शाळा, अंगणवाडीतील १०८ मुलामुलींची टूडी इको आरोग्य तपासणी

८ व ९ डिसेंबरला टूडी इको शिबीर संपन्न ; हृदयरोग शस्त्रक्रियासंबंधी ४८ विद्यार्थी रेफर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शून्य ते १८ वयोगटातील शासकीय व निमशासकीय शाळा व अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांची व बालकांची टूडी इको आरोग्य तपासणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण १०८ विद्यार्थ्यांचे टूडी इको करण्यात आले. या टूडी इको तपासणीनंतर हृदयरोग शस्त्रक्रियासंबंधी ४८ विद्यार्थ्यांना संदर्भीत करण्यात आले. या संदर्भीत करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सामंजस्य करार झालेले हॉस्पीटल व महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही टूडी इको आरोग्य तपासणी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण ४३ पथके कार्यरत आहे. या पथकामध्ये दोन वैद्यकिय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व परिचारीका यांचा समावेश आहे. हे पथक ग्रामीण भागात जाऊन शाळा व अंगणवाडीमधील मुलामुलींची आरोग्य तपासणी करतात. तपासणी दरम्यान संशयित हृदयरोग या गंभीर आजाराने आढळल्यास त्या विद्यार्थी, बालकाची जिल्हास्तरावर पूर्व तपासणी करण्यात येते. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामधील १६ तालुक्याकरिता दि. ८ व ९ डिसेंबर रोजी टूडी इको आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. वर्ध्यातील आचार्य विनोबा भावे सांवगी मेघे येथील हृदयरोग तज्ञ डॉ. शंतनु गोमासे यांच्यामार्फत शिवनेरी हॉस्पीटल, आर्णी रोड, यवतमाळ येथे टूडी इको शिबीर आयोजित करण्यात आले. दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या हस्ते या टूडी इको शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. या शिबिरासाठी निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लेवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी