कबड्डीपटुंमध्ये राज्याचा नावलौकिक करण्याचे सामर्थ्य

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांचे प्रतिपादन शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन पहिल्यांदाच मॅटवर होत असलेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सांघीक भावनेने खेळ खेळत खेळाडूंनी कौशल्यपणाला लावले. राष्ट्रीय स्पर्धेत प्रविण्यप्राप्त करून राज्याचा नावलौकिक करण्याचे सामर्थ्य कबड्डीपटुंमध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय १९ वर्षातील मुले व मुलींचे शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया बोलत होत. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,दादोजी कोंडदेव पुरस्कार्थी डॉ उल्हास नंदुरकर, सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळचे अध्यक्ष अभय राऊत, सचिव नंदू वानखडे, यवतमाळ जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे सचिव विश्वनाथ झिगे, प्राचार्य सोपानराव काळे, कबड्डीपटू लाला राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, निवड समितीचे सदस्य राज्य कबड्डी क्रीडा मार्गदर्शक किशोर बोन्डे, शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त राजेश पाडावे, ज्ञानेश्वर खुरुंगे आदी उपस्थित होते. सर्व शालेय खेळाडूंना पुणेच्या राष्ट्रीय कबड्डीपटुने शपथ दिली.कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी केले. संचलन अनंत पांडे यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी चैताली राऊत यांनी मानले. या कबड्डी स्पर्धेचे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नागपूर, पुणे, लातूर, कोल्हापूर, नाशिक, मुंबई,छत्रपती संभाजीनगर,यजमान अमरावतीचे मुले व मुलींचे संघ सहभागी झाले आहे. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण बालाजी सोसायटीमधील मैदानावर आज सकाळ सत्रातील बाद फेरीत ऐकोणवीस वर्षाआतील मुलांच्या सामन्यात कोल्हापूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर, नागपूर विरुद्ध नाशिक, लातूर विरुद्ध पुणे, अमरावती विरुद्ध मुंबई यांच्या अटीतटीच्या झुंजीत छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे, अमरावती विभागानी मात केले. तर मुलीत कोल्हापूर विरुद्ध पुणे, नागपूर विरुद्ध नाशिक, लातूर विरुद्ध छत्रपती संभाजीनगर, अमरावती विरुद्ध मुबंई यांच्यात कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर. मुंबई विभागाने प्रतिस्पर्धीवर मात करीत स्पर्धेत यश मिळवले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी