सर्व व्यावसायिक दुकान व आस्थापनांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमाअंतर्गत सर्व व्यावसायिक दुकान आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लावण्याबाबतची अधिसूचना शासनाने निर्गमित केलेली आहे. या अधिनियमांतर्गत अंमलबजावणी करण्याबाबत कामगार आयुक्त यांचे कार्यवाही करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये ठळक अक्षरात प्रदर्शनी भागात लावणे बंधनकारक केलेले आहे. मराठी भाषेतील नामफलक इतर भाषेमध्ये असलेल्या नामफलकापेक्षा मोठा व ठळक अक्षरात असावा. जे आस्थापनाधारक आपल्या आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागावर लावणार नाही त्या आस्थापना मालकावर अधिनियमाच्या कलमांअंतर्गत कार्यवाही करण्यात येईल, याविषयी प्रत्येक आस्थापना धारकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी