हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या किडीचे व्यवस्थापन करावे

हरभरा पिकासर शेंडे, पाने व रोप कुडतडणाऱ्या अळी अर्थात कट वर्म या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचे प्रकार व व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अळी ही एक बहुभक्षीय कीड असून या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होतो. मादी पतंग सुरुवातीला पिकाच्या व तणाच्या पानांवर तसेत कोवळ्या शेंड्यांवर एक एक करून किंवा समुहाने ३०० ते ४५० अंडी घालते. अळीची लांबी ही ०.२ ते १.५ इंच असते या अळीचा रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो. या अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजुने असतो. शेतात पाने, शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसून येतात. मात्र, अळी ही झाडाच्या बुंद्याला मातीमध्ये लपून बसते व मुख्यत्वे रात्री पिकावर येवून पाने व शेंडे कुरतडते. प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील हि अळी पिकावर आढळून येते. पूर्ण वाढ झालेली अळी १.५ ते २ इंच लांब असते. अळीला स्पर्श केल्यास ती शरीराचा "सी" आकार करतांना दिसून येते. पिकाच्या सर्व अवस्थामधे या अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो. हि कीड रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप कुरतडते व नंतरच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पाने व शेंडे कुरतडते, पूर्ण वाढ झालेली अळी ही जमिनीमधे कोषावस्थेत जाते. व्यवस्थापन शेतात किंवा बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही असे नियोजन करावे. प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात. या अळीचा प्रादुर्भाव लष्करी अळीप्रमाणे एकाच वेळी आढळून येते म्हणून शेतातील पिकामध्ये मादी पतंगाने अंडी घालू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव 2 अळ्या प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के ईसी ५० मिली किंवा क्लोरॅट्रनिपोल १८.५ टक्के ३.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी