पशुवैद्यकीय सेवा पोहोचणार पशुपालकांच्या दारात फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन

जिल्ह्यातील पशुधनाच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टिने पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. राज्यातील पशुधनाची क्षमता, उत्पादकतेत वाढ आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या पशुवैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. राज्यातील दुर्गम, डोंगराळ आदिवासीबहुल भागामध्ये तसेच दळणवळणाच्या सोई अपुऱ्या आहेत, अशा तालुक्यांमध्ये पशुवैद्यकिय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ व रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३२९ फिरते पशुचिकित्सालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ८० पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पशुचिकित्सा पथकामध्ये एक पदवीधर पशुवैद्यक, एक पदविकाधारक पशुवैद्यक व एक वाहन चालक तथा मदतनीस यांचा समावेश असेल. या पथकाच्या माध्यमातून रोगनिदान, औषधोपचार, लसीकरण, शल्यचिकित्सा तसेच दृकश्राव्य माध्यमांव्दारे विस्तारविषयक सेवा पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरावरील स्थापित कॉल सेंटरच्या १९६२? या टोल फ्री क्रमांकावर पशुपालकांच्या येणाऱ्या फोन कॉलप्रमाणे सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेमार्फत एक फिरते पशुचिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी