निवडणूक विभागाच्या ई-निविदा प्रक्रियांना सात दिवसांची मुदतवाढ

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत विविध बाबींसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियांना सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यात डी.टी.पी करुन छपाई करणे, पोस्टर बॅनर, स्टीकर, प्रमाणपत्र व इतर अनुषंगीक बाबींचा पुरवठा करणेबाबत ई- निविदा, विविध प्रकारची वाहने पुरवठा करणेबाबत ई-निविदा, झेरॉक्स मशीन्स व इतर अनुषंगीक बाबींचा पुरवठा करणेबाबत ई-निविदा, चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगीक बाबींचा पुरवठा करणेबाबत फेर ई-निविदा प्रक्रिया केली जात आहे. या ई- निविदांमधील तांत्रिक लिफाफा क्रमांक एक मधील तीन अटी शिथिल करून त्याबाबतचे शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाटेंडर या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. तसेच या ई - निविदाबाबत शुध्दीपत्रक प्रसिध्दीपासून सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संपूर्ण निविदा प्रक्रिया ही ऑनलाईन ई-टेंडरिंग पध्दतीने असून ई- निविदाबाबत संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ई-निविदा भरण्यास इच्छुक असणाऱ्या नामांकीत तथा अनुभवी संस्था, पुरवठादार यांनी महाटेंडर या संकेतस्थळावर इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये प्रसिध्दी दिनांकापासून ते प्रसिध्दीचा कालावधी संपण्यापर्यत सादर करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी