्ह्यातील माहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पीक नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई देण्याचे निर्देश जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने रिलायंस जनरल विमा कंपनीच्या राज्य व्यवस्थापकांना दिले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आणि जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झाली. या सभेत हे निर्देश देण्यात आले. या सभेत जिल्ह्यातील माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत पूर्व सूचना दिलेल्या ५ लाख २८ हजार ३०१ शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांची नुकसानीची टक्केवारी ही ५० टक्केच्यावर आहे, त्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या पर्यवेक्षकांनी केलेल्या पंचनाम्याप्रमाणे पीक विमा भरपाई द्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान ५० टक्क्यापेक्षा कमी दर्शविलेल

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उद्या दि.६ डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. दुपारी १ वाजता व दुपारी २.३० वाजता पुसद येथे आयोजित स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी ३ वाजता पुसदहून नांदेडकडे प्रयाण करतील.

शास्त्रोक्त मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

Image
कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सात दिवसीय निवासी शास्त्रोक्त मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन ४ डिसेंबर रोजी यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्र येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश उ. नेमाडे, कृषी उपसंचालक टी. एस. चव्हाण, उद्यानपंडीत पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी शेतीला पूरक उद्योग म्हणून शेतकरी बांधवांनी मधमाशी पालनाकडे वळावे, असे आवाहन केले. तसेच मधमाशी पालनाच्या आर्थिक उत्पादनाविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी कार्यक्रमाचे महत्त्व व उद्देश विषद केला. कार्यक्रमाचे अतिथी कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश उ. नेमाडे यांनी मधमाशी पालन पिकाच्या वाढीविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कृषी विभागाचे तंत्र अधिका

निवडणूक विभागाच्या ई-निविदा प्रक्रियांना सात दिवसांची मुदतवाढ

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत विविध बाबींसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियांना सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यात डी.टी.पी करुन छपाई करणे, पोस्टर बॅनर, स्टीकर, प्रमाणपत्र व इतर अनुषंगीक बाबींचा पुरवठा करणेबाबत ई- निविदा, विविध प्रकारची वाहने पुरवठा करणेबाबत ई-निविदा, झेरॉक्स मशीन्स व इतर अनुषंगीक बाबींचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा, चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगीक बाबींचा पुरवठा करणेबाबत फेर ई-निविदा प्रक्रिया केली जात आहे. या ई- निविदांमधील तांत्रिक लिफाफा क्रमांक एक मधील तीन अटी शिथिल करून त्याबाबतचे शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तसेच या ई - निविदाबाबत शुध्दीपत्रक प्रसिध्दीपासून सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संपूर्ण निविदा प्रक्रिया ही ऑनलाईन ई-टेंडरिंग पध्दतीने असून ई- निविदाबाबत संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ई-निविदा भरण्यास इच्छुक असणाऱ्या नामांकीत तथा अनुभवी संस्था, पुरवठादार

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ पर्यटन धोरण जाहीर

अमरावती विभागातील सर्व पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि या क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या महिला उद्योजकांनी हॉटेल रिसोर्ट,होम स्टे, कृषी पर्यटन केंद्र साहसी पर्यटन केंद्र उपहारगृह, टुर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नविन व्यवसाय इच्छुक महिला उद्योजकांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पर्यटन विभागाने ‘आई’ पर्यटन धोरणाचा अवलंब केला आहे. या धोरणामध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणाची पंचसुत्री जाहीर केली असून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातून या योजनेसाठी महिला उद्योजकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. महिलांना मिळणारे आर्थिक स्वातंत्र, गतिशिलता महत्वाकांक्षा आणि निर्णयक्षमतेचा फायदा घेत राज्यात दर्जेदार पर्यटनाला चालना देणे, तसेच महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि शाश्वत आर्थिक व

बेवारस वाहनांचा 8 डिसेंबर रोजी लिलाव

पोलीस स्टेशन वडकी येथे लिलावास पात्र असलेली बेवारस व मालकी हक्क न दाखवलेल्या 33 मोटार सायकल वाहनांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. ही वाहने कुठल्याही गुन्ह्यातील नसून कोणीही मालकी हक्काबाबत मागणीसाठी आलेले नाही.त्यामुळे या बेवारस व मालकी हक्क न दाखवलेल्या वाहनांची ‍दि. 8 डिसेंबर रोजी लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. असे पोलीस स्टेशन वडकीचे ठाणेदार यांनी कळविले आहे.

जिल्हा बाल कामगार कृतीदलाची धाड : वणीमध्ये एका बालकाची मुक्तता

Ø व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल जिल्हा बाल कामगारमुक्त व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल कामगार कृतीदलाच्यावतीने धाडी टाकण्यात येत आहेत. नुकताच वणी येथे जिल्हा बाल कामगार कृतीदलाने टाकलेल्या धाडीमध्ये विशाल अॅटो सेंटर अॅन्ड सर्विसेस सेंटर, जत्रा रोड, वणी येथे १८ वर्षाखालील एक बालक काम करतांना आढळून आला. त्या बालकास मुक्त करुन बालकल्याण समिती, यवतमाळ येथे सुपूर्द करण्यात आले. अमरावती येथील नितीन पाटणकर व सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांच्या मार्गदर्शनात वणी येथे ३० नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्हा बाल कामगार कृतीदलाने टाकलेल्या या धाडीमध्ये विशाल अॅटो सेंटर अॅन्ड सर्विसेस सेंटरचे वणीमधील रंगनाथ नगर येथील मालक विशाल मारोतराव ठोंबर यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता कलम ३७४, अल्पवयीन न्याय कायदा कलम ७५, ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बाल व किशोरवयीन कामगार अधिनियमाअंतर्गत कलम ३अ मध्ये स्वतंत्र खटला दाखल करण्याची कार्यवाही सुध्दा करण्यात येणार आहे. या धाडीमध्ये वणीचे दुकाने निरीक्षक विजय गुल्हाने, निरीक्षक रविंद्र जतकर, जिल्हा बालसंरक्षण कक्षा

सर्व व्यावसायिक दुकान व आस्थापनांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमाअंतर्गत सर्व व्यावसायिक दुकान आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लावण्याबाबतची अधिसूचना शासनाने निर्गमित केलेली आहे. या अधिनियमांतर्गत अंमलबजावणी करण्याबाबत कामगार आयुक्त यांचे कार्यवाही करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरात प्रदर्शनी भागात लावणे बंधनकारक केलेले आहे. मराठी भाषेतील नामफलक इतर भाषेमध्ये असलेल्या नामफलकापेक्षा मोठा व ठळक अक्षरात असावा. जे आस्थापनाधारक आपल्या आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागावर लावणार नाही त्या आस्थापना मालकावर अधिनियमाच्या कलमांअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, याविषयी प्रत्येक आस्थापना धारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी केले आहे.

आयटीआयमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे १२ डिसेंबर रोजी सकाळी 9.३० वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या भरती मेळाव्याकरीता आयजीडब्लु इंडिया टेकनॉलॉजी प्राव्हेट लिमिटेड पुणे व भारतामधील प्लास्टिक पाईप्सचे उत्पादन करणारी फिनोलेक्स पाईप्स लिमिटेड, पुणे उपस्थित राहणार आहेत. आयजीडब्लु इंडिया टेकनॉलॉजी प्राव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मेट्रो ट्रेनचे गियर बॉक्स तयार केले जातात. या कंपनीमध्ये सर्व व्यवसायातील उमेदवारांकरीता शिकावू उमेदवारीच्या संधी उपलब्ध आहेत. या कंपनीमध्ये शिकावू उमेदवारी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचे भविष्य उज्वल राहणार आहे. फिनोलेक्स पाईप्स लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये प्लास्टिक पाईप्स उत्पादन केले जाते. या कंपनीमध्ये फिटर, टर्नर मशिनिस्ट या व्यवसायातील मुला मुलींकरीता शिकावू उमेदवारी उपलब्ध आहे. भारतातील अग्रगण्य आस्थापना १२ डिसेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे उपस्थित राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारासाठी ही सुवर्णसंधी संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा लाभ प्रत्येक पात्र

कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तृणधान्य पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण

कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ येथे 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे २०२३' निमित्त कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तृणधान्य पिकांची ओळख व लागवड व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आणि प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन मध्य विदर्भ विभागाचे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ व २९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन करतांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी उपस्थित पांढरकवडा व पुसद उप-विभागातील अधिकारी व कर्मचान्यांना नाचणी, ज्वारी, कुटकी, भंगर, राजगीरा, राळा, वरई इ. तृणधान्य पिकांचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्याचे आवाहन केले. जेणेकरुन शेतकरी अधिक उत्पन्न घेण्याचे दृष्टिने लागवड करतील. तसेच विद्यापिठामार्फत होत असलेल्या प्रशिक्षणादरम्यान मिळालेली माहिती संकलित करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी कृ.जै.तं.महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार यांनी तृणधान्य पिके भविष्यातील आधार असल्याचे सांगितले. अध्यक्ष भाषणात डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी कुटकी, भगर, राजगीरा, राळा,

नागपूर येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

उद्योजकांना रिक्तपदाचा तपशिल सादर करण्याचे आवाहन पंडित दीनदयाल उपाध्याय नमो महारोजगार मेळाव्याचे दि. ९ व १० डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार व उद्योजकांना कुशल मनुष्यबळ आणि नामांकित उद्योजक तथा इंडस्ट्रिजसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे दिले आहे. नागपूर येथील जमनालाल बजाज प्रशासकिय भवन, नागपूर विद्यापीठ येथे नमो महारोगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांनी विभागाच्या रोजगार महास्वयंम rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर रिक्तपदे अधिसूचित करावीत. तसेच रिक्तपदाचा तपशिल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयात सादर करावा. तसेच सुशिक्ष‍ित बेरोजगार उमेदवारांनी रोजगार महास्वयंम या पोर्टलवर सेवायोजन कार्डमधील प्रोफाईलमध्ये जावून आपले शैक्षणिक पात्रतेनिहाय अर्ज करावे, असे आवाहन सहायक आयुक्त वि. सा. शितोळेयांनी केले आहे

लोकशाही दिनातील तक्रारी निकाली काढा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Image
121 तक्रारी प्राप्त जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण १२१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी शहरी, ग्रामीण भागातील सामान्य नागरीक, महिला, ज्येष्ठ नागरीक, व्यावसायिकांनी केलेल्या लेखी तक्रारी स्वत: ऐकुन त्यावर संबंधित विभागाच्या प्रमुखांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिला. तसेच विविध विभागातील ना हरकत प्रमाणपत्रांसाठी नागरिक लोकशाही दिनात अर्ज करत आहेत. ना हरकत प्रमाणपत्र मागणीचे प्रकरण प्रलंबित ठेवू नका. एनओसीसाठी नागरिकांना लोकशाही दिनात येण्याची गरज पडू नये यासाठी अधिकाऱ्यांन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा 8 डिसेंबरला शुभारंभ माजी सैनिक मेळाव्याचेही आयोजन

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळावा जिल्हाधिकाऱ्‍यांच्या अध्यक्षतेखाली 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बळीराजा चेतना भवन येथे होणार आहे. माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती, विविध कल्याणकारी योजनांचे धनादेश वाटप तसेच युध्दविधवा, वीरमाता यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजदिन शुभारंभ कार्यक्रम हा वर्षातून एकदाच राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक, कुटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यवतमाळचे प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रकाश राऊत यांनी केले आहे.

यंदाची जागतिक कौशल्य स्पर्धा फ्रान्समध्ये होणार : नवयुवकांना सहभागी होण्याची संधी

Ø 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जगभरातील नवयुवकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारी जागतिक कौशल्य स्पर्धा यंदा फ्रान्समधील ल्योन येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून जिल्ह्यातील नवयुवकांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवयुवकांनी आज 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि हि जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. नव्या वर्षामध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य परिषद, विविध औद

इसापूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात नियमानुसार क्षेत्र वाटप झाल्यानंतरच गाळपेरा करावा

कार्यकारी अभियंता यांचे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरणाच्या बुडीत क्षेत्रातील जमीन जलसंपदा विभागाच्या मालकीची असून संपादित क्षेत्रावर कोणत्याही अर्जदारांचा तसेच नियमबाह्य ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांचा गाळपेऱ्यासाठी अधिकृत अधिकार ठरणार नाही. त्यामुळे गाळपेऱ्यासाठी नियमानुसार संपूर्ण कार्यवाही होऊन क्षेत्र वाटप झाल्यानंतरच गाळपेरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या सर्व गावांतील जनतेस कळविण्यात येते की, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेनुसार तलावाच्या जमिनींचा विनियोग करण्यासाठी नियम देण्यात आलेले आहेत.यामधील दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार जिल्हाधिकारी यांच्याद्वारे जमिनीचा विनियोग करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परंतु बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यामार्फत रितसर मागणी न करता बुडीत क्षेत्रात अनाधिकृतपणे पेरा केला जातो. यामुळे स्थानिक लोकांमध्ये वाद-विवाद, उपोषणे, जमिनीचे परस्पर हस्तांतरण इत्यादी प्रकार घडत आहेत. नियमपुस्तिकेनुसार जलाशयाखालील दरवर्षी उघडी पडणारी जमीन जास्तीत जास्त १२ वर्ष व