मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अभिलेख तपासणीसाठी विशेष कक्ष स्थापन

जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे अभिलेख तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राउत यांनी दिली आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविणे तसेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या निर्देशानुसार जिल्हा व तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षाद्वारे जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे अभिलेख तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या दृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी करुन त्यानंतर त्या अभिलेखाचे स्कॅनिंग करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनात या विशेष कक्षाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी