महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मधपाळ व संस्थांनी मधकेंद्र योजनेचा लाभ घ्यावा

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मध केंद्र योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मधपाळ व संस्थांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. योजनेअंतर्गत मध उद्योगासाठी मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्व:हिस्सा, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी व विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करण्यात येणार आहे. वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार हा साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, केंद्रचालक प्रगतीशिल मधपाळकरीता अर्जदार किमान इयत्ता 10 वी पास असावा. त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या नावे किमान 1 एकर शेत जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंदचालक संस्थाकरीता संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली 1 हजार फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावी. लाभार्थ्यांनी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असणार आहे. अधिक माहितीकरीता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या 07232- 244791 किंवा 9420771535 दुरध्वनी क्रमांकावर तसेच संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सातारा यांच्या 02168-260264 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी