हरभरा पिकावरील मररोगाचे व्यवस्थापन करावे
जिल्ह्यातील काही भागांमध्ये हरभरा पिकावरील मररोग व स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. या रोगांच्या नियंत्रणासाठी कृषि विज्ञान केंद्र व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालयामार्फत उपाययोजनांची शिफारस करण्यात केली आहे.
या शिफारशीनुसार हरभरा पिकावरील मररोगाच्या व्यवस्थापनाकरीता ट्रायकोडर्मा २ किलो प्रति ४० किलो शेणखतात मिसळुन प्रति एकरी समप्रमाणात टाकावे. हरभऱ्यावरील स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थानासाठी निबोळी अर्क ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 x 10 पीओबी प्रति मिली) ५०० एलई प्रति हेक्टर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एससी २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ६.६ मिली किंवा लॅम्बडा सायहालोथ्रीन ५ टक्के इसी ८ मिली किंवा फ्युबेन्डामाइड ८.३३ टक्के + डेल्टामेथ्रीन ५.५६ टक्के एससी ५ मिली किंवा नोवालुरोन ५.२५ टक्के + इंडोक्झाकार्ब ४.५ टक्के एससी १६.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, या शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे हरभरा पिकावरील मररोग व स्पोडोप्टेरा, तंबाखुचे पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment