एमआयडीसीतील मूलभूत सोयीसुविधांची कामे पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

◆ उद्योगांच्या अडचणींचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा ◆ जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील सोयीसुविधा आणि विविध अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी एमआयडीसीतील मूलभूत सोयीसुविधांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा झाली. या सभेला उपविभागीय अधिकारी डॉ याशनी नागराजन, जिल्हा उद्योग केंद्रचे महाव्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण, यवतमाळ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार सुराणा, उपाध्यक्ष संदीप तातेड, सचिव आनंद भुसारी, सहसचिव जितेश पतीरा आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध भागातील उद्योजक उपस्थित होते. यवतमाळ येथील अतिरीक्त औद्योगिक क्षेत्रातील भुखंडाचे वाटप, मुलभुत सोयीसुविधा नसल्यामुळे उद्योजकांना येणाऱ्या अडचणी, विविध परवानग्या, नेर, आणि, मारेगांव, पांढरकवडा व उमरखेड येथे अतिरीक्त नवीन जागा शोधणे, घाटंजी, वणी आणि उमरखेड औद्योगिक क्षेत्रासाठी जागा संपादित करणे, एमआयडीसीतील अतिक्रमण, रस्ते, सांडपाणी आणि भटक्या जनावरांचा त्रास, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, नेटवर्क, पोलीस चौकी, मूलभूत सोयीसुविधा, उद्योजकांचे विद्युत कर, केंद्र व राज्याच्या उद्योग योजनेतील अनुदान, कर्ज प्रकरणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. एमआयडीसीतील रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे, वीज पुरवठा आदी मुलभूत सुविधांची कामे लवकरात लवकर सुरू करावीत. पीएमएफएमई योजनेंतर्गत बँकांमधील पात्र कर्ज प्रस्तावांना मंजुरी द्यावी. ज्यांचे कर्ज प्रस्ताव नामंजूर केले आहे ती प्रकरणे तपासण्यात येईल. उद्योगांना लागणाऱ्या विविध विभागाच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी