प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत ‘मास्टर ट्रेनर्स’ म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन

केंद्र शासनाने देशातील हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत मिस्त्री किंवा गवंडी, शिंपी, सुतार, न्हावी अशा अठरा ट्रेडमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची नोंदणी करण्यात येत आहे. या क्षेत्रातील माहिती असलेल्या व्यक्तींनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मास्टर ट्रेनर्स’ नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या नोंदणी कार्यक्रम दरम्यान प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मिस्त्री किंवा गवंडी, शिंपी, सुतार, न्हावी, लोहार, चर्मकार, कुंभार, धोबी, सोनार, हॅमर अॅन्ड टुलकिट मेकर, मालाकार, टोपली तयार करणारा, चटई तयार करणारा, पारंपरिक बाहूलया व खेळणी तयार करणे, मासे पकडण्याचे जाळे बनविनारे, शिल्पकार, दगड कोरणारे, दगड तोडणारे, चिलखत बनविणारा, कुलपे तयार करणे व दुरुस्ती, जहाज, बोट तयार करणे अशा एकूण अठरा ट्रेड्समधील मास्टर ट्रेनरची नोंदणी करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कमीत कमी 20 वर्ष अनुभव असलेल्या व्यक्तींनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ कार्यालयाच्या भ्रमणध्वनी क्रमांक ०७२३२-२४४३९५ किंवा कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी