Posts

Showing posts from November, 2023

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा 8 डिसेंबरला शुभारंभ माजी सैनिक मेळाव्याचेही आयोजन

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळावा जिल्हाधिकाऱ्‍यांच्या अध्यक्षतेखाली 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बळीराजा चेतना भवन येथे होणार आहे. माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती, विविध कल्याणकारी योजनांचे धनादेश वाटप तसेच युध्दविधवा, वीरमाता यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजदिन शुभारंभ कार्यक्रम हा वर्षातून एकदाच राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक, कुटुंबियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यवतमाळचे प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रकाश राऊत यांनी केले आहे.

यंदाची जागतिक कौशल्य स्पर्धा फ्रान्समध्ये होणार : नवयुवकांना सहभागी होण्याची संधी

Ø 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जगभरातील नवयुवकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारी जागतिक कौशल्य स्पर्धा यंदा फ्रान्समधील ल्योन येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून जिल्ह्यातील नवयुवकांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवयुवकांनी आज 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि हि जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणाकरिता त्याच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. यापूर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधून 50 देशातील 10 हजार उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. नव्या वर्षामध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य परिषद, विविध औद

इसापूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात नियमानुसार क्षेत्र वाटप झाल्यानंतरच गाळपेरा करावा

कार्यकारी अभियंता यांचे आवाहन उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरणाच्या बुडीत क्षेत्रातील जमीन जलसंपदा विभागाच्या मालकीची असून संपादित क्षेत्रावर कोणत्याही अर्जदारांचा तसेच नियमबाह्य ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांचा गाळपेऱ्यासाठी अधिकृत अधिकार ठरणार नाही. त्यामुळे गाळपेऱ्यासाठी नियमानुसार संपूर्ण कार्यवाही होऊन क्षेत्र वाटप झाल्यानंतरच गाळपेरा करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या सर्व गावांतील जनतेस कळविण्यात येते की, महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेनुसार तलावाच्या जमिनींचा विनियोग करण्यासाठी नियम देण्यात आलेले आहेत.यामधील दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार जिल्हाधिकारी यांच्याद्वारे जमिनीचा विनियोग करण्यात यावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परंतु बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यामार्फत रितसर मागणी न करता बुडीत क्षेत्रात अनाधिकृतपणे पेरा केला जातो. यामुळे स्थानिक लोकांमध्ये वाद-विवाद, उपोषणे, जमिनीचे परस्पर हस्तांतरण इत्यादी प्रकार घडत आहेत. नियमपुस्तिकेनुसार जलाशयाखालील दरवर्षी उघडी पडणारी जमीन जास्तीत जास्त १२ वर्ष व

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 डिसेंबरला आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे 9 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. या लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व केंद्रीय विद्यालयाच्यावतीने बालक दिन उत्साहात साजरा बालकांना कायदेविषयक मार्गदर्शन

Image
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व केंद्रीय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बालकांना कायदेविषयक मार्गदर्शनासाठी शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशावरून व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर के.ए. नहार हे होते. तर प्रमुख म्हणून केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य किरण के. मेंढे, तसेच प्रमुख वक्ते म्हणून पॅनल वकील प्राची निलावार व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता पॅनल वकील प्राची निलावार यांनी बालकांच्या अधिकाराबाबत विस्तृत माहिती दिली. तसेच कुठल्याही देशाचे भवितव्य हे त्या देशातील बालकांवर अवलंबून असते. किंबहुना बालके ही देशाची अमुल्य व अपूर्व संपत्ती आहे. प्रत्येक जबाबदार नागरिकाने त्यांची योग्य काळजी घ्या

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पीकस्पर्धा

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होईल. या उद्देशाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. वंचित व दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धांमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम पीकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीकस्पर्धेतील पीके : रब्बी पीके-ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस. पात्रता व निकष: स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी ल

पुसदच्या दुय्यम निबंधक कार्यालयासाठी भाडेतत्वावर जागेचे प्रस्ताव आमंत्रित

पुसद येथील दुय्यम निबंधक श्रेणी -१ कार्यालयासाठी पुसद शहरातील खाजगी इमारतीमधील जागा भाडेतत्वावर घेण्याचे प्रस्तावित आहे. सर्व सोयीसुविधा युक्त इमारतीमधील जागा भाडेतत्वावर देण्यास इच्छुक नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व सोयीसुविधायुक्त असलेल्या इमारतीमधील जागेची या कार्यालयास आवश्यकता आहे. इमारत ही तहसिल कार्यालयाजवळ नजिकच्या परिसरामध्ये असावी. इमारतीमधील जागा ही तळमजल्यावर असावी. कार्यालयात येणाऱ्या पक्षकारांच्या व अधिकारी, कर्मचारी यांच्या वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था असावी. इमारतीमधील जागा साधारणत: दोन हजार चौरस फुट असावी व इमारत ही आगीपासून, जीव जंतु, कीटकनाशकांपासून सुरक्षित असावी. इमारतीमधील जागेमध्ये नोंदणी कक्ष, अभिलेख कक्ष, प्रतिक्षालय कक्षासाठी सुटसुटीत जागा असावी. मुबलक पाणी व प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या नियमानुसार भाडे मान्य असावे. जागा भाडेतत्त्वावर देण्यास इच्छुक नागरिकांनी तसा प्रस्ताव गजानन महाराज मंदीराजवळील सिमा महेंद्र कोतपल्लीवार यांच्या इमारतीतील दुय्यम निबंधक कार्यालयाकड

सुशिक्षित बेरोजगार अभियंतांची काम वाटप सभा ४ डिसेंबरला

सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृह यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रासह सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या ३० नोव्हेंबरला अमरावतीमध्ये मेळाव्याचे आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती, प्रचार व प्रसारासाठी अमरावती येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात ऑर आहे. हा मेळावा दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासोहब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय अमरावती येथे होणार आहे. महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनीमादींग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अमरावती व यवतमाळ तसेच प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या वतीने होत असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे, अध्यक्षस्थानी बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल मस्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाज

पशुधनातील वंधत्वावर उपाययोजनांसाठी जिल्ह्यात पशुवंधत्व निवारण अभियान गावागावांत शिबिरांचे आयोजन ; पशुस्वास्थसंबंधी पशुपालकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हास्तर विभागाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पशुवंधत्व निवारण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 30 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांतर्गत पशुंमधील वंधत्व निवारणासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा मुळ उद्देश हा जिल्ह्यातील वंधत्वामुळे दूध उत्पादनात नसलेल्या भाकड जनावरांमधील वंधत्वावर उपाययोजना करुन जनावरे गाभण राहतील व पुढे त्यांच्यापासून दुध उत्पादनात वाढ करणे हा आहे. सर्वसाधारणपणे बहुतांश जनावरांचे शारीरिक वजन कमी असल्याने व शारीरिक वजनवाढ आणि पशुप्रजननाचा थेट संबंध असल्याने पशुपालकांना जनावराचे शारीरिक वजन योग्य प्रमाणात रहावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जंतुनिर्मूलन, जनावरांना योग्य संतुलित आहार कशाप्रकारे द्यावा, गायी म्हशींचे प्रजनन, माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशींमधील मुका माज, कृत्रिम रेतन तंत्र, गर्भ तपासणी, वंधत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम व पशुस्वास्थ इत्यादी बाबतीतही मार्गदर्शन केले जाणार आहे. या

भारतीय संविधान दिनी यवतमाळात 'संविधान जागर रॅली' पालकमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती

Image
भारतीय संविधान दिनानिमित्त यवतमाळ शहरात आज संविधान जागर अर्थात वॉक फॉर संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीला पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे यांच्या निर्देशानुसार अनामी फाऊंडेशन आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या विद्यमाने शहरातील संविधान चौक येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. या रॅलीसाठी संविधान विचार मंच, सत्यशोधक मैत्री संघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, समता पर्व प्रतिष्ठान, स्मृती पर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती, बानाई, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, ऑफिसर्स फोरम, भीम टायगर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यवतमा

संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन

Image
भारतीय संविधान दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी आज यवतमाळ शहरातील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रास्ताविकेचे मुख्य वाचन इयत्ता चौथीमध्ये शिकणारी अनुजा आनंद देवतळे हिने केले. यावेळी पालकमंत्र्यांनी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या रॅली प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य, अनुयायांनी उपस्थिती दर्शवली होती.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाची मतदार नोंदणी आवश्यक - पालकमंत्री संजय राठोड

Image
Ø जिल्ह्यात मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रम Ø नवमतदारांनी नाव नोंदणीचे पालकमंत्र्यांचे आवाहन सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाने लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. आपल्या लोकप्रतिनिधींसह जनकल्याणकारी सरकार निवडण्याचा अधिकार राज्यघटनेने सर्वसामान्य नागरिकास मतदानाच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे देशाची समृध्द लोकशाही अधिक मजबूत, बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदवावे व मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केल. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देखील मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहे. दि. 9 डिसेंबर पर्यंत नवमतदारांना या यादीत आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपल्या नावाची नोंदणी केलेली नाही अशांनी तसेच नवमतदार तरुण, तरुणींनी यादीत नोंदणी करून लोकशाहीच्या प्रक्रियेतील भाग बनण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. प्रशासनाच्या

न्यायालयाच्या माध्यमातून न्यायदानाचे काम करावे - न्यायमूर्ती विनय जोशी

Image
> उमरखेड दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन > पुसद न्यायालयातील दोन हजार प्रकरणे हस्तांतरित उमरखेडवासियांसाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू होत आहे. या न्यायालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्यायदानाचे काम करावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आज न्यायालयाच्या उद्घाटनावेळी केले. दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीत आयोजित या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे, सदस्य ॲड आशिष देशमुख, उमरखेड दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विनोद चव्हाण, यवतमाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय जैन, उमरखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड संतोष आगलावे विविध न्यायालयाचे न्यायाधीश, आर्णी, पुसद, महागाव तालुका बार कौन्सिलचे अध्यक्ष, वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. न्यायमूर्ती विनय जोशी म्हणाले, कायद्याचे राज्य आणायचे असेल तर त्यासाठी एक्ससेस टू जस्टीस आणि स्पिडी जस्टीस या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. जलद न्याय करायचा असेल तर न्याय हा सर्वसा

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा संपन्न

Image
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि.२४ नोव्हेंबर रोजी महसूल भवनात पार पडली. या सभेला परिषदेचे सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, शासकीय व अशासकीय सदस्य यांच्या उपस्थितीत अत्यंत प्रभावीपणे प्रत्येक प्रश्नाचे व समस्याचे सुसंवाद व समन्वयातून निराकरण करण्याच्या उद्देशाने सविस्तर चर्चा करीत ही सभा संपन्न झाली. अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या समस्या व प्रश्नांना शासकीय सदस्यांनी समर्पक उत्तरे देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले व पुढील बैठकीमध्ये त्याचप्रमाणे लोकशाही दिनामध्ये राहिलेल्या अप्राप्त अहवाल व नियमानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय सदस्यांनी या सभेला येतांना संबंधित विषयाची संपूर्ण माहिती घेऊनच उपस्थित राहण्याचे सांगितले. ज्या विभागाचे प्रमुख या सभेला अनुपस्थित होते त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन पुढील सभेला प्रत्यक्ष बोलवण्यात यावे, असे सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हे नियत वयोमानानुस

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा राबविण्यात येणार यात्रेच्या यशस्वीतेसाठी समन्वयाने नियोजन करा -प्र जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे

Image
यवतमाळ, दि. 23 (जिमाका) : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती आणि त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ 26 जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या यात्रेच्या अनुषंगाने प्र. जिल्हाधिकारी श्री.दुबे यांनी महसूल भवनात आढावा सभा घेतली. या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आयोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, कृषी उपसंचालक टी.एस.चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, डीटीओ डॉ. सागर जाधव, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता हेमंत केवटे, माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा परिषदेचे विअआ प्रशांत पाटील उपस्थित होते. तर सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी दुरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी श्री.दुबे यां
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्हा दौरा यवतमाळ दि. 23 (जिमाका) : राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ९.३० वाजता यवतमाळ येथील दर्डा मातोश्री लॉन मधील प्रेरणास्थळ या ठिकाणी स्व. जवाहरलालजी दर्डा बाबूजी यांच्या पुण्यतिथी दिवसानिमित्त होणाऱ्या प्रार्थना सभेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता नागपूरकडे रवाना होतील. 000000

जिल्ह्यात पाच ठिकाणी मोफत अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबीर रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

समाजातील सर्व घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी तसेच आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील पाच रुग्णालयात मोफत अंडवृध्दी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत राबविली जाणार आहे. आयुष्मान भारत मोहिमेंतर्गत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व हत्तीरोग दुरीकरणासाठी अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग व अंडवृध्दी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात यवतमाळ तालुक्यात 5, कळंब 21, बाभुळगाव 7, दारव्हा 2, आर्णी 6, नेर 7, उमरखेड 1, राळेगाव 45, घाटंजी 14, पांढरकवडा 35, मारेगाव 36, झरी 48, व वणी 53 असे एकूण 280 अंडवृध्दी रुग्णांची नोंदणी झालेली आहे. या अंडवृध्दी रुग्णांची निःशुल्क शस्त्रक्रिया होण्याच्या दृष्ट‍िकोणातून जिल्ह्यात वंसतराव नाईक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय यवतमाळ, उपजिल्हा रुग

जिल्हा बाल संरक्षण कक्षाला बाल स्नेही पुरस्कार बाल संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गौरव

Image
बाल संरक्षण क्षेत्रात राज्यात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल यवतमाळच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला ‘बाल स्नेही पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (सीसीडीटी) व होप फॉर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दि. 22 नोव्हेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘बाल स्नेही पुरस्कार 2023’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सोहळा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड सुशीबेन शहा, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव शिवराज पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक (महिला व अत्याचार) दीपक पांडे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव शिवराज पाटील, बचपन बचाव आंदोलनाच्या संचालक संपर्ण बेहरा, युनिसेफच्या मुख्य अधिकारी राजलक्ष्मी नायर, होप फोर चिल्ड्रन इंडियाच्या कॅरोलिनी व्हॅल्टन, महिला व बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांच्या प

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 3 डिसेंबरला

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी क्रीडा विभागामार्फत युवा महोत्सावाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येथील अमोलकचंद महाविद्यालय येथे 3 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या युवा महोत्सवासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे देखील उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केलेले असल्याने यावर्षी युवा महोत्सवात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित क्रीडा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक व युवतींसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला, कौशल्य विकासावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कृषी विद्यापीठ, युवक मंडळे, संगीत विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील युवा कलाकारांनी जास्तीत जास्त संख्येने प्रवेश नोंदवून महोत्सवात सहभाग घ्य

तेलंगणा विधानसभा निवडणूक : जिल्ह्याच्या पाच किमी सीमाक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

भारत निवडणूक आयोगाद्वारे तेलंगणा राज्यात सार्वजनिक विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणूक क्षेत्रात मतदान दि. 30 नोव्हेंबर रोजी व मतमोजणीची प्रक्रिया 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार तेलंगणा राज्याच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किमी क्षेत्रातील दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. 28 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 6 वाजेपासून ते 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंदी आदेश काढले होते. यात अंशत: बदल करुन शुध्दीपत्रक काढण्यात आले आहे. महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य विक्री नियमाप्रमाणे तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे आज दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 12.01 वाजता नेर तालुक्यातील मालखेड बु. येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता विरगव्हाण ता. नेर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता नेर येथील शासकीय विश्रामगृह येथे अभ्यागतांच्या भेटी घेतील.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे पुरावे असलेल्या नागरिकांनी दि. 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठा आरक्षण विशेष कक्षामध्ये सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या दृष्ट‍िने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी करण्यात येत आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीचे विभागनिहाय दौरे आयोजित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे, सन 1967 पूर्वीची व नंतरचे पुरावे, कागदपत्रे दि. 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळत महसूल मिटींग हॉल, दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे स्थापित मराठा आरक्षण विशेष कक्षामध्ये सादर करावेत, असे आवाहन जि

पीकविमा नुकसान भरपाई मधील तफावतीची पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

Image
पीकविमा नुकसान भरपाईच्या तक्रारींसाठी प्रत्येक तालुक्यात विशेष खिडकी सुरू करण्याचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निर्देश : जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित 59 हजार 404 शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाईचे 41 कोटी रुपये प्राप्त झाले. त्यापैकी काही शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आले आहे. काही शेतकऱ्यांना मिळालेली अत्यल्प नुकसान भरपाई ही त्या शेतकऱ्यांवर अन्याय असल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी ह्या बाबीची गंभीर दखल घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यात पीकविमा नुकसान भरपाई रक्कम 59404 शेतकऱ्यांना मिळालेली असून त्यापैकी 9727 शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यात 78 शेतकऱ्यांना तर 10 रुपये पेक्षा कमी पीकविमा नुकसान भरपाई पीकविमा कंपन्यांनी दिली आहे त्यामुळे ह्या पीकविमा कंपन्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देऊन कार्यवाही व्हावी व ही अन्यायकारक पीकविमा मदत पुन्हा सत्य परिस्थितीचा अभ्यास करून वाढीव स्वरूपात पीकविमा कंपन्यांनी द्यावी अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड करणार आहे. तसे

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बेंबळा प्रकल्पाचे पाणी पाणी पाळीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यामधील लाभक्षेत्रात येणारे बाभुळगाव, कळंब, राळेगांव आणि मारेगाव तालुक्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभागाकडून पाणी सोडण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रब्बी हंगामात बेंबळा प्रकल्पावर फक्त तीन आवर्तन सिंचन करणार असल्याने पाणी उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कापूस या पिकासाठी व गहु ऐवजी चना या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपाळी वेळापत्रकानुसार बेंबळा कालवा १ ते १०५ किमी पर्यंतची वितरण प्रणाली राहणार आहे. दि.१९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत पाणीपाळी राहील. दि.१ डिसेंबर ते १२ डिसेंबर कालवा बंद राहील. दि.१३ डिसेंबर ते २४ डिसेंबर पाणीपाळी राहील. दि.२५ डिसेंबर ते ५ जानेवारी कालवा बंद राहील. दि.६ जानेवारी ते १८ जानेवारी पाणीपाळी राहील आणि १९ जानेवारीपासून कालवा बंद राहील. रब्बी हंगामात ज्यांना पाणी घ्यायचे आहे, अशा लाभधारकांचे पाणी मागणी अर्ज नमुना ७, ७ अ, ७ ब मध्ये प्रवाही पद्धतीच्या सिंचनासाठी उपविभागीय अभियंत

रेशीम उद्योग वाढीसाठी महारेशीम अभियान राबविण्यात येणार

रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तसेच आगामी वर्षात तुती लागवड रेशीम लाभार्थीची नाव नोंदणी करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान राबवण्यात येणार आहे. गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात ५७५ शेतकऱ्यांनी ६४० एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केली असून यात वाढ होण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. कृषी आणि वन संपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला रेशीम उद्योग असून महाराष्ट्रातील हवामान याला पोषक आहे. कृषी विकास दरवृध्दीबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचा अर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा रेशीम शेती हा उद्योग आहे. यातून हमखास व नियमित उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कलही वाढत चालला आहे. हीच बाब लक्षात घेवून एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी जवळपास दोन

मातंग समाजातील शेतजमीनधारकांनी कर्जाचे अर्ज 20 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील ज्या लोकांच्या नावे शेतजमीन आहे अशांनी कर्जाचे अर्ज 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अर्जदाराने अर्जासोबत शेतजमीनीचा सातबारा, जातीचा दाखला, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो जोडावे,अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

घाटंजीत सधन कुक्कुट विकास गट स्थापनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापना योजनेंतर्गत घाटंजी तालुक्यात एका लाभार्थीची निवड करायची आहे. इच्छुकांनी घाटंजी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (वि.) यांच्याकडे 20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये ‘सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे’ ही योजना सन 2018-19 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यवतमाळ तालुक्यामध्ये सधन कुक्कुट गट अस्तित्वात असल्यामुळे यवतमाळ तालुका वगळता 15 तालुक्यात राबविण्यात आली होती. परंतु घाटंजी तालुक्यात मंजुर लाभार्थ्याने योजना राबविण्यासाठी नकार दिल्यामुळे या तालुक्याअंतर्गत एका लाभार्थीची निवड करावयाची आहे. घाटंजी तालुक्यांतर्गत लाभार्थी निवडीसाठी इच्छुकांनी अर्ज व सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती घाटंजी यांच्याशी संपर्क करावा. या योजनेचे परिपूर्ण अर्ज 20 नोव्हेंबरपर्यंत घाटंजी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (वि.) यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

नागपूर येथे पं. दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे 2 व 3 डिसेंबरला आयोजन

उद्योजकांनी रिक्तपदाचा तपशिल सादर करण्याचे आवाहन : नागपूर येथे दि. 2 व 3 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांनी विभागाच्या रोजगार महास्वयंम या पोर्टलवर रिक्तपदे अधिसुचित करुन रिक्तपदाचा तपशिल जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन,चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविण्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्याच्या उद्देशाने नामांकित उद्योजक तथा इंडस्ट्रिज यांच्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहे. रिक्तपदाचा तपशिल तक्त्यात भरुन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन,चौथा माळा, दारव्हा रोड, यवतमाळ या कार्यालयात सादर करावा तसेच रोजगार महास्वयंम या पोर्टल सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सेवायोजन कार्डमधील प्रोफाईलमध्ये जावून शैक्षणिक पात्

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

8 डिसेंबरपर्यंत मुदत : ग्रामीण भागातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया या वर्षात राबविली जाणार आहे. डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्यची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे एएच-महाबीएमएस हे संकेतस्थळ उपलब्ध कर

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन

Image
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यवतमाळातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेतीपयोगी किटचे वितरण

Image
यवतमाळ,दि.१० (जिमाका) : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेतीपयोगी किटचे वितरण करण्यात आले. त्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी नयना प्रीतम मिरासे यांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते शेतीपयोगी किटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ अमरावतीचे विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, जिल्हा व्यवस्थापक मनोज गावंडे उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण १२१ पात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त वारसांना शेतीपयोगी किटचे वितरण करण्यात आले, माहिती कृषि विभागाने दिली. 000

जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा जमा

> शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा पालकमंत्री संजय राठोड यांचा प्रयत्न > ४१ कोटींची पीक विमा नुकसान भरपाई वितरित यवतमाळ, दि. 10 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी ११ लाख रुपयांचा अग्रीम पीक विमा जमा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनादिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा देवून शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. यात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम रक्कम अदा करण्याची रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने मंजुरी दिली. पीक विमा नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी स

बालविवाह थांबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक - डॉ.पंकज आशिया

Image
Ø बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट: Ø या वर्षभरात जिल्ह्यात 20 बालविवाह थांबविले: Ø बालविवाह होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपक्रम : बाल विवाह ही अत्यंत अनिष्ठ प्रथा आहे. अशा विवाहाचे सामाजिक दुष्परिणाम देखील तितकेच गंभीर आहे. हे विवाह थांबविण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. शासकीय विभागांनी समाजासह विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने असे विवाह होऊच नये यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे बालविवाहांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, बाल कल्याण समिती सदस्य वनिता शिरफुले, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी वनिता राजू मडावी, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक फाल्गुन पालकर यांच्यासह सर्व तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते ऑक्टोंबर या कालावधीत एकूण 20 बालवि

विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलावा - न्या. एस.व्ही. हांडे

Image
राष्ट्रीय विधी सेवा दिनी कायदेविषयक शिबीर व रॅलीचे आयोजन : विधी सेवा देतांना सर्वांनी वाटा उचलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ मार्फत 9 नोव्हेंबर हा राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त गुरुवारी कायदेविषयक शिबीराचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए.ए. लउळकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टि. जैन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार, मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी, पॅरा विधी स्वंयसेवक उपस्थ‍ित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, 11 ऑक्टोबर 1987 रोजी कायदेशिर सेवा प्राधिकरण कायदा जाहीर करण्यात आला होता व नोव्हेंबर 1995 मध्ये हा कायदा लागु करण्यात आला. यामधून समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना कायदेविषयक मदत पुरविण्यासाठी आणि

शेतकऱ्यांनी कापूस न विकता कापसाच्या गठाणी करून विकावे - जयेश महाजन

Image
शेतकऱ्यांनी कापूस थेट न विकता कापसाच्या गठाणी करून विकावे, असे प्रतिपादन नागपूर येथील महाकोटचे नोडल अधिकारी जयेश महाजन यांनी केले. प्रकल्प संचालक, आत्मा यांच्यामार्फत जागतिक बँक अर्थसहाय्य‍ित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ‘उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन - स्मार्ट कॉटन’ विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सेंट्रल सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाकोटचे नोडल अधिकारी जयेश महाजन पुढे म्हणाले की, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यातील 46 गावांमध्ये स्मार्ट कॉटन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी गटांनी एक गाव एक वान या धर्तीवर एक जिन्सी स्वच्छ कापूस वेचणी करावी. साडेपाचशे क्विंटलचा एक लॉट तयार करून तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग करून सरकी व रुई वेगळी करायची. यामधील रुईचे गटाने ई ऑक्शन प्रमाणे ज्यावेळेस गटाला विक्री करायची आहे व बाजारभाव चांगले आहेत अशा वेळेस विक्री करू शकतात. जेणेकरून शेतकऱ्याला जास्तीचा फायदा कसा मिळवून देता येईल सोबत घरात कापूस ठेवल्यापेक्षा वेअर हाऊसमध्ये गठाण

जिल्ह्यात वाहनांची पीयुसी तपासणी मोहीम

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, यवतमाळ यांच्याद्वारे आज दि. 10 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व वाहनाची वायु प्रदूषण प्रमाणपत्र (पीयुसी) तपासणी मोहीम सुरु करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान जे मोटार वाहन मालक दोषी आढळून येतील त्यांचेवर मोटार वाहन अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केल्या जाईल, याची सर्व मोटार वाहन मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी जिल्ह्यातील वाहनमालकांना केले आहे. तेव्हा ज्या वाहन मालकांनी अद्यापपर्यंत वाहनाचे वायु प्रदुषण प्रमाणपत्र (पीयुसी) काढले नाही, त्यांनी सात दिवसात पीयुसी काढून कार्यालयात सादर करावे व होणारी अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

सणासुदीत खाद्य पदार्थांची तपासणी मोहीम

अन्न व औषध प्रशासनाचा पुढाकार Ø 191 नमुने तपासणीसाठी अन्न प्रयोगशाळेत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून यवतमाळ शहर व जिल्ह्यात सणासुदीच्या काळात किरकोळ व घाऊक अन्न पदार्थ विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिक व मिठाई उत्पादनाची तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. जनतेस सुरक्षित खाद्य पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी शहर व संपूर्ण जिल्ह्यात अन्न व्यवसायिकांच्या तपासण्या करण्यात आल्या.या तपासणीत खाद्य तेल, मिठाई, दुध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर व इतर खाद्य पदार्थांचे नियमित व सर्वेक्षण मिळून एकूण 191 नमुने तपासणीसाठी शासकीय अन्न प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले आहेत. या अन्न नमुन्यांचे कार्यालयास प्राप्त अहवालापैकी खाद्य तेलाचे दोन, पनीर एक, दुध एक व इतर खाद्य पदार्थाचे पाच अहवाल अप्रमाणित आलेले आहेत. अप्रमाणित अहवालावर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक व मिठाई उत्पादक तसेच विक्रेत्यांना जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न पदार्थ तयार करण्याची जागा, साठविण्याची जागा स्वच्छ ठेवणे, मिठाई तयार करण्याचे टेबल व बाक, खाद्य पदार्थ भांडे, अन्न पदार्

खाजगी ट्रॅव्हल्सचे भाडे दरपत्रक जारी

Image
प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या चालक व मालकाविरुध्द होणार कारवाई Ø तक्रारींसाठी ईमेल, हेल्पलाईन क्रमांक ; खाजगी ट्रॅव्हल्स बसेसने आकारवयाचे महत्तम भाडे दरपत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार खाजगी ट्रॅव्हल्स बसेस व्यावसायिकांना एसटी महामंडळाच्या समकक्ष बसेसच्या दिडपट भाडे आकारणी करता येते. प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचे दिसून आल्यास बसच्या चालक व मालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे पत्रक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काढले आहे. प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्स बसेसनी अधिक भाडे आकारल्यास त्याबाबतची तक्रार ही कार्यालयातील दुरध्वनी क्र. 9404035310 व dyrto.29-mh@gov.in या ईमेलवर करता येणार आहे. बस वाहन रस्त्यावर चालत असतांना तपासणी दरम्यान प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचे आढळून आल्यास बसचे चालक व मालकाविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ८ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एसटी महामंडळाचे प्रवास भाडे दर १० टक्के अधिक असल्याने खाजगी प्रवासी भाडे दरापेक्षा १० टक्के अधिक भाडे आकारण्याची खाजगी बस वाहतूक दार

दिव्यागांनी ई-तीनचाकी सायकलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी ई-तीनचाकी सायकल व कर्ज लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेसाठी महाशबरी या संकेतस्थळावर जावून ई तीनचाकी सायकलसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या शाखा व्यवस्थापकांनी केले आहे. महामंडळाच्या यवतमाळ व वाशिम शाखा कार्यालयाअंतर्गत मुख्य कार्यालय नाशिक मार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेसाठी ई-तीनचाकी सायकल व कर्ज स्वरुपात विकुन एक लाख रुपयांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेचा पूर्ण भरलेला अर्ज व सर्व कागदपत्रे कार्यालयात आणून दयावे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाला संपर्क करण्याचे आवाहन महामंडळाच्या शाखा व्यवस्थापकांनी केला आहे.

कपाशीवरील लष्करी अळीचे व्यवस्थापन करावे

कापूस पिकावर लष्करी अळी (स्पोडोप्टेरा) चा प्रादुर्भाव आढळून येत असल्यास शेतकऱ्यांनी कापूस पिकामध्ये प्रौढ नर पतंग जेरबंद करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.तसेच प्रती हेक्टरी ४ ते ५ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. लष्करी अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने मुख्य शेत तणविरहीत ठेवणे तसेच आजुबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास लगेच कापूस पिकावर मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्लि किंवा बिव्हेरिया बेसीयाना 1.15 टक्के डब्ल्यु पी हे बुरशीजन्य कीटकनाशक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यावर स्पिनेटोरम 11.7 टक्के एससी 0.82 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एससी 0.3 मिली किंवा नोव्हालुरॉन 8.80 टक्के एससी एक मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 0.4 ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के इसी 2 ते 4 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकांची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

उमरखेड येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी इमारत भाड्याने घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी वसतीगृहाचे गृहपाल यांच्यांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इमारत ही 6 ते 7 हजार स्क्वेअर फुट बांधकाम असलेली व भरपूर पाणी, विहीर व विद्युत व्यवस्था, स्नानगृह, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा असलेली असावी. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी 9403015056 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अभिलेख तपासणीसाठी विशेष कक्ष स्थापन

जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे अभिलेख तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राउत यांनी दिली आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविणे तसेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या निर्देशानुसार जिल्हा व तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाद्वारे जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे अभिलेख तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या दृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी करुन त्यानंतर त्या अभिलेखाचे स्कॅनिंग करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ हे नोडल अधिकारी म्हणून

विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज भरण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेच्या www.swadharyojana.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे. त्यानंतर शासन निर्णयानुसार आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज यवतमाळ येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तेलंगणा सीमेपासून जिल्ह्यातील पाच किमी क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

Ø जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी : भारत निवडणूक आयोगाद्वारे तेलंगणा राज्यात सार्वजनिक विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणूक क्षेत्रात मतदान दि. 30 नोव्हेंबर रोजी व मतमोजणीची प्रक्रिया 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किलोमीटर क्षेत्रात दि. 28 ते 30 नोव्हेंबरपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी सर्व किरकोळ मद्यविक्रीस बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले आहे. या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तास अगोदर पासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री करण्यास मनाई किंवा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये तरतूद आहे. तसेच तेलंगणा राज्याच्या सीमेजवळील महाराष्ट्रातील जिल्ह्याला लागून पाच किमीच्या क्षेत्रात मद्यविक्रीस मनाई किंवा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत निर्देश दिलेले आहे. त्यानुसार तेलंगणा राज्याच्या सीमेपासून यवतमाळ जिल्ह्यातील पाच किमी क्षेत्रातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र देशी दारू नियम, मह

शेतकऱ्यांनी वैयक्त‍िक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे आवाहन

Ø मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना : Ø 23 ते 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान : राज्याच्या कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्त‍िक शेततळे ही योजना गत वर्षापासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्त‍िक शेततळ्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पावसाचे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड याप्रमुख नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे सिंचनाअभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. ज्याठिकाणी पाण्याचा जास्त तान पडतो तेथील पिके देखील नष्ट होतात, पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इत्यादीद्वारे वाहून जाणारे अतिरिक्त अपधाव उपसून त्याची साठवणूक करण्यासाठी शेतात शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे हा यावरील उपाय आ

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत ‘मास्टर ट्रेनर्स’ म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन

Image
केंद्र शासनाने देशातील हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत मिस्त्री किंवा गवंडी, शिंपी, सुतार, न्हावी अशा अठरा ट्रेडमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची नोंदणी करण्यात येत आहे. या क्षेत्रातील माहिती असलेल्या व्यक्तींनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मास्टर ट्रेनर्स’ नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या नोंदणी कार्यक्रम दरम्यान प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मिस्त्री किंवा गवंडी, शिंपी, सुतार, न्हावी, लोहार, चर्मकार, कुंभार, धोबी, सोनार, हॅमर अॅन्ड टुलकिट मेकर, मालाकार, टोपली तयार करणारा, चटई तयार करणारा, पारंपरिक बाहूलया व खेळणी तयार करणे, मासे पकडण्याचे जाळे बनविनारे, शिल्पकार, दगड कोरणारे, दगड तोडणारे, चिलखत बनविणारा, कुलपे तयार करणे व दुरुस्ती, जहाज, बोट तयार करणे अशा एकूण अठरा ट्रेड्समधील मास्टर ट्रेनरची नोंदणी करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कमीत कमी 20 वर्ष अनुभव असलेल्या व्य

सार्वजनिक ग्रंथालयांनी निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 इमारत बांधकाम व विस्तारासाठी 25 लाखांपर्यंतचा निधी ;  बाल ग्रंथालयासाठी सहा लाखांहून अधिक अर्थसहाय्य : जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत निधीसाठी दि. 30 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय आ. क्षीरसागर यांनी केले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राज्याच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. यंदाच्या वर्षात विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेनुसार इमारत बांधकाम व विस

भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र सुरु

Ø शेतकरी नोंदणीसाठी मोबाईल ॲप खरीप पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी, पुसद, आर्णी या पाच तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरु आहे. यात तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी या केंद्रांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्यांचा सातबारा आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपव्दारे होत असून लाईव्ह फोटो देखील या ॲपव्दारे अपलोड करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे. त्याच शेतकऱ्यांने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी मोबाईल

शासन आपल्या दारी कार्यक्रमात यशस्वी उद्योजकांचा सन्मान

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत लोहारा येथील यशस्वी उद्योजक लक्ष्मीकांत भोंबे आणि श्री. वि. राठोड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेश देवून सन्मानित करण्यात आले. यवतमाळ शहराजवळील किन्ही येथे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकिय योजनाचा लाभ घेवून स्वत:च्या व्यवसायाची सुरुवात करण्याऱ्या लक्ष्मीकांन्त भोंबे यांच्या संकल्प आणि जिद्दीचे कौतुक करुन मुख्यमंत्र्यानी भोंबेंचा भव्य कार्यक्रमात सन्मान केला.भोंबें यांनी पापड उद्योगासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत युनियन बँकेकडे कर्ज प्रकरण दाखल केले होते. या कर्ज प्रकरणाला बँक आणि खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मंजुरी मिळाली. त्यानंतर भोंबे यांनी स्वत:चा उद्योग उभारला. याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत यवतमाळ येथील श्र