मरणोत्तर नेत्रदानामुळे मिळणार दोन अंधांना दृष्टी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथे गजानन रामजी तोडासे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. पारवा येथील रहिवासी गजानन तोडासे यांचा वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथील अपघात विभागामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी त्यांच्या परिवाराने नेत्रदानाची संमती देऊन आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. या नेत्रदानासाठी मुलगा अभिषेक गजानन तोडासे व अविनाश गजानन तोडासे यांनी वडीलांचे नेत्रदान करण्यास संमती दिली होती. दरम्यान नेत्रदान समुपदेशक सोनाली घायवान यांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दुखात सामील होवुन मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्याबाबत समुपदेशन केले होते. नेत्रदान संमतीनंतर वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथील नेत्र विभागातील डॉ. तेजस्विनी गोंडाने, डॉ. सादिक बेनीवाले, डॉ. चिंतन तिमांडे यांनी डॉ. सुधीर पेंडके, डॉ. स्नेहल बोडे, डॉ. अक्षय पडगीलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदान का व कसे करावे : तोडासे परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मृत्युनंतर सर्वांनी नेत्रदान करायला हवे. आपल्या एका निर्णयामुळे दोन अंध व्यक्तींना ही सुंदर सृष्टी पाहण्याची संधी मिळू शकते. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एकमेव मृत्युनंतर करता येते. नेत्रदान हे मृत्यूनंतर सहा तासाच्या आत करावे लागते. एक वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करु शकते. एखाद्या व्यक्तीला चष्मा लागला असेल. डोळयांचे ऑपरेशन झाले असेल, मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेली असेल, उच्च रक्तदाब व मधुमेह असणारे व्यक्तीसुद्धा नेत्रदान करु शकतात. मृत्युनंतर नेत्रदान करायचे असल्यास मृत पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर ओल्या कापसाची पट्टी ठेवावी. खोलीतील पंखा बंद करावा व एसी असेल तर चालु करावा. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली दोन उशा ठेवाव्यात. जेणेकरुन डोळे काढतांना रक्तस्त्राव होणार नाही, अशी माहिती यवतमाळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी